अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग २

Chaul (Rajkot).. Revdanda Fort (Agarkot).. Korlai Fort

किल्ले चौल – रेवदंडा मोहिम : चौल कडून रेवदंड्याकड़े जाताना वाटेत एक तिठा (तिन रस्ते जेथे येउन मिळतात ते ठिका) लागतो. या तिठ्याजवळच रेवदंडा किल्ल्याचा रस्ता आहे. या तिठयाजवळ दुहेरी तटबंदी आणि दोन दरवाजे दिसतात.. दरवाजाच्या कमानीवर पोर्तुगिजांचा ट्रेडमार्क (राजचिन्ह) आणि तिन भाले असणारी आकृती कोरल्याचे ढळते..  सध्या किल्ला स्वतंत्र असा अस्तित्वात नाही.. ही दुहेरी बांधणीची तटबंदी आणि दोन दरवाजे म्हणजे चौकशी दरवाजा (inquiry  gate किंवा जीबीचा दरवाजा) असण्याची शक्यता आहे .. गडावर सर्वत्र वाडीवस्त्या आढळतात आणि यावर कहर म्हणजे मुरुडकडे जाणारा डांबरी रस्ता.. रेवदंडा किल्ल्याचा तट फोडून तयार केला आहे.. तिठ्याजवळील रिक्षा थांब्या (stand) जवळच रेवदंडा किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.. दुसऱ्या प्रवेशद्वाराला लागूनवर तटबंदीवर जाण्यासाठी कातळी जिना आहे.. एक आधुनिक ध्वजस्तंभ तटबंदीवर असून पुढे डावीकडे काही इमारतींचे अवशेष दिसतात..  मध्ये तटबंदीचा काही भाग तुटल्याने जीव मुठीघेऊन भग्न इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कमानीतून प्रवेश केला.. या तीन मजली इमारतीत सर्वत्र वटवृक्ष्याच्या पारंब्यांनी अतिक्रमण केले असून ही इमारत जणू शेवटच्या घटका मोजत आहे.. चौकटीतून आत येताच.. समोर बघताना लाकडाचे वासे टाकण्यासाठी केलेल्या खोबणी नजरेस पडतात... आणखी डावीकडे गेल्यास इथे आणखी एक इमारत नजरेस पडते.. दुर्गवैभवाचा वारसा कॅमेराबंद करून पुन्हा मुख्य द्वाराशी परत आलो.. सातखणी इमारत कुठे आहे?’ अशी विचारणा एका काकांना केल्यावर त्यांनी सातखणी महालाकडे जाण्याची वाट दाखवली.. मुख्य द्वाराच्या डावीकडील फोडलेल्या तटबंदीतून जाणाऱ्या गाडीस्त्याने ५० एक मिटर सरळ पुढे जाताच.. पुन्हा डावीकडे एक क्च्चा रस्ता आहे.. तोच सातखणी महालाचा रस्ता..
या रस्त्यावरून जाताना प्रथम डावीकडे st. fransis church ची भग्न इमारत नजरेस पडते.. या इमारतीमध्ये एक पोर्तुगिज शिलालेख आहे.. यावर काय लिहिलंय हे फ़क़्त वास्को दि गामा,  मोनिका बेदी आणि आबू सालेमच सांगू शकतील..!! चर्चच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मोठे दगडी गोळे पडले आहेत.. ते तोफेचे थंडावलेले गोळे.. चर्च आणि तोफगोळे.. हे काय गणित आहे याचा विचार करीत.. पुन्हा कच्च्या रस्त्यावरून सरळ शेवटापर्यंत गेल्यास बंद पडलेली पोर्तुगीज factory आणि थोडं पुढे सातणी महाल दृष्टीस पडतात..
इथे पोहोचलो आणि सातखणी महालाच्या डागडूजीचे जोरदार काम पुरातत्व खात्याने हाती घेतल्याचे बघून बरे वाटले.. या अशा ऐतिहासिक इमारती म्हणजे भारतभूमीच्या इतिहासाची वर्तमानाला दिलेला एक अमूल्य ठेवा आहे.. आणि ती सांभाळण्याचे काम महाराष्ट्रात सुरु झाल्याचे  पाहून आनंद झाला.. सातखणी महालाजवळच ५-६ तोफा एका रांगेत पडल्याचे दिसते.. डावीकडे.. एक पडझड झालेली L आकाराची भिंत.. महालाला खेटून उभी असल्याचे दिसून येते.. सातखणी महालाच्या पश्चिमेला विस्तृत तटबंदी असून पुढे तटबंदीला लागून उजवीकडे एक दरवाजा आहे.. त्या पलीकडे समुद्र किनारा.. इथून कोर्लई किल्ल्याचा एक सुंदर नजारा आहे..

