सह्याद्रीतील सात आश्चर्ये .. (Sahyadri 7 Wonders)

बाळूबाई-कोंबड किल्ला – भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा – महाकाळ-बितंगा किल्ला – कळसुबाई -साकुरी-किर्डा/किरवा – पंधारा/पांढरा
Balubai – Kunjargad/Kombada Fort, Bhairavgad-Ghanchakkar-Gawaldev-Muda, Mahakaal/Mahankaal-Bitangad, Kalsubai-Sakuri-Kirdi/Kirda/Kirva – Pandhara/Pandhaara

सह्याद्री सेव्हन वंडर्स :-

पुणे – राजगुरूनगर – आळेफाटा – ओतूर – उदापूर-मुठाळणे घाटरस्ता – मुठाळणे –  कोपरे – फोफसंडी – दर्याबाई मंदिर – मांडवी नदीचा उगम – बाळूबाई घाट रस्ता – बाळूबाई-xxxx खिंड – सरळ २०० मि पुढे वर जाण्याची वाट – पायवाटेने – तिरपे मागे चढत – राणुबाई मंदिर –  राणुबाई मंदिराच्या – डावीकडे — ट्राव्हर्स – मग वर चढाई – इथे बाळूबाई डोंगराची लांबलचक टेकडी दिसते.. ती डावीकडे ठेवत डोंगर सोन्डांना वळसे मारीत तिरपे ४-५ किमी वर गेल्यास – बाळूबाई शिखराचे पलीकडचे टोक (खिंडीच्या विरुद्ध दिशेचे) – बाळूबाई शिखर


बाळूबाई शिखर आणि कुंजरगडाच्या पुढचा डोंगर यामध्ये खिंड – कुंजरगड कडे जाणारी वाट – खिंडीत बाळूबाई मंदिर.. पुन्हा वर.. इथे उजवीकडे खाली उतरणारी वाट .. वाटेने बाळूबाई शिखरमाथा डावीकडे ठेवत  ३-४ किमी चा ट्राव्हर्स – पुन्हा राणुबाई मंदिर – वाट उतरून खिंड – घाटरस्ता उतरून – कोतूळ – धामणगाव पाट रस्ता – राजूर – डावीकडे घाटरस्ता – उजवीकडे – शिरपुंजे गाव – भैरवगड वाडी – भैरवगड किल्ला – पायरया उतरून .. ग्रील लागताच डावीकडे ट्राव्हर्स – गुहा नंबर १, गुहा नंबर २. – मग दोन डोंगर ६० अंशाने जोडणाऱ्या – बेचक्यातून वर जाण्यासाठी गुरांची मोठी पायवाट .. गारुबाई मंदिर – मंदिराकडे पाठ करताच समोर दिसणारे टेकाड.. त्याचा माथा डावीकडे ठेवत उजवीकडून तिरपी चाल.. तीनचार टेकड्या तिरप्या चढत गेल्यास पुढे माळरान – आणि समोर घनचक्करचा अर्धवर्तुळ डोंगर – अगदी उजवीकडचा डोंगर कडा म्हणजे घनचक्कर शिखर


घनचक्कर-मुडा यामध्ये खिंड- उतरून पुढे डावीकडून  गवळदेव शिखराला वळसा मारायचा – मग नाकावरून वाट – मुडा डोंगररांगेतील गवळदेव शिखर – पुन्हा खिंड आणि घनचक्कर – उजवीकडून डोंगर वळसा – भैरवगड वाडी –  


राजूर – निळवंडी धरण – पिंपळगाव – समशेरपूर – ठाणगाव – पट्टावाडी – म्हैसमाळ घाट – कोकणवाडी – खीरविरे रस्ता – टाकेद फाटा उजवीकडे – सरळ २ किमी वर – महाकाळ पवनचक्की रस्ता – पवनचक्की घाट रस्त्याने ७-८ किमी वर महाकाळ शिखर पायथा – समोर पहिले टेकाड – मागे गुहा – गुहे शेजारून डावीकडे वर वाट – थोडे पठार – मग डाव्या अंगाने तिरपी चाल करीत महाकाळ शिखराचे अलीकडचे टोक/माथा –  महाकाळ शिखर – बितनवाडी – बितनगड


पुन्हा टाकेद फाटा – घाट उतरून – टाकेद – मुंबई-नाशिक महामार्ग – शेंडी-भंडारदरा रस्ता – बारी गाव –  वारंघुशी फाटा – वाकी – मान्हेरे गाव – पवनचक्की रस्ता – ६-७ किमी वर – डावीकडे पांढरा/पंधारा शिखर — अवघड वाट – तीन डोंगर पार करीत जाण्याची – बेत रद्द – पुन्हा वारंघुशी  फाटा – बारी गाव –  कळसूबाई शिखर शिखराच्या खालच्या  डोंगरावरून – उजवीकडे – ट्राव्हर्स/वळसा मारीत साकुरी डोंगर आणि पुढे किरवा/किर्डा शिखर – पुहा आल्या वाटेने परत


बारी गाव – शेंडी-भंडारदरा रस्ता  – वारंघुशी फाटा – पायवाटेने वारंघुशी वस्ती –  भैरोबावाडी – धनगराचा झाप – कोरफड सोंड – उजवीकडे ट्राव्हर्स –  पंधारा शिखराला उजवीकडून २७० अंशातून वळसा.. मारीत वर चाल.. पंधारा शिखर – भैरोबावाडी कडील नाक – उतरण .. पुन्हा धनगराचा झाप – वारंघुशी फाटा.. राजूर – अकोले – कोतूळ – आळेफाटा – राजगुरूनगर – पुणे  
इसवी सन २०१६ ची वर्षअखेर एखाद्या हटके ट्रेक ने करावी असे वारंवार वाटत होतं आणि बरेच दिवस मनात घर करून राहिलेला एक ट्रेक प्लान डोकं वर काढू लागला.. सह्याद्री सेव्हन वंडर्स – सह्याद्रीतील सात उत्तुंग शिखरांना सात दिवसात गवसणी घालायची.. मग गुगल वर या सात शिखरांची माहिती संकलित करताना असं अशी माहिती समोर आली की.. १४०० मीटर आणि अधिक उंची असलेले असे एकंदरीत १७ शिखरे आहेत.. यातील काही प्रसिद्ध किल्ले तर काही अनामिक डोंगर आहेत..


१४०० मिटर ते १५०० मिटर्स
किल्ले तोरणा (१४०३ मि.), सप्तश्रुंग गड (१४२० मि.), महांकाळ (१४२७ मि.), हरिश्चंद्र गड (१४२८ मि.), पांढरा / पंधारा (१४५० मि.), घोडप/धोडप किल्ला (१४५१ मि.), बाळूबाई (१४५३ मि.), मदन गड – कुलंग गड (१४७० मि.), टकारा (१४७८ मि.), अलंग गड (१४७९ मि.)


१५०० मिटर ते १६०० मिटर्स
किर्डी /किरवा (१५१६ मि.), घनचक्कर (१५३२ मि.)- मुडा- गवळदेव (१५४२ मि.), साल्हेर किल्ला (१५६२ मि.)


१६०० मिटर्स पेक्षा अधिक उंच
कळसुबाई (१६४५ मि.)

वर नमूद केलेल्या यादीतील बहुतांश किल्ले या आधीच सर केल्याने.. यंदा फक्त सात उत्तुंग डोंगर सर करावे असा बेत ठरला..  ठरलं.. सात दिवस सात सह्याद्रीची सात उत्तुंग शिखरे.. “बाळूबाई – घनचक्कर-गवळदेव-मुडा – महाकाळ – कळसुबाई – किर्डा/किर्वा – पंधारा/पांढरा”.. मग मोहिमेचा पूर्वाभ्यास सुरु झाला.. इंटरनेटवर माहिती काढताना.. फक्त.. घनचक्कर डोंगररांग आणि कळसूबाई शिखरांचीच माहिती मिळाली बाकी उरलेल्या शिखरांवर कस जायचे याची फार थोडी माहिती उपलब्ध आहे.. म्हणून.. पायथ्याच्या गावात जायचं आणि मग विचारपूस करून वाट काढण्याचे ठरले..


आय. टी. तील कामे गुंडाळून.. २६ डिसेंबर ला रात्री मोहिमेचा श्रीगणेशा झाला.. टाटा नैनो.. सह्याद्रीत घाटवाटा तुडवण्यास सज्ज झाली.. बाळकृष्ण मुंबईहून येणार असल्याने.. त्याला पुणे रेल्वे स्टेशन वर पिक-अप करून आळेफाट्याकडे निघालो.. रोखीची चणचण असल्याने.. आड गावातला हा नोटाबंदीनंतरचा पहिलाच ट्रेक.. त्यामुळे बेताने खर्च करण्याचे ठरले. आळे-फाट्याला चाय-पाणी ब्रेक उरकून..  ओतूर कडे निघालो आणि पुढे उदापूर – मुठाळणे घाट रस्ता चढू लागलो.. एकदा घाट चढला की आपण दरी उजवीकडे ठेवत एका उंचीवरून वळणावळणाच्या वाटेने पुढे सरकत राहतो.. आधी कोपरे गाव.. आणि मग फोफसंडी.. फोफसंडीच्या अलीकडे एक दरी आहे.. ताम्हिणी घाटाच्या plus valley सारखी.. मुथाळणे ते फोफसंडी रस्ता म्हणजे ऑफरोडिंग साठी एक पर्वणी आहे..


फोफसंडी डोंगर राजीमध्ये वसलेले एक टुमदार गाव.. या गावाला एक चांगला इतिहास आहे बर का !.. कुण्या एके काळी पोप नामक इंग्रज इकडे दर संडे ला हवा पालटायला इथे येत असे.. इथे त्याचा एक बंगला होता.. असे म्हणतात.. म्हणून या गावाचे नाव पोप-संडे असे आणि कालांतराने.. फोफसंडी असे पडले.. इथे एका गुहेत मांडव्य ऋषीनी तपस्या केली आणि एक नदी अवतरली.. ती मांडवी नदी इथे उगम पावते.. तसेच कुंजरगड फोफसंडी मधूनही सर करता येतो.. कुंजरगडाला पलीकडून विहीर गावातून देखील वाट आहे.. फोफ संडी मध्ये नाष्ट्याची सोय लावण्यास रेकी सुरु केली.. शाळेजवळ एक तरुण तडफदार.. सकाळची कोवळी उन्ह खात असल्याचे पाहून संवाद साधला.. १०-एक मिनिट जोरदार संभाषण झाल्यावर.. इथे दर्याबाई मंदिर आणि मांडवी नदीचा उगम असल्याचे कळले.. भाऊकडे चहा नाश्त्याची सोय लावली आणि बाळूबाई शिखराकडे निघालो..बाळूबाई शिखर :- फोफसंडी ते कोतूळ रस्त्यावर फोफसंडी पासून ३-४ किमी अंतरावर एक खिंड लागते.. बाळूबाई आणि डोंगरांना जोडणारा.. या खिंडीतून दोन-एकशे मिटर पुढे जाताच डावीकडे वर एक मंदिर दिसते आणि खाली पायवाट.. हीच बाळूबाई शिखराची वाट.. नैनो रस्त्याच्या कडेला सोडून पायवाटेने निघालो.. १५ मिनिटात मंदिर गाठले.. मंदिराच्या उजव्या अंगाला काही विरगळ उभ्या केल्याचे दिसते.. राणूबाई ची मूर्ती म्हणजे एक शिळा  आहे.. शेंदाराने नटलेली शिळा.. इथे काही क्षण विश्रांती घेवून मंदिराच्या उजव्या अंगाला खेटून सरळ पुढे जाणारया पायवाटेने निघालो.. साधारण वीस मिनिटात.. आपण ट्राव्हर्स मारीत बाळूबाई डोंगराच्या नाकाडापाशी येवून पोचतो.. इथे एक वाट.. झाडीमधून मागे फिरून तिरपी वर जाताना  दिसते.. साधारण पंचवीस मिनिटाची चढाई करून आपण वर येतो.. इथे.. बाळूबाई शिखाराचा डोंगर लांबलचक डावीकडे आडवा पसरल्याचे दिसतो.. इथे काही गुराखी जनावरे सोडून गावगप्पा मारीत असल्याचे दिसले.. तिकडे काही माहिती मिळते का म्हणून निघालो.. इथे एका खडकावर ते तहान मांडून बसले होते.. दुपारचे उन्ह चांगलच तापू लागल होतं तसे.. गुराख्यांनी विचारल पाणी प्यायच का? इथे त्या झरोक्यात पाणी आहे.. आणि पहिला तर खडकाला पडलेल्या ५-६ झरोक्यापैकी एका झरोक्यात.. पाण्याचा साठा होता.. देवाची करणी आणि कातळात पाणी दुसर काय.. ! बिगीबिगी बाटल्या भरून घेतल्या आणि बाळूबाई मंदिराकडे कस जायचं याची माहिती घेतली.. “असच खालच्या अंगाने सरळ पुढ जा.. मग तिथडल्या टोकाकड डाव्या अंगाला वर ह्येंगा.. आणि तिथ खाली खिंड लागल .. मग खाली उतरायचा.. की आल मंदिर”.. काय नाही.. अस दगड रचिले हायेत तिकड..तेच मंदिर..


क्षणभर विश्रांती घेवून डोंगर डावीकडे डोक्यावर आणि दरी उजवीकडे ठेवत मधल्या टापूतील माळ तुडवीत.. पुढे निघालो साधारण ३-४ किमी चा ट्राव्हर्स मारीत बाळूबाई डोंगराच्या पल्याडच्या टोकाशी पोचलो.. डावीकडे वर चढताच खिंड दिसू लागली.. उतत्या पायवाटेने खिंडीत पोचलो आणि .. बाळूबाईचे मंदिर दिसले.. इथे मध्यभागी एक दगड आणि भोवताली अर्धवर्तुळ.. गारगोटीचे दगड रचल्याचे दिसले.. मंदिराच्या इथून थोड वर चढून जाताच सह्याद्रीच्या विश्वरूपातील एक लहानसा नजारा आहे.. मंदिराच्या मागच्या बाजूस पाठ करून उभे राहताना.. डावीकडे समोर.. आडवा पसरलेला कुंजरगड/कोबड किल्ला.. त्यामागून हळूच डोके वर काढणारा.. हरिश्चंद्र डोंगर.. टोलार खिंड.. अगदी डावीकडे अम्बेदरा आणि त्यावरची डोंगररांग.. आणि दूरवर पसरलेला सह्याद्रीचा डोंगर-दर्याने वेढलेला मुलुख..  अस्सा भन्नाट नजारा या ठिकाणी आहे..


बाळूबाईला दंडवत घातले आणि फळ-पाणी ब्रेक घेवून.. मागे फिरलो .. आता आल्या वाटेने न जाता.. खिंडीकडे पाठ करून उजवीकडे एक वाट डोंगराच्या मधल्या अंगाला खाली उतरल्याचे दिसले.. इथे एक भला मोठा ट्राव्हर्स आहे.. बाळूबाई शिखराला घड्याळाच्या उलट्या दिशेने उजव्या अंगाने वळसा मारणारा.. तिकडे उतरलो आणि पायवाटेने.. वळसा मारू लागलो.. समोर.. अंबेदरा च्या वरचा डोंगर आणि .. घुबडी डोंगर उजवीकडे.. कुंजरगड मोठ्या दिमाखात उभे ठाकल्याचे दिसले.. चालताना पायवाटेवर.. पाण्याचे एक-दोन साठे..असल्याचे दिसले.. उन्हाळ्यात मात्र इथे पाण्याची वानवा असेल हे नक्की..


डोंगराला मध्यान्ही वळसा मारीत.. ४-५ किमी चा फेरफटका मारून राणूबाई मंदिराशी येवून पोचलो.. इथे मंदिराच्या सावलीत.. डोंगरगