SUMMIT
पानातून डोकावणारा सूर्य.. अन रानातून जाणारी वाट
दोघेही चालतात समांतर.. मध्ये आसमंताचे अंतर ठेवून
दिवसभराची पायपीट करून .. जेंव्हा मी गाठतो .. दुर्गमाथा
तेंव्हा सूर्य निघालेला असतो.. आज पुन्हा दुस-या डोंगराआड
पुन्हा एकदा समांतराकडे.. मुकाट खाली मुंडी घालून
खरं तर अशा कातर क्षणी.. मग नेमकं सुचत नाही
मनाला नेमकं काय हवं असतं?
तो सूर्य.. ते क्षितीज कि.. माझी जिवाभावाची सावली?
दिवसभर… पायाखाली चालणारी…
मावळतीला मुजोरपणे उंचावत.. जावून तिथे अदृश्य होणारी
मावळतीला मुजोरपणे उंचावत.. जावून तिथे अदृश्य होणारी
जेंव्हा दिवसाला साथ देणारी.. माझी जिवाभावाची सावली..
उगवतीच्या दिशेला मावळते
तेंव्हा सुरु होतो शोधाशोध.. त्या हरवलेल्या संचिताचा
गारव्याने भारलेल्या त्या गुहेत.. मग पाठ टेकता टेकता
सोबतीला असतात फक्त
अदृश्य झालेल्या सावल्या.. अदृश्य झालेल्या सावल्या ..
— माधव कुलकर्णी