प्रचितगड भटकंती – शृंगारपुर मार्गे
साधारण २०११ सालच्या मे महिन्यात पूर्ण केलेला हा ट्रेक कायम आठवणीत राहणारा.. प्रचीतगड ते भैरवगड असाही ट्रेक आहे पण चांदोली अभयारण्य हे संरक्षित असल्याने हा ट्रेक सध्या तरी शक्य नाही.. शिवाय चांदोली अभयारण्यातील कंधार डोह.. हा एक अद्वितीय जलप्रपात पाहण्यासाठी या प्रचीतगडापासून जाता येते.. पण त्यासाठी ‘फॉरेस्ट’ ची परवानगी घ्यायला हवी.. सध्या तरी या गडावर जाण्यासाठी कोकणातील शृंगारपुर गावातून जाता येते.. पण हा रस्ता प्रचंड घसरणीचा असल्याने वाटाड्या आणि एखादा १०० फुटी दोर नेल्यास प्रसंगी उपयोगी पडू शकेल.. गड दुर्गम असला तरी गडावर पाण्याचा साठा तिन्ही त्रिकाळ मुबलक असा आहे..
मित्रहो २०११ साली भर उन्हात पूर्ण झालेल्या ह्या प्रचीतगड भटकंती ची हि काही क्षणचित्रे.. सोबत हा वृत्तांत जोडत आहे.. पूर्ण वृत्तांत वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा: