vatadya

नमस्कार सह्याद्री प्रेमींनो.. वाटाड्या ब्लॉग हा माझ्या आजवरच्या भटकंतीचा एक कॅलीडोस्कोप आहे.. कॅलीडोस्कोप जसा तुम्हाला जसे विविध रंग छटा दाखवितो तसाच सह्याद्री, मंदिरे, समुद्रकिनारे, गडकोट, अभयारण्ये, भूयार पाहताना जे काही अनुभव आले ते या ब्लॉग मध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. या ब्लॉगचा उद्देश्य हा इतिहास सांगणे नसून गड-कोटावर, सह्या-शिखरांवर, दऱ्याखोऱ्यात, रानावनात पाहिलेला अस्सल विविधरंगांनी नटलेला माझा सह्याद्री दाखवणे असा आहे.

गडकोट आणि सह्यशिखरे पाहण्यासाठी ज्या ज्या वाटाड्यानी मला मार्ग दाखविला आणि मदतीचा/मैत्रीचा हात दिला त्या सर्वांचा मी आजन्म ऋणी आहे.. शतशः धन्यवाद