अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग ३

Fort Janjira.. Khokari Ghumat


मुरुड जंजिरा उर्फ जझीरे महरूब :  मुरूडमध्ये पोहचेस्तोवर सायंकाळचे साडेपाच झाले होते.. माझ्या बच्चन कॅमेऱ्याला रात्रीचे कमी दिसत असल्याने.. जंजिराचे फोटो  नीट येतील की नाही ही  चिंता होती.. मुरूडमध्ये पोहोचताच मौलवी साहेबांची अजान कानी पडली.. इथे शिडाच्या बोटींची दिवसभर जंजिरा किल्ल्यावर येजा सुरु असते.. किल्ला पाहण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी दिला जातो.. जंजिरा किल्ल्याला धावती भेट द्यायची आणि पुन्हा बोटीने परतायाचे.. जंजिरा फेरी बोट सर्व्हिस कंपनीच्या तिकीट खिडकीवर आलो तर बोट लागली आहे.. जल्दी करो.. तिकीट निकालो’.. अशी आरोळी ऐकली.. मंडळातील काही मेंबर टोपी खरेदीत मग्न होऊन मागेच राहिल्याने ही बोट सोडावी लागली.. मग वाट बघत बसलो.. मेंबरं इथे येण्याची..

तब्बल दहा पंधरा मिनिटे वेटिंग नंतर काऊ बॉय hat घालत एकेक मेंबर तिकीट बारीवर येउन धडकले.. सहा तिकिटं काढून गणपती बाप्पाचं नाव घेऊन शिडाच्या बोटीत पुन्हा एकदा जीव मुठीत घेऊन बसलो.. बोट सुरु होताच.. एक राजू गाईड डेक वर भेदरलेल्या व जीव मुठीत घेऊन मुसाफिरांच्या पुढ्यात येउन उभा राहिला.. आणि जंजिरा किल्ल्याचा इतिहास फाडफाड ऐकवू लागला.. जंजिरा किल्ला  ४५ मिनिटात पहायची तंबी दिली आणि सरतेशेवटी बोट चुकल्यास १५०० रुपयांची खासगी  होडी घेऊन मुरूडमध्ये परत जावं लागेल अशी धमकीवजा प्रेमल सूचना दिली.. आणि मग गडाचा  इतिहास shortcut मध्ये उरकून.. राजू गाईडने हळूच मग.. आमचा दुसरा गाईड तुम्हाला ४५ मिनिटात गडावरचे मुख्य अवशेष दाखवून टायमात कसा बोटीवर पोहोचवेल याचं जोरदार मार्केटिंग केलं..

माणशी चाळीस रुपये.. ज्याला गाईड  पाहिजे त्यानं आत्ताच पैसे जमा करावे अशी दवंडी दिली.. २४० रु. सगळ्यांसाठी..!! या पैशात रात्रीसाठी दोन  नं१ चपट्या येऊ शकतील.. असा भाबडा विचार मनात आला.. पण ४५ मिनिटात नेमकं गडावर काय पाहायचं याबाबतच अज्ञान.. To be or not to be..? पुन्हा एकदा hamlet चं  भूत मानगुटीवर बसलं.. मग म्हटलं जाऊ दे.. या अजस्त्र जलदुर्गाबद्दल गाईडकडून नेमकी माहिती ऎकता येइल आणि सगळा  गड वेळेत फिरता येईल.. शेवटी मांडवली करून दोनशे रुपयात सहा नगांना बोलबच्चन देण्याचं राजू गाईडने मान्य केलं.. बोट मुख्य दाराशी आली आणि सागळे पटापट उतरले.. गडाची भव्यता पाहुन डोळे दिपले.. गड आजपर्यंत का अजिंक्य राहिला असेल हे गडाच्या तटबंदी आणि बुरुजांच्या बांधाणीवरून कळते.. सुमारे ५० मिटर उंचीची ही बेलाग तटबंदी.. या गडाचे रक्षण पाचशे वर्षे करू शकली याचं कारण म्हणजे या तटबंदीची बांधणी.. लाटांच्या तडाख्याने या तटबंदी च्या पायथ्याला जरी खिंडारे पडली तरी अजून आत कणखर कातळ तसाच आहे..
मुख्य द्वारात उभे राहून भिंतीवर नजर फिरवली की डावीकडे हत्तीची झुंज आणि उजवीकडे वाघाच्या पंजात पकडलेले चार हत्ती.. तसेच जबड्यात पकडलेला एक आणि शेपटात जखडलेला एक हत्ती असे आक्रमक शिल्पचित्र कातळभिंतीत कोरल्याचे दिसते.. हे चित्र गडाच्या सामर्थ्याचे बोलके शिल्पचित्र आहे.. सहा हत्तींना एकट्याने जखडण्याची क्षमता माझ्यात आहे.. असेच या चित्रातून सुचवायचे असेल.. खरं काय ते देव जाणे..

राजू गाईड: ये आप सामने देख रहे है.. वो जंजिरा किला है | बनाने वालेने इस के main door को मेन दरवाजेको कहा बनाया गया वो पता नही चलता.. के दरवाजे हमको नहीता चलता है |  वैसे entry gate इतना बडा है के वहां पे आज भी तक्रीबन.. दोतीन सौ आदमी हा खडा रह सकता है | इतना बडा उसका entry gate है .. ये एन्ट्री बाहरसे पता नही चला.. राजा महाराजाओ को इसके कार ये जंजिरा fort जो हम लोग देखने के लिये जा रे वो place अजिंक्य fort है | आजतक इस fort को किसीने capture नाही किया हुआ है | इसका entry किधर है किसको पता नही चला इसके कारण ये fort किसीके हात नही लगा..

 जंजिरे का दुसरा खासियत क्या है.. चारो तरफ पुरा समंदर है.. समंदर का पानी जो पुरा नमकीन और खारा है..  लेकिन जो किला.. हमलोग देखने के लिए आज आ गये वो किले के अंदर sweet water मतलब मिठे पानी का lake है.. suppose जो बोट जिसमें आप बैठे है वो उठा के  किले कें अंदर छोड दे तो.. किले के अंदर ऐसे Lake है जो ५० feet और ६० feet गहरे है.. बाहर सब खारा पानी है मगर अंदर सब मिठा पानी है |

और जंजिरे का तिसरा खासियत आजसे इस किले को nine hundred &fifty बरस हो गये.. जंजिरे को साडे नौ सौ बरस हो गये हैसाडे नौ सौ बरस क्या खासियत है.. पानी में जो लहर होती है.. किले के पत्थरो पे टकराटकरा के समुंदर कि जो लाट होती है.. किले कि नीव को अंदर कर गयी.. पर बनानेवाले ने इसे कौनसे मटेरियल से तैयार किया है.. के joint आज भी जगह पे है.. लेकिन पत्थर चार कोनी अंदर चला गया है पर joint नही गया..

अभी किले के अंदर के बारें में.. अपने को पैतालीस मिनिट मे देखना है.. तो हमारा गाईड आपको मेन मेन point दिखायेगा.. वैसे किला देखने के लिए चार घंटा पुरा नही होगा.. ईसी लिए जो जो guide के साथ जाना चाहते है per head चालीस रुपया अभी जमा कर दो.. History ची short story पूर्ण करून Raju गाईड  ने कुणीतरी नवीन गाईडची ओळख करून दिली.. पुढे आलो तर आतील एका कबरीजवळ सभा भरली होती.. कुणीतरी नवीन गाईड माहिती पुरवू लागला.. त्याचं नाव मोईन गाईड.. नाम तो सुना होगा..! जंजिरा किले कि कहानी.. मोईन गाईड  के जुबानी”.. हा episode सुरु झाला.. दरवाजालगतच्या कबरीबददल माहिती मोईन गाईड सांगू लागला..

मोइन गाईड : ये जो कब्र जिसकी है.. उनका नाम है पंचायतन पांच पीर और जिसने किला बांधा है उनका नाम है सिद्धि जौहर.. सिद्धि जौहर महाराष्ट्र में दो आके गये.. अपने शिवाजी महाराज और संभाजी महाराज के जमाने में जो सिद्धि था वो मोघल था.. जो पन्हालगड में वेढा डालके बैठां था.. जिसने ये किल बांधा वो आफ्रिकन बादशाह या काला निग्रो लोग.. जब भी हिंदुस्थान में आने का Espice का बिजिनेस करने आने का.. यहां पे आने के बाद ये बाबा की उपर फुलोंकि माला डालके मन्नत मांग के चला जाने का.. एक वक्त यहां आने के बाद.. संमदर में तुफान आ गया.. तुफान होने के कारन समंदर का पानी इस मजहार को touch हो गया.. पानी को रोकने के लिए उसने किला बांधा हुआ है.. किले का बांधकाम १११८ में शुरू किया और ११४० में complete कर दिया.. यानेकी किला बनाने के लिए उसको टोटल.. पुरा २२ साल लग गया.. २२ साल में इन्होने पुरा २२ एकर का किला बांधा हुआ है.. और इतना बडा किला बांधने के बाद इन्होने हुकुमत अपने नहीं.. अपने पुरखोंके नाम पे चलाया.. जिके नाम पे ये किला बांधा उनके नाम पे हुकुमत करने  का.. पंचायतन पांच पीर अफसाने जलझिरा”.. अभी आप सुनके आये कि मुरुड जंजिरा पे जाना है करके मुरुड तालुका है.. जंजिरा कोई किले का नाम नही है.. क्योकी जंजिरे का कोई meaning कोई अर्थ नही होता है.. असल में इस किले का नाम “जलजझिरा” है.. जल बोले तो अपना मराठी में पानी को कहते है.. और जझीरा या बेट.. जिसको Island कहते है.. ये हम लोगोने.. आप लोगोने Repeat करके इसको जलझीरा से जंजिरा बना दिया.. आज ये किला दुनियाभर में मुरुड जंझिरा नाम से ही famous है..

ऐसा हि हम को हर point पे मालुमात लेना है.. सामने देखो.. दिवारों में पांच विंडो दिखाई देती है.. जैसा दिवाली आतां है घर के बाहर दिये जलाये जाते है.. तो यहां पे किले पर जो लोग रहते थे.. किलेपे साडेपाचसो (५५०) का आबादी था.. वो बाबा के नाम पे ये पांच विंडो में पांच नाम के दिये जलाते थे.. लेकिन अब इस किले में कोई रहता नही है.. इसके लिए ये जगा खाली है.बोलेतो पहिलेच मुकाम पर इतना भारी इतिहास सुनने के बाद मै मंत्रमुग्ध हो गया..!! मुन्नाभाई मोईन गाईड ने त्याच्या खास शैलीत किले का रहस्य उलगडायला सुरुवात केली.. 

या कबरीच्या अलीकडील कमानीतून आत जात वर उजवीकडच्या पायऱ्यांनी पुढे निघालो.. मोईनभाई आगे और बाकी जनता पीछे.. अशी वरात निघाली आणि वर तटबंदीवर असलेल्या तीन तोफांजवळ येउन थांबले.. सगळे येईपर्यंत मोईन दात कोरत थांबला होता.. सगळे पर्यटक व्यवस्थित पहिल्या तोफेपाशी थांबल्याचे पाहून जंझीरा किल्ल्याच्या history चा episode-2 सुरु झाला.. पुन्हा एकदा बंबईया हिंदी मध्ये किल्ल्याचा इतिहास जिवंत होऊ लागला..

मोईन गाईड : “इस तोफ का नाम है कलाल बांगडी.. हिंदुस्थान का पहिला तोफ बिजापूर में मुलुख मैदान है.. दौलताबाद मी मेंढा तोफ है.. और तिसरा अपना ये कलाल बांगडी तोफ.. जो इस जलझिरे में है.. तोफ का weight  बाईस (२२) टन है.. इसका नाम कलाल बांगडी रखा हुआं  है..

ये २२ टन (ton ) का तोफ है.. १२ किलोमीटर इसका रेंज है.. इतना heavy तोफ कही बाहरसे नही लाया हुआ है.. बल्की पंचधातू में इसको यही बनाया हुआ है.. जब भी सिद्दी आफ्रिकासे आनेका .. इसका एक एक पार्ट साथ में लेके आने का.. जॉईन्ट  के अंदर पुरा lead डाला हुआ है.. जिसको अपुन शिसं’ कहते है.. Canon का system ऐसा होता है.. आगे तोफ पुरा खोकला होता है.. ये side में जो.. दो (२) पुरा handle दिया हुआ है इसके निचे दो पाहिये डाल सकते है.. जब भी गोला बारुद डालना है.. दस से बारा आदमी तोफ के पीछे पहीये पे गाडी को धक्के देनेके.. आगे से तोफ में गोल बारुद Load करनेके बाद.. यहा पे छोटा hole है.. जैसे फटाके में वात होता है.. वैसा हि वात उपरसे नीचे छोडते है.. आग लगाने के बाद सामने से गोला fire होता है.. छोटा तोफ ऐसा धूप में गरम होता है.. ये १२ घंटा sun में राहता है.. लेकिन ज्यादा गरम नहि होता है..

किलेका दुसरा तोफ है जिसका नाम है गायमुख तोफ.. सामनेसे उसका आकार देखा पुरा गाय के जैसे बनाया हुआ है.. और चार नंबर का तोफ है जिसका नाम है चावडी.. जिसको लंगडा कासम तोफ कहते है.. ये तीन तोफ किले का सबसे बडा तोफ है.. अभी शायरी सुनो..

तपिश सुरज में होती है
तपिश सुरज में होती है
तडपना जमीन को पडता है
ये आखे मुहोब्बत करती है
और.. तडपना दिल को पडता है.

मुन्नाभाई मोईन का शायराना अंदाजाने या ऐतिहासिक सफरीला रंगतदार करून टाकलं.. हे वेग सांगायला नको.. उपस्थितांची मने मोईन गाईडने शेरो शायरीने झटक्यात जिंकली.. शेर संपता उपस्थित मंडळीचा प्रतिसाद.. वाहवाह.. वाहवाह रुपात बाहेर पडला.. मोईन गाईड पुढे पायऱ्याशेजारील तटबंदी जवळ  थांबला.. आता फोटोग्राफी महत्वाची की शायरी..!! असा to be or not to be level चा यक्षप्रश्न समोर पडला..  म्हटलंटाओ यार फोटोग्राफर हजारो मिलते है शायर कभी कभी मिळते है.. फोटोग्राफीला फुली मारून मुन्नाभाई गाईड ला follow करू लागलो..तटबंदीच्या जवळच एक चोर दरवाजा आहे.. इतिहात्सोक मंडळीचा तांडा त्या इमारतीसमोर थांबला.. मोईन सांगू लागला..

मोईन गाईड : यहाँ अंदर सामने जो window है | उसको नीचे उतरने के लिए स्टेप्स बनाये हुए है | ये अंडरग्राउंड Tunnel है जो समंदर के ६०feet deep रास्ता सामनेकी गाँव में निकाला हुआ है | ये deep रास्ता राजाने इस लिए बनाया हुआ है की दुश्मन ने अगर किले को चारों तरफ से घेर लिया..! तो ये रास्तेसे सामनेके गाँव में जा सकता है | ये रास्ते का युज 1947 तक लोगोने किया | बाद में 72 में Govt. ने इसको seal कर दिया | क्योंकि 1947 के बाद इस रास्ते का कोई maintenance नहीं रहा । समंदर की waves टकरानेसे सुरुंग का पत्थर damage होके इसमें पानी भर गया  Archaelogy Dept. ने जब किले को अपने under ले लिया तो इन्होंने इसके अंदर उतरने के बाद जगह जगह से पानी का Leakage पाया । यानेकी उनको पानी Leakage नजर आया तो ये बढ़ जाएगा करके maintenance नहीं किया और seal कर दिया । और Tourist के लिए Boat चालू किया हुआ है  
अगर ये रास्ता आज भी open होता तो हम लोग समंदर के ऊपर से नहीं निचे से आ  सकते थे । क्योकि 20X 20 का ये रास्ता बनाया हुआ था । जो सामने एक किलोमीटर distance में निकलता है यानंतर एक ब्रेक घेउन पुन्हा शेरोशायरी वर मुन्नाभाई मोईनने मोर्चा वळविला..

मोहब्बतों पे ये कैसा बवाला आया है

मोहब्बतों पे ये कैसा बवाला आया है

जो हमको जान से प्यारा था वो पराया है

गीर पडा हुं मोहब्बतों की भूक से

और.. लोग कहते है शराब पिकेया है


सही है भाई..!! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया एकून मोईन गाईड पायऱ्या उतरू लागला.. पायऱ्या उतरून तटबंदी खाली डावीकडच्या टेहळणी बुरुजाकडे मोर्चा वळविला.. टेहळणी बुरुजाचे बांधकाम अजूनही उत्तम स्तिथीत आहे.. साधारण ५०५० फुटी हा टॉवर अजूनही दणकट आहे.. या बुरुजात १०-१० फुट अंतरावर खांब आधारासाठी उभारले आहेत.. आतला नजारा फार सुंदर आहे.. झरोक्यातून येणारा उजेड.. बारीक खिडक्यांमुळे नेमकं इथ काय आहे शत्रूला समजणार नाही.. असो पुढचा वृतांत मोईन गाईडच्या तोंडून जसा बाहेर पडला अगदी जसाच्या तसा देत आहे खास बंबया इस्टाइल मध्ये..

मोईन गाईड :  ये जो structure है इसे कहते है टेहळणी बुरुज । किला बनाने वाले ने जो किले का खासियात रखा है के जब तक अपना बोट entry gate के पास नहीं आयेगा और उसका entry gate आपको पता नहीं चलता है । और आप लोगोंने देखा entry gate इतना बड़ा है की दोढाइसो आदमी आराम से खड़ा रहा सकता है । ये किला जिसने बांधा सिद्धि जौहर उसने किले के बांधकाम में जो material use किया हुआ है । समंदर की जो wave है ना wave टकराने से इसका पत्थर बाहर से अंदर चला गया । पर joint वैसे के वैसा ही रहा है । पत्थर से ज्यादा strong इसका material है ।  अभी अपना जो contractor होता है slab के अंदर स्टील नहीं डालेगा लाब islab पूरा नहीं करता है । और वोभी स्लैब बारासेपंधरा साल में leakage होता है । बारा से पंधरा साल का बच्चा दौड़के जाएगा उपर से तो निचेवालोंको आवाज जाता है । भाई उपरसे कोई जा रहा है । लेकिन एस स्लैब की मोटाई एन लोगोंने बहात्तर (72) इंच में बनाई है । चार महिना continue बारिश पड़ने के बाद भी एक भी बूंद पानी का leakage नहीं होता है। हजारो आदमी भी उपर से चलेगा तो निचे वाले को पता नहीं चलेगा की उपरसे कोई जा रहा है.. क्युंके ये पूरा बांधकाम इन लोगोने प्त्थारोमे किया हुआ है। सैनिक लोग के लिए बनाया हुआ है। देखरेख करने के लिए। यहाँ पे जो window है ये window का खासियत ये है के अंदर का सैनिक सिर्फ बाहर का clear देख सकता है। लेकिन बाहरवाला नहीं देख सकता है। इसलिए ये किला अजिंक्य है। जिसने ये किला बांधा उसकाही वंश आखिर तक राज करता हुआ चला गया.. याने आज भी ये किला अजिंक्य है। आता खुमासदार दर्दभरी शायरी ऎकयला मिळेल या आशेने टवकारलेल्या कानांचा हिरमोड झाला.. टेहळणी बुरुजाचा धावता दौरा आटोपून मोर्चा.. चोर दरवाजाकडे वळविला.. 

चोर दरवाजाशेजारी  मोईन गाईडने पुन्हा  सभेची सूत्रे हाती घेतली.. 
मोईन उवाच : “आगे आ जावो देखो.. भाई नीचे यहाँ  पे एक गेट नजर आता है। ये किले का second गेट है जिसको emergency exit कहते है। चोर दरवाजा.. ये gate ऐसा था के जब यहाँ के लोग खेतीबाड़ी करने के लिए सामने के गाव में जाता था तो.. आने के लिए उनको देरी हो गया तो मेन गेट बंद होने का। तो अपना जो लोग यहाँ से गया हुआ है उनको लेने के लिए ये गेट  ६ (छे) बजे के बा ओपन करनेके। अपना आदमी अंदर entry किया तो.. दुश्मन या जासूस है तो उप्पर सर में window दिया हुआ है। तिर कमान मारके उनको वाही पे ख़तम कर देने के। लेकिन बनाने वाले ने इस गेट को ऐसा बनाया हुआ है के बाहर से कोई भी देखने वाले के लिए सिर्फ ये छोटा window नजर आता है। निचे उतरने के लिए इन लोगोने estep नहीं दिया हुआ है। इसके लिए किसी को पता नहीं चलता है के.. यहाँ पे gate है... रस्सी ये आदमी को निचे उतरने को और रस्सीसेही आदमी को ऊपर खिंच लेनेके। अगर छोटा नाव है पानी को high Tide है। तो ये लोग का नाव आसानीसे gate पे लगानेका.. नावसे उतरके सीधा gate में entry करनेके। इस किले साडे-पाँचसौ घर का आबादी था.. तिन समाज का लोग निचे रहने का.. तो ये दिवार के सामने जो गेट है.. ये उनका अनाज का गोडाऊन है। जिसको धान्य कोठार कहते है। तिन महिना जब बोट बंद रहनेका तिन महीनेका राशन पानी इसके अंदर store करने के और तिन महीना यहाँ से गुजारा करने के। अभी mobile का ज़माना है तो उसपे ये शेर सुनो।

के पत्थरोंको भी अंदाजे वफा आने लगे है।

के पत्थरोंको भी अंदाजे ऐ वफा आने लगे है।

और मुहोब्बत मै वो भी कसम खाने लगे है

जिस रोज से छोडा था मुहोब्बत का इरादा

उस रोज से miss call बहोत आने लगे है।

आता ही शायरी ऐकुन फक्त झिट यायची राहिली होती. शायरी मिजाजवाला हा गाईड सगळ्यांची मन जिंकून गेला.. हे नक्की..

शायर क्या इल्म है.. आज तेरी शायरी में

कुछ हट के नज्मे  है.. आज तेरी डायरी में

ये दर्द भरे अफ़साने तू.. कहा से लाया है

के विरान-ए-मुल्क में.. एक सुकुनसा आया है


चोर दरवाजा पाहून शायरीची सुसाट एक्स्प्रेस किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या हिरव्यागार तलावाकडे धावली.. सगळे पुन्हा कान देऊन ऐकत आहेत असे दिसताच शायर-ए-आझम मोन बोलू लागला..