सातखणी महालाच्या लगोलग काही इमारतींचे अवशेष आणि इमारतीचा पाया नजरेस पडतात.. सातखणी महालाचे सहा माजले ठळक नजरेस पडतात.. पण सातवा मजला काही केल्या दिसत नाही.. वरपर्यंत निमुळता होत जाणारा हा सातखणी महाल हा पोर्तुगीज वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल.. कुणी म्हणतात समुद्रातील हालचालींवर नजर ठेवण्यास बांधलेला हा  मनोरा (Tower) आहेकुणी म्हणतं.. पोर्तुगीज व्हाईसरॉय च्या सात राण्यांचा सातमजली महाल आहे.. मला तर हा मनोरा पाहून.. गाढवाचं लगीन (हे नाटक) आठवलं, त्यामधलं गाढव जसं सातमजली महाल बांधला तसा हा महाल रेवदंड्याच्या पोर्तुगीज किल्लेदाराने बांधला असावा.. असो.. या किल्ल्यावर सुमारे १५१६ मध्ये पोर्तुगीजांनी वखार बांधल्याचे इतिहासकार सांगतात..
इतर मंडळी या देखण्या टॉवरची वेगवेगळ्या कोनातून छायाचित्र घेण्यात मश्गुल झाल्याने.. जरा या परिसरात फेरफटका मारण्यास निघालो.. सातखणी महालातून समुद्र किनाऱ्याकडे गेल्यास.. रेवदंडा किल्ल्याची समुद्राकडील तटबंदी नजरेस पडते.. इथे चोर दरवाजा.. भक्कम बुरुज आदि अवशेष नजरेस पडतात.. समोर कोर्लई किल्ला हक देत उभा असतो.. आणि डावीकडे कुंडलिका खाडीवर बांधलेला लांबलचक पूल नजरेस पडतो.. येक फेरफटका मारून परतलो.. आणि       इकडे पाहिलं तर.. वॉल क्लायम्बिंग ची हौस भागवण्यासाठी सुदर्शन..  सातखणी मनोऱ्याशेजारील तीनमजली वाड्याच्या भिंतीवर चढून बसला होता.. मी आणि चंद्रकांत द शुमाकर’ ने त्याचे अनुकरण करीत  फुकटात वॉल क्लायम्बिंग चा सराव करून घेतला.. हौसेपोटी चार दोन फोटो  काढून पुन्हा खाली उतरलो.. 
रेवदंडा किल्ल्यावर सिद्धेश्वर मंदिरसातखणी महालज्यू लोकांचे प्रार्थना स्थळकाही जोती यांचे अवशेष सापडतात.. समुद्रकिनाऱ्यावरून चालताना दिसणारी रेवदंड्याची  तटबंदी केवळ अप्रतिम.. इथे रेवदंड्याकडे पाठ करून उभे राहिलो की रेवदंडा खाडी आणि उजवीकडे धूसर कोर्लई किल्ल्याचे दर्शन घडते.. रेवदंडा किल्ल्याचा मुख्य आकर्षण म्हणजे ‘सातखणी मनोरा’ (Tower) पाहून कोर्लई किल्ल्याकडे कडे मोर्चा वळविला..
किल्ले कोर्लई : रेवदंडा गावातून उजवीकडे मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यास प्रथम — खाडी पूल आणि मग उजवीकडे पुढे जाताच कोर्लई किल्ल्याचे गोंडस रूप नजरेला भिडतं.. तिथे एका मोरी जवळ गाडी थांबवून कोर्लई किल्ल्याचे Panoramic फोटोसेशन केले.. खाडी पुलापासून मुरुड रोडवर ३-४ कि.मी.अंतरावर कोर्लाई किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.. उजवीकडे कोळी बांधवांच्या वस्तीतून वाट काढत कच्च्या रस्त्याने कोर्लई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दिगृहापाशी येउन पोहोचलो.. सूर्यास्ताला तासभर अवकाश असल्याने व्हर्सा गाडी तिथेच उभी करून लगबगीने गडावर निघालो.. दिपगृहाच्या (Light  House) च्या कर्मचाऱ्यांनी, “पावती फाडल्याशिवाय दिपगृहाशेजारील रस्त्याने कोर्लई किल्ल्यावर जाता येणार न्हाई से ठणकावून सांगितले.. लगोलग पावती फाडून दिपगृहाच्या मागील भागातून.. गडाकडे नेणाऱ्या पायऱ्या चढू लागलो.. दोनदोन फुटी एक अशा दीड-दोनशे पायऱ्या चढताना चांगलीच दमछाक झाली.. श्वासांचे भाते फुलून आले.. हिरवळीला छेदत जाणाऱ्या या  टेकाडावरच्या आधुनिक पायऱ्यावरून चालणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे.. जसजसा चोर दरवाजा समोर येवू लागला तसतसा पायांचा जोर वाढला..
मीदिनेश आणि सुदर्शन कोर्लई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी येउन पोहोचलो.. मागची मंडळी इथवर येण्यास अजून अवकाश असल्याने दरवाजातच ब्रेक घेतला.. मस्तवाल वारं बेभान होवून सैरावैरा वाहत होतं.. जणू  एखाद्या शेजाऱ्याचं इरसाल कार्ट आज बेभान होवून आमच्या अंगणात सैरभैर होवून धावत होतं..  समोर पसरलेला अथांग सागर त्यावर डोलणाऱ्या बऱ्याच होड्या..  आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या त्या ब्राम्हणी घारी.. आणि समोर पसरलेली ही हिरवाईची मखमली चादर.. सारंच वातावरण अंतर्मुख  करणारंअगदी भारावून टाकणारं होतं..

एक वाट तिथली रोजमर्राची 

अस्वथ मनाने जगणारी 

खुरडत आयुष्य जगताना

मनाला लगाम घालणारी

तर एक वाइथली..

मनावर हळुवार फुंकर मारणारी

या नाला मुक्त करणारी 

क्षितिजावर नजर फेकणारी 

श्वास जगायला शिकवणारी

अशीच एक वाट मी कोर्लई किल्ल्याच्या माथ्याकडे जाताना पाहिली.. दडपून बसलेले श्वास मुक्त होताना मी स्वतः त्या कातळ दरवाजातून पाहीलं आहे.. असो.. चोर दरवाजातून आत शिरताच डावीकडे उतरती तटबंदी आणि दरवाजा नजरेस पडतात तर उजवीकडे दोन तटबंदीच्या मधून किल्ल्यावर नेणारी वाट.. बाकीचे येण्यास उशीर लागल्याने मोर्चा डावीकडे वळविला.. सुदर्शन आधीच समाधिस्थ होऊन अंतर्मुख होऊन बसला.. छायाचित्रणाचीहौस भागवून घेतली.. पायऱ्यावर बूड टेकवलं तर समोर खाली समुद्राला भिडलेली तटबंदी आणि दरवाजा नजरेस पडला..
कोर्लई किल्ला एकूण सात भागामध्ये बांधला असून.. सात डब्याच्या (compartments) च्या रेल्वेप्रमाणे हा किल्ला आडवा पसरलेला दिसतो.. प्रत्येक compartment मध्ये मनामनाला हवीहवीशी वाटणारी नेमकी शांतता.., ठासून भरलेलं गारेगार वारं.. तिकडे रेवदंड्याची खासियत आहे.. सातखणी मनोरा  तर इथे डोंगराच्या सोंडेवर बांधलेले हे अवाढव्य सात Compartments.. गडाची तटबंदी, दरवाजे  अजूनही सुस्थितीत असल्याचे लक्षात आले.. सुयोग, अन्वर मिया आणि चंद्रकांत गडावर पोहोचताच.. उजवीकडे शेवटच्या compartment  कडे निघालो..
वाटेत गुडघ्याइतके गवत वाढल्याने पायवाट अधून मधून गायब होत होती... त्यात एखादा सरपटणारा मित्र पायाची पप्पी घेतो का काय अशी भीतीवाटत होती...!! झपाझप पावले टाकत टेकाड्याच्या माथ्यावर सलेल्या पाचव्या compartment मध्ये येउन पोहोचलो... इथून मागे गडाच्या उतरत्या तटबंदीचा नजारा फार सुरेख होता.. डावीकडे मावळतीसाठी आतुरलेला सुर्य.. चमचमते सोनेरी पाणी असं विलक्षण दृश्य पाहायला मिळाले.. मुख्य द्वाराच्या डावीकडील पायऱ्यानी दरवाजावरील तटबंदीवर चढलो... इथून रेवदंडा समुद्र किनारा.. अस्पष्ट दिसणारा सातखणी महाल पाहून पुढे निघालो.. तेही पुरातत्व खात्याने डागडुजी केलेल्या तटबंदीवरून..हाव्या compartment मध्ये आलो...  दरवाजाच्या आत मध्यभागी एक तुळशी वृंदावन असून उजवीकडे शेजारी इथे पाण्याची बंदिस्त टाकी आहेत.. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा उत्तम नमुना (खास पोर्तुगीज धाटणीचा) याची डोळा अनुभवून पुढे दरवाजातून आत शिरलो..
इथे डावीकडे खाली उतरणाऱ्या पायऱ्या असून.. एक मोठा दरवाजा.. हाच गडाचा मुख्य दरवाजा.. नजरेस पडतो.. समोर एक चापेल/चर्च असून दरवाजाजवळ एक पोर्तुगीज  भाषेतील शिलालेख आहे.. गडाच्या उत्तर टोकाला तटातील  खोल्या.. पूर्व-पश्चिमेला दरवाजा.. दक्षिण टोकाला शिलालेख.. चर्च पाण्याचं टाकं.. षटकोनी बांधणीचा बुरुज इत्यादी अवशेष आहेत.. साधारण एक कि.मी. लांबी आणि ५०-६० फुट रुंदीचा हा किल्ला म्हजे पुरातन स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे.. मांतराचे आस्तित्व घेऊन उभी ठाकलेली तटबंदी आणि पश्चिमेला अथांग सागर असा हा किल्ला पाहणे म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे..
थोडसं गडाच्या इतिहासाविषयी..  बहामनी राज्याची शकले होऊनदिलशाहीनिजामशाही, कुतुबशाही आणि बिदरशाही निर्माण झाली. . हा किल्ला बुरहाण निजामशाहाने इ.स. १५२१ मध्ये बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. १५९४ मध्ये पोर्तुगीजांनी सरदार फरहाखान आणि असदखान या निजामशाहीच्या चाकरमान्यांचा पराभव करून किल्ल्यावर पोर्तुगीज झेंडा फडकवला.. पुढे पेशवे आंग्रे आणि शेवटी इंग्रज या किल्ल्याचे धर्तेकर्ते झाले. असो या गडाचा संक्षिप्त इतिहास.. गडाच्या मुख्य दरवाजाजवळ ब्यागा टेकवल्या.. माझ्या म्हाताऱ्या म्हणजे बिग बच्चन camera मध्ये काही निवांत क्षण टिपून.. गोलगप्पा  मारत बसलो.. पोटातले सकाळी खाललेले २-२ वडापाव जिरून आता कावळे कावकाव करू लागले.. म्हटलं “दोन वडापाव वर एवढी दुर्गभ्रमंती..!!“.. चांगलाच stamina वाढलाय असं जाणवू लागलं.. दिनेश.. लगेच.. तुम्ही  तर दोन वडा   आणि २ पावावर.. ३ किल्ले सर केले. “मेरे पास सिर्फ २ वडे थे..” क्षणांचा विरंगुळा पदरात पाडून उदरभरणाच्या ओढीने दीपगृहाकडे निघालो.. गुडघाभर गवतातून वात काढत कोर्लचा निरोप घेतला आणि दीपगृहाजवळ जमा झालो.फोटोग्राफर लोकांचं अगदी तहानभूक हरपून डवैभवाचं छायाचित्रण चाललं होतं.. शिदोरी उघडली पराठे-दही-चटणी-झुणका आदी भूक शमवणाऱ्या पदार्थांवर तुटून पडलो.. सुर्य मावळतीला आला होता.. तांबूस रंगानी  आसमंत भारून गेला होता.. तिकडे दिवसभर भडकलेला सुर्याग्नी क्षितिजावरती थंडावला होता.. तर इथे दिवसभर रणरण रुन भडकलेला जठराग्नी  शिदोरीच्या समेवर येउन शांत झाला होता.. सुर्य आणि जठराग्नी मावळताच मग दीपगृह पाहण्यास निघालो.. चार मजली या दिपगृहामध्ये दोन लोखंडी शिड्यावरून चढून वर येउन पोहचलो.. 
दीपगृह दाखवायला आलेल्या काकांनी मग दीपगृह त्याची जडणघडण आणि फायदे” यावर गोलमेज परिषद भरवली.. दीपगृहाच्या माथ्यावर छायाचित्रण करण्यास त्यांनी मज्जाव केला होता.. इथे बांधलेले दीपगृह हे इंग्रजांनी बांधलेले असून concave mirror आणि प्रिझमचा वापर करून.. (सुमारे ४० मैलांपर्यंत पर्यंत जाणारा प्रकाशझोत म्हणजेच) focus beam Light ची निर्मिती केली आहे.. दीपस्तंभ म्हणजे दर्यावर्दी कोळी बांधवांसाठी ही  साक्षा जीवनरेषा .. मासेमारीसाठी समुद्रात ६०७० k.m.  दूर जाणारे कोळी बांधव परतीचा प्रवास या light beam च्या दिशेने करतात. या शिवाय या दीपगृहाच्या छतावर एक radio frequency transmitter असून मोठी जहाजे याला tune करू शकतात.. आणि दीपगृहा चें स्थान आणि दिशा निश्चित करू शकतात.. Light house मधील main light source ला जनरेटर चा backup दिला आहे आणि तोही संपल्यास एक battery operated portable Light source जोडीस देण्यात आला आहे.. याची क्षमता.. २० मैल इतकी आहे.. या लाईट हाउस मधील उपकरणे GermanyEngland आदी देशातून आणल्याचे इथल्या काकांनी सांगितले.. सामान्य ज्ञानात लाईट हाउस  चा विकिपीडिया अपडेट करून पुन्हा खाली उतरलो..

ध्वजस्तंभाजवळ सभा भरवली.. “रात्रीचा मुक्काम कोठे करायचाया गहन प्रश्नावर दहाएक मिनिटे जोरदार परिसंवाद झाला.. लाईटहाऊस वाले काका म्हणाले “किनाऱ्यावर तंबू टाकु नकापोलीस त्रास देतील.. शेवटी अलिबाग कडे निघालो. पोलिसांची परवानगी मिळाली तर  लाईट हाउस जवळ तंबू..  नाहीतर आलिबाग लॉज वरचा मुक्काम फायनल  झाला.. परत कुंडलिका खाडी पुलाजवळ येउन पोहोचलो. इथे काही पोलिस उभे होते. गाडी वळणावर उभी करून काही प्रश्न विचारणारइतक्यात गाडी वळणावर वर पार्किंग केल्याने Tropic पोलिस खवळले.. खेकसत गाडी पुढे नेण्याचे निर्देश दिले.. पोलिसांचा तोरा पाहून.. लगोलग.. टेंट हाउस चा बेत रद्द करून.. तडक अलिबाग गाठले. साधारण ९ वाजले असावेत..

अलिबाग S.T. स्थानकाजवळ चौकशी करता.. खिशाला परवडेल  असा “आसरा लॉज जवळच असल्याचे समजले.. एका खोलीत ४५० रुपयात ३ नग याप्रमाणे..नगांसाठी २ खोल्या बुक करून गाडीतल्या ब्यागा लॉजवरच्या कळकट-मळकट खोलीत हलवल्या.. साडे दहा पर्यंत  शेवटच्या पंक्तीत जेवण करण्याचे आदेश निघाले.. 

ट्रीप आयोजकांच्या खोलीत “गप्पा  महोत्सव” रंगला.. मैफलीला जसजसा रंग चढू लागला तसे एका मागून एक स्फोटक विषय टेबलवर येउन पडू लागले.. वादविवाद म्हणा किंवा परिसंवाद म्हणा पण झिंगलेल्या मैफलीला सर्वोत्तम वक्ते लाभतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे..  त्यात या मैफलीत.. पहिले प्रथम पापा नाटेकर.. मग थोरले साहेब.. मग २ धाकले साहेब.. अशी थोर मंडळी या महोत्सवात हजेरी लावून गेली..  शेवटी निरर्थक विषयांना बगल देऊन राजमुद्रा हॉटेल मध्ये जेवणासाठी निघालो.. डिनर ला तर्रीबाज पापलेट थाळी, चिकन मालवणीची ऑर्डर देऊन टाकली.. भरपेट  मासळी पोटात ढकलून एक दुर्गभ्रमन्तीने रंगलेला दिवस सार्थकी लावला.. लॉजवर पोहोचलो. मघाशी थकलेल्या डोळ्यांना कळकट-मळकट वाटणारा बिछाना आता धुतल्या तांदळासारखा स्वच्छ दिसू लागला होता.. पाठ टेकताच आडवा झालो..

सकाळी लवकर उठून जंजिरा-पद्मदुर्ग भ्रमण घडले तर उरल्या वेळात फणसाड अभयारण्य (wildilfe sanctuary) करता येईल असे ठरवले होते, पण सकाळी उशिराच जाग आली उगाच वेळ न दवडता भराभरा आवरून घेतले.. “सुयोग  युवराजसाहेब.. वतन ए सातारा.... सोडून सर्व मंडळी तयार होती.. आधीचा  गरम पाणी मिळाल्याचा जरासा विलंब, नंतर camera ची लेन्स घासण्यासाठीचा झालेला अंमळ इवलासा उशीर आणि सरते शेवटी नट्टापट्टा करण्याचा शेवटचा फक्त पंधरा मिनिटाचा विलंब.. असा तासाभराचा खेळ खंडोबा करून युवराजांनी आसरा लॉज सोडला..
सुदर्शन रावांनी S.T. स्थानकाजवळच एक जुजबी हॉटेल अशोका’ सकाळच्या नाष्ट्या साठी निश्चित केलं होतं... तिथे सुदर्शन चा दोस्त खास लीबाग वरून भेटण्यास येणार होता.. साडेदहाला हॉटेल आसराला टांग मारली आणि बिनबोभाट नाश्त्यासाठी हॉटेल अशोका वर पोहोचलो.. दहा पंधरा मिनिटे पंख्याचं वारं खात बसलो.. एकएक वेटर जवळ यायचा आणि येउन नुसताच हूल देऊन जायचा.. शेवटी वहीचा कागद फाडून थेट मीच ऑर्डर घेतली.. डोसास्पे.पुरी भाजीवडासांबर ची यादी कागदावर उतरवली..  वेटर काय ऑर्डर आहे?सं विचारणार तोच ती यादी म्हणजेच K.O.T. (kitchen order Ticket) त्याच्या हातात दिली.. वेटर गालातल्या गालात लाजला आणि मुदपाकखान्यात  (kitchen) मध्ये पाय लावून पळाला.. 
मग आणखी १५ मि. यतेच्छ पंख्याचं वारं खाल्यावर.. एकदाचा तो नाश्ता टेबलावर येउन पडला.. तुटून पडण्याशिवाय गत्यंतर होते.. दुपारी जेवणाचे नक्की न्हवते.. मंडळाने तसे काहीच कबुल केले नव्हते.. म्हणून जोरदार नाश्ता पोटात ढकलला.. दुपारचे १ वाजले असावेत लगबगीने मुरुडकडे निघालो.. गाडीच्या ड्रायव्हिंग चे सुकाणू अस्मादिकांच्या हाती होते.. गाडी कुंडलिका खाडीशी पोहोचतो ना पोहोचते तोच.. चंद्रु चे गाडी थांबव.. अरे गाडी थांबव.. अशी डूरडुर सुरु झाली.. पुढे घाटात.. तुंबलेल्या चंद्रुला मोकळा करण्याचा ब्रेक मित्रमंडळाने खुल्या दिलाने मंजूर केला..दिनेशला विचारले काय रे.. याला जेवण झाले कि लगेच डबा टाकायची हुक्की का येते रे.. यावर दिनेशचे महान उत्तर आले “अरे त्याला देवाने अन्न साठवण्यासाठी फ़क़्त एकाच पिशवी दिली आहे”.. लगेच मागून कुणीतरी Electronics जोक मारला. “Last in first out”.. दिनेश: Last in first out “. म्हणजे उलटी first in first out  म्हणजे चंद्राचा डबा..चंद्रकांत झाडी-झुडपात घुसला तशी माकडे आजूबाजूला जमा होऊ लागली.. माकडांना अलर्ट करण्यासाठी चंदुला आवाज टाकला.. उगाच माकडांना त्रास कशाला..!!
एकदाचा चंद्रू मोकळा झाला आणि थंडावलेलं मारुती व्हर्सा चं इंजिन पुन्हा धडधडू लागलं.. नेव्हिगेटर म्हणून दिनेश G.P.S. चं काम बजावत होता.. नागाव किनारा सोडला आणि पुढच्या चढावाला  लागलो.. टेकाडावर.. घाट रस्त्याला नेव्हिगेटर ने गाडी बाजूला  घेण्याचे निर्देश दिले.. इथे काही पुरातन दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात.. नेव्हिगेटरच्या अंदाजाप्रमाणे इथे पूर्वी चेकपोस्ट असण्याची शक्यता आहे.. इथे उतरलो आणि इथला नजारा खरंच देखणा होता.. दूर समुद्रात उजवीकडे दिसणारा पद्मदुर्ग डावीकडे जंजिरा..
 

किल्ले पद्मदुर्ग : फोटो सेशन चे वर्कशॉप आवरतं घेऊन एकदरा गावाकडे निघालो.. एकदरा हे मुरूडच्या आलीकडचे गाव इथून प्रायव्हेट होडीने/मोटार बोटीने कांसा पद्मदुर्ग किल्ल्यावर जाता येते.

खांदेरी उंदेरी सारखीच इथेही कस्टम ऑफिसर साहेबांच्या मर्जी शिवाय कुणीही पद्मदुर्गावर जाऊ शकत नाही असे कळले.. पुन्हा एकदा परवानगी मिळेल या भाबड्या आशेने मुरुडकोळीवाड्यातील कस्टम ऑफिसकडे निघालो.. इथे कस्टम ऑफिसजवळ मारुती व्हर्सा  बाजूला घेतली आणि चौकशीसाठी एका घराच्या उंबरठ्यात पोहोचलो.. म्हटलं काका पद्मदुर्ग ला कसं जायचंकाका म्हणाले..ला मी तुम्हाला घेऊन जातो..! 

 
चिमित्कार.. दुसरं काय.. जिथे.. कस्टम ऑफिस चे उंबरे झिजवून देखिल.. खांदेरी-उंदेरी पाहायला मिळू नये.. आणि इकडे.. पत्ता विचारायला जावं आणि पद्मादुर्गाचे तिकीट विनासायास मिळावं..!! क्या बात है..!! आज नशीब जोरावर होतं एकंदरीत.. पद्मदुर्ग पाहायला मिळणार या बातमीने मित्रमंडळ खुश झाले.. चित्रबंबाळ झालेले कॅमेरे म्यान करत” पुन्हा गाडीत घुसलो.. काकाही सोबतच गाडीत बसले... नेव्हिगेटर  म्हणून.. एकदरा गावच्या जेट्टीवर गाडी थांबली.. बोट तयारच होती.. पण लाईफ जाकेटचा पत्ता नव्हता.. काकांना म्हटलं Life Jackets आहे ना.. हो.. असं उत्तर ऐकून जीव भांड्यात पडला.. गणरायाचे नाव घेऊन बोटीत बसलो.. बोटीच्या इंजिनाची धडधड सुरु झाली.. तशी  ह्र्दयाचीहि.. एका भल्या मोठ्या फळीला धरून बसलो.. बोट चालवणारे नावाडी श्री संजय जंजिरकर.. त्यांचा कुलदीपक प्रतिक.. भावाचा कुलदीपक मनीष आणि त्यांचे काका श्री हरिश्चंद्र जंजिरकर.. सोबत.. सहा मावळे.. आतून थोडेसे टरकलेले.. तरी वरवर शूरतेचा भाव घेवून.. जीव मुठीत धरून बसलेले..!!

त्यात भरीस भर म्हणजे.. आता आपलं काही खरं नाही असं वाटावं.. अशी एक लाट बोट हेलावून जायची की बस्स..!! आता जीवावर उदार होऊन.. काहीही झालं तरी पद्मदुर्ग पहायचा निर्धार करून टाकला होता.. आता माघार घेणे नाही.. असा उतावळा-गोतावळा जंजिरे पद्मदुर्गाकडे  निघाला.. बोट वेग घेत आहे असे जाणवताच.. अचानक बोटीचा वेग मंदावला.. जंजिरकर शिपिंग कॉर्पोरेशनच्या मालकांना प्रश्न विचारला तर.. समोर दूर कस्टमची पेट्रोलिंग बोट.. अलिबाग-मुरुडकडे निघाल्याचे कळले.. निळसर बुडाची बोट आता आमच्या आणि पद्मदुर्गाच्या  आडवी जात होती.. एखाद्या निळ्या मांजरीसारखी.. नावाड्याने सरळची वाट सोडून किनाऱ्याकडे बोट वळवली.. आणि कडेकडेने धिम्याने बोट पुढे सरकू लागली.. २०-२५ मिनिटे कस्टमची बोट कधी नजरेआड होते याची वाट पाहत बसलो.. शेवटी एकदाची ती कस्टमची बोट नजरेआड झाली आणि आमच्या बोटीचा वेग वाढू लागला.. आणि आमची बोट पद्मदुर्गा कडे मार्गस्थ झाली.. १०१५ मिनिटातच मघाशी अस्पष्ट दिसणारा पद्मदुर्ग आता रेखीव वाटू लागला.. तेवढ्यात मालकांनी शाब्दिक बॉम्ब टाकला.. ओहोटीची वेळ आहे गडापर्यंत जात येणार नाही..पाणी आणखी ओसरलं.. तर बोट खडकाला लागून फुटू शकते..आणि आपल्याला परतही जाता येणार नाही.. मग त्यांना परत विनवणी केली.. म्हटलं अहो लांबून आलोय “आता थोडीशी रिस्क घ्याच आमच्यासाठी.. पंधरा मिनिटात पद्मदुर्ग भ्रमंती उरकतो.. शेवटी एकदाचा त्यांचा होकार मिळवून.. बोट पुन्हा गडाच्या दिशेने धावू लागली..

खडकाळ किनाऱ्याच्या एका बाहेर आलेल्या खडकापाशी बोट उभी केली.. समोर दिसणारा राजबिंडा कासा पद्मदुर्ग आणि आमची बोट यात ५-६ फुटाच अंतर राहीलं होतं.. स्वर्ग सहा फुट दूर उभा होता.. श्रीयुत हरिश्चंद्र जन्जीरकर मनाचा हिय्या करून कमरेभर पाण्यात उतरले.. कमरेभर पाण्यातल्या खडकावर पाय रोवून बोटीचं निमुळत टोक जीव खावून ओढू लागले..  बोट कशीबशी किनाऱ्याला टेकली.. मग मित्रमंडळाने कासा पद्मदुर्गकडे धूम ठोकली.. भारताने ने world cup जिंकल्यावर जसे खेळाडू मैदानाला फेरी मारतात तसे सगळे मुख्य द्वाराकडे पळत सुटले.. सैरभैर झालेले मावळेडाच्या मुख्य द्वाराशी येउन थांबले..

वास्को  मामाला गोवा शोधल्याचा जितका आनंद झाला असेल त्यापेक्षा तेरापट आनंद हा कासा पद्मदुर्ग किल्ला पाहून झाला होता.. दस्तूर खुद्द महाराजांनी बांधलेल्या एकूण पाच जलदुर्गापैकी एक जलदुर्ग म्हणजे कासा पद्मदुर्ग.. गडाच्या उत्तरेकडील दरवाजाने आत शिरलो.. डावीकडील तटबंदीलगतच्या पायऱ्यांनी तटबंदीवर चढलो.. धावती फोटोग्राफी करत मिळेल तसे गडाचे रूप कॅमेराबंद करत तटबंदीवरून चालत गडाच्या पश्चिम टोकाला आलो.. गडाला साधारण सहा ते सात बुरुज असून गडाच्या दक्षिण तटबंदीलगत  काही खोल्या बांधलेल्या दिसतात.. गडाच्या मध्यभागी एक शिद आणि भग्न वाडा यांचे अवशेष आणि गुडघाभर गवतात काही तोफा पडल्याचे दिसले..
गडाच्या दक्षिण तटबंदीवर काही तोफा कमानीतून बाहेर डोकावताना दृष्टीस पडले..  गडावर गवत वाढल्याने पायवाट अशी दिसली नाही.. दक्षिणेकडे मागे आणखी एक उपदुर्ग आहे त्याला पडकोट म्हणतात..डकोटातील कमळाच्या पाकळीसारख्या कमानी शिरावर घेऊन मिरवणारा बुरुज म्हणजे शिल्पकलेचा एक खजिनाच.. इथल्या या बुरुजाची रचना एखाद्या कमळाच्या फुलासारखी आहे.. म्हणून या किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग.. गडाची बांधणी अजून भक्कम असून केवळ संरक्षित असल्यानेच गडाची अजून तरी पडझड झाली नाही.. गडाची तटबंदी शत्रूचे पारिपत्य करण्यास सुसज्ज अशीच आहे..  पडकोटाचा कमळासारखा दिसणारा बुरुज सोडला तर बाकी बांधकामाची पडझड झाली आहे..  बालेकिल्ला आणि पडकोट असे मिळून गडावर साधारण ४० तोफा आहेत असं म्हणतात.. तटबंदीवरून फिरताना ठिकठिकाणी तोफा पडल्याचे दिसून आले..  पश्चिमेकडील तटबंदीला लागून असलेल्या कातळ पायऱ्यावरून उतरून पडकोटाकडे निघालो.. मुख्य दरवाजाच्या समोरच्या पायवाटेने जाऊन आपण पडकोटाच्या बाजूच्या दरवाजात पोहोचतो.. पडकोटावर फारसे बांधकाम शिल्लक नसल्याने बालेकिल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या पटांगणात रेंगाळलो..
कासा पद्मदुर्गाच्या बालेकिल्ल्याचे मनमुराद छायाचित्रण केले.. इथून जाऊच नये असं वाटलं.. एक दिवस मुक्काम करायला हवा.. असा हा देखणा दुर्ग आहे.. बाहेरच्या दिशेने बालेकिल्ल्याला पूर्वेकडून वळसा मारून पुन्हा बोटीजवळ येउन पोहोचलो.. पद्मदुर्गाची आकृती मनावर कायमची ठसवून जड अंतकरणाने पद्मदुर्गाचा निरोप घेऊन पुन्हा बोटीत शिरलो.. बोटीच्या फळकुटावर पाठ टेकवून आकाशाकडे तोंड करून विसावलो.. एक अविस्मरणीय दुर्ग भ्रमंती आज महाराजांच्या कृपेने घडली.. चित्रगुप्ताने कासा पद्मदुर्गाची अदभूत सफर आज नशिबात लिहून ठेवली होती.. म्हणून हा जलदुर्ग पाहायला मिळाला.. आठवणीचा खजिना मनाच्या तिजोरीत कुलूपबंद करून टाकला..  पद्मदुर्गाच्या दांडग्या गोजिरवाण्या रुपाची हि क्षणचित्रे मेंदूच्या SD कार्ड वर कायमची कोरून बोट जेट्टीकडे निघाली..
काही किनारे धुंद करणारे
आठवणीना धुंद करणारे
इतिहास डोक्यावर मिरवणारे
आयुष्यात धुंदी जागवणारे

पद्मदुर्गाच्या ऐतिहासिक खुणा प्रत्यक्ष अनुभवल्याने दिलोजान खुश झाले.. जेट्टीवर पोहोचलो.. मन आता “समुद्रात बुडण्याची भीती.. आणि त्याने मनाची होणारी धाकधूक” असल्या शुल्लक चिंताच्या पुढे जाउन पोहचलं होतं.. मनात उरला होता.. जाज्वल्य अभिमान..!! नुसता गड पाहून.. सुमारे पावणे तीन किलो अभिमान.. उर फुटेपर्यंत भरून वाहत होता.. तर ज्यांनी तो प्रत्यक्ष बांधला त्या छत्रपती शिवाजीराजांचा स्वाभिमान मेरु पर्वताइतकाच असला पाहिजे..
जेट्टीवर बोट थडकली आणि टांगलेले पारिवारिक  जीव किनाऱ्याला लागले.. चंद्रकांत आणि जंजिरकर शिपिंग कॉर्पोरेशन यांचा thank you सोहळा उरकताच मुरूडची वाट धरली.. उन्हं कलांडली होती.. त्यामुळे वेळ न दवडता एकदरा गावातून टेकडीच्या घा रस्त्याने मुरुडकडे निघालो..
क्रमशः

माधव कुलकर्णी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s