शायर मोइन : ये जो तालाब दिखता है ये किले का सबसे बडा तालाब है इस तालाब का नाम है शाही तालाब.. और स तालाब की गहराई पचास से साठ फी गहरा तालाब है। किला बनाने से पहले यहाँ पे कोई तालाब नहीं था और किले के बांधकाम के लिए जो पत्थर लाया हुआ है use किया हुआ है.. ये कही भी.. बाहरसे नही लाया हुआ है। यही का पत्थर किले के बांधकाम के लिए use किया हुआ है। देखो आपके पीछे ये पत्थर का Island है.. बेट है। साही पूरा पत्थर का बेट.. यहाँ पे था। जब राजा को पता चला तो किले में use किया। ब्रेक करने के बाद उसको पानी का झरना लगा। 50से 60feet की गहराई  मै तो पानी को Taste करने के बाद उसको पानी मीठा लगा। तो उसने हर जगह पे खोदाई किया। जगह जगह stream आने लगे झरने के.. उसने ये तालाब पानी पिने के लिए बांध दिया। लोगोंको पानी निकलना है पिने के लिए तो उनको Allowed नहीं किया हुआ है। उनके आसानी के लिए दो side में दो छोटे तालाब बनाये रखे है। जो आते वक्त अपनने Right side में देखा.. एक तालाब उस साइड में भी है। वहा का बस्तिवाला वहा से और यहाँ का बस्तीवाला यहाँ से पानी निकाल सकता है। बड़े तालाब से पानी निकालनेके लिए allowed नहीं किया हुआ था। देखो Half rounding में जो टुटा हुआ दिवार नजर आता है ना.. तालाब के side में.. यहाँ पे.. रानी के लिए शिश महल बनाया हुआ था और जो रानीथी उसका नाम था सिद्धि झुबेदा खान। इतना शानदार काँच का महल बनाया हुआ था। इसके अंदर seven window में seven कलर के glass लगे हुए थे। जब भी sunlight उस काँच पे पड़ने का उसका reflection इस पानी में नजर आने का। पूरा पानी seven रंग में दिखाई देने का.. जैसे अपना Rainbow होता है| लेकिन 1947 के बाद इस राजाने इस palace को demolish कर दिया और यहाँ का सामान अपने palace में लगाया। जो मुरुड आनेसे एक किलोमिटर पहले आप लोगोने Right side में देखा होगा। और तालाब कापानी अभी ख़राब हो गया है। और ख़राब करनेवाला अपनाही Tourist लोग है। जिसको समझता नहीं वो Lays का Packet, पानीकादारुका बोतल, carry bag वगैरा सब अंदर फेक देता है। इसलिए पानी ख़राब हो गया है।  शायरी बरोबर गाईडगिरी करता करता हा माणूस समाजप्रबोधन करीत होता। निदान त्याच्या शायरीचा मान राखून आमच्या बरोबरील जत्थ्यातील एकानेही कचरा तलावात टाकला नाही.. हे त्याचं श्रेय म्हणावे लागेल.. मोइन पुन्हा बोलू लागला.. “ये लोग जो आता है ना और यहां कचरा करता है उसके उपर एक शायरी सुनो. 

  किले के तालाब मे.. कचरा ना डाला करो
  
के किले के तालाब में.. कचरा ना डाला करो
  
कोई इसे भी.. पिने वाला होगा
  
और हर दम युही  मुस्कराते राहो
  
कोई तुम्हे भी चाहने वाला होगा.

कचरेबहाद्दुरांना एक सणसणीत शायरीतून शालजोडा मारत या गाईडदादाने सगळ्यांना समोरचा बाले किल्ला दहा मिनिटात बघून येण्यास फर्माविले.. समोर बालेकिल्ल्यावरील चौथऱ्यावरील सिद्दीचा flag Hosting होत असे अशी माहिती घेऊन जंझिरा किल्ल्याच्या Birds-Eye View बघण्यासाठी तलावाशेजारील पायऱ्यांनी वर निघालो.. हाश हुश्श करत माथा गाठला आणि समोरचा नजारा थक्क करणारा होता गडाच्या चारी बाजूंनी कोण आक्रमण करतय.. काय घडतंय याची बातमी या माचीवरील सैनिक राजाला देत असावेत आणि मग बाकी सगळीकडे High Alert जात असावा.. उत्तरेकडे पडक्या बुरुजामागे पद्म्दुर्गाची पुसटशी आकृती दिसत होती..

कासा पद्म्दुर्गाचे काम सुरु असताना मुरुड जंझिरा किल्ल्यावरुन.. कलाल बांगडीने तोफाचा मारा केल्याचे इतिहासकार सांगतात.. पण सिद्दीला न जुमानता संभाजी महाराजांनी कासा पद्मदुर्गाचे बांधकाम सिद्दीस नेले.. जंझिरा जिंकण्यात अपयश आल्याने सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी पद्म्दुर्गाची निर्मिती करण्यात आली.. एकदा छत्रपती संभाजी महाराज इतके इरेला पडले कि त्यांनी दंडराजपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरून जंजिऱ्यापर्यंत.. समुद्रात भराव टाकून.. सागरी सेतू बांधण्या सुरुवात केली..  अर्ध्यावर बांधकाम झालेही होते पण  पुढे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर दक्षिण विजयाची मोहीम उघडली आणि संभाजी महाराजांना देशावरचे किल्ले ताब्यात ठेवण्यासाठी जंजिराच्या या महत्वकांक्षी योजनेला तिलांजली द्यावी लागली.. आज तेंव्हा औरंगजेबाने मोहीम उघडली नसती तर कदाचित जंजिरावर भगवा फडकला असता..

असो.. बालेकिल्ल्याच्या भोज्जा करून पुन्हा तलावापाशी परत आलो.. परतताना बालेकिल्ल्यावरून सूर्यास्ताचे दर्शन घडले.. कालचा कोरलाई किल्ल्यावरचा सूर्यास्त आणि आजचा हा rapid fire जंजिराच्या बालेकिल्ल्यावरचा.. दोन्ही अजरामर सूर्यास्त.. आठवणींचा दुधारी खजिना शिदोरबंद करीत पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो.. एव्हाना अंधारू लागलं होतं.. बालेकिल्ल्यावरुन निघाले.. पुढे किल्ल्यावरील बाजारपेठेला धावती भेट देऊन शिडाच्या होडीत जाउन बसलो.. हत्ती महाल पाहून खोकरी घुमट या मुरुडजवळील ऐतिहासीक वास्तूला भेट दयायचे लगोलग ठरवले..

खोकरी घुमट : बोट आणि टांगलेले जीव किनारी लागताच भरून पावलो झालो आणि स्टायलिश लिंबू सोडा पिवून हत्ती महालाकडे निघालो.. इथे उर्दू मध्ये काहीतरी लिहिले होते.. अन्वर मियांनी तो लीलया वाचून हे “इदगाह” असल्याचे सांगितले.. गाईड लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा हत्ती महाल म्हणजे हत्ती बांधण्याची जागा आहे... असे कळले होते.. जास्त टाइमपास  न करता खोकरी घुमटाकडे निघालो.. मुरूडच्या किनाऱ्याला पाठ करून.. उजवीकडच्या डांबरी रस्त्याने निघालो.. पुढे एका तिठ्याच्या डावीकडे तीन मोठाले घुमट दिसतात.. खोकरी गावाच्या जवळ असलेली हि सिद्दींची पारंपारिक दफन भूमी.. या तीन घुमटापैकी सगळ्यात मोठा घुमट ही जंजिराच्या सिद्दी सिरू खान (१७०७-१७३४) याची कबर आहे.. आणि दोन छोट्या घुमटांपैकी एक सिद्दी कासम उर्फ याकुतखान याची तर दुसरी खुरीयतखान याची आहे.. रात्रीच्या अंधारात या सिद्दिंच्या कबरीचे फोटोसेशन चालले होते.. टरकली होती.. पण सांगणार कुणाला.. शेवटी सुयोगने नाईट मोड  मध्ये चारदोन फोटो काढले आणि रोह्याकडे निघालो..

खोकरी घुमटाकडून निघालो.. ड्रायव्हिंगची सूत्रे अस्मादिकांनी स्वतःकडे ठेवली होती.. नेव्हिगेटर पोझिशन ला दिनेश भाई.. खोकरी घुमटापासून पुढे निघालो आणि दिनेशला एका सापाचे दर्शन झाले.. ‘साप..साप’.. असं दिनेशने सावकाश सांगितले ते ऐकून गाडीतली मागे बसलेली इरसाल पोट्टी जवळपास किंचाळलीच.. तशी गाडी वळवून घेतली.. पाहतो तर.. तर इव्हिनिंग वॉक ला निघालेला एक तपकिरी साप रस्ता ओलांडत आहे.. असे दृश्य दिसले.. फोटोग्राफर्सने कॅमेरे सरसावले.. माणसांची चाहूल लागल्याने या सापाने इव्हिनिंग वॉक रद्द करून मागे जात झाडात दडी मारली.. पुन्हा गाडी वळवून रोह्याकडे निघालो.. सिंघम गाडीच्या आरशातून लक्ष ठेवून होता.. थोडं पुढे गेलो तसे.. हा दडी मारून बसलेला हा wolf snake हळूच पुन्हा रस्त्यावर आला..  आणि पुन्हा एकदा wolf snake..returns ची जोरात फोटोग्राफी  सुरु झाली.. साप म्हणाला असेल “च्यायला दोनदा माणसं आडवी आली आज कोणाच तोंड पाहिलं काय माहिती”.. असे म्हणून शेवटी पुन्हा एकदा इव्हिनिंग वॉक चा बेत कायमचा’ रद्द करून सापाने झाडात दडी मारली..

पुढे घाट रस्त्याने निघालो रोह्याकडे.. हा रस्ता अत्यंत निर्मनुष्य होता.. जाताना रस्त्यावर बागडणारी बेडकं आत्महत्या करण्यासाठी नेम धरून चाकाखाली येत होती. गाडी जवळ येताच नेमकं चाकाखाली उडी मारणारी हि बेडकं नाकी नऊ आणत होती.. शेवटी बेडकापेक्षा आपला जीव प्यारा म्हणून गाडी निर्धास्त चालवू लागलो.. पुढे एका तिठ्यावर येउन बसलो.. रोह्याचा रस्ता डावीकडे की उजवीकडे हे कळेना.. एका दिशादर्शक बोर्डावर रोह्याची दिशा आकाशाकडे दर्शविली होती.. शेवटी डावीकडे जाण्याचे ठरले.. मध्ये एका दाट झाडीतील रस्त्यावर एका घराच्या कंपाऊंडमधून एक धष्टपुष्ट रानडुक्कर आडवे आले.. रोड ओलांडण्याच्या बेतात असलेले रानडुक्कर भस्सकन आडवे आले.. तसा करकचून ब्रेक  दाबला तर ते झाडीत पसार झाले.. मी रानडुक्कर पाहिल्याचा दावा केला.. पण मंडळाने ते साधे डुक्कर असेल असा होरा काढला.. एवढ्या निर्मनुष्य जंगलात शहरी डुक्कर कुठून येणार..! अशी दलील पेश करताच माझा रानडुक्कर पाहिल्याचा क्लेम सेटल झाला.. आज नशीब चांगलंच जोरावर होतं.. फणसाड अभयारण्याची हुकलेली ट्रीप.. मुरुडरोहा या मार्गातील जंगलात घडली होती.. दोनतीन जंगली प्राणी पहायला मिळणं हे नशिबातच होतं.. रात्री आठनऊ च्या सुमारास रोह्याला पोहचलो.. इथे S.T.  स्थानकाजवळ एका खानावळी मालवाणी  चिकन, शाकाहारी आणि सुरमयी थाळीवर ताव मारून ताम्हीणीचा रस्ता पकडला.. इथे रस्त्यावर बरोबर दुभाजकाच्या पट्टयावर १०० फुटांवर एक पक्षी बसलेला दिसत होता.. गाडी पुढे जात होती.. एकेक पक्षी उडत होता आवाज नं करता..  आणि पुन्हा तसाच पक्षी दिसत होता.. पुन्हा १०० एक फुटावर.. मग कोणता पक्षी आहे यावर चर्चा सुरु झाली... पण हा कोणतातरी नवीनच पक्षी आहे असा क्लेम युवराजांनी केला.. तर कुणी म्हणाला टिटवी आहे.. पण नक्की काही ठरेना.. पुढे एका वळणावर गाडीची लाईट पडताच एक पक्षी उडाला आणि ट्यां-ट्यां असा कर्कश ओरडला.. नवीन पक्षी पाहिल्याचा युवराजांचा क्लेम बहुमताने रद्दबातल ठरवला.. ताम्हिणी घाटात आलो तर खिंडीच्या अलीकडे घाटात कठड्याजवळ रानमांजर पाहायला मिळालं.. फोटो काढणार तेवढ्यात ते पसार झालं.. पुढे plus valley च्या इथे एक ब्रेक घेतला.. आणि ट्रीप संपल्याची घोषणा करण्यात आली..

अलिबाग भागातील जंजिरा.. पद्मदुर्ग.. कोलाबा-राजकोट इत्यादी आरस्पानी जलदुर्ग.. रेवदंडा किल्ला.. सातखणी मनोरा- चौल उध्वस्त किल्ला.. आणि कोरलाईचा टेकडीवरचा लांबलचक पसरलेला किल्ला आणि प्राणी निरीक्षण करून घराकडे निघालो.. पुन्हा एकदा माणसांच्या जंगलात.. पुन्हा नव्याने आयुष्य जगायला..
माधव कुलकर्णी – २०११

Kalal-Bangadi : Canon Made by joining the rings of 5 Alloys

PadmaDurga.. Seen from Fort Janjira!!

Samrajdurga.. Seen from Janjira

One Comment Add yours

  1. Lilies says:

    ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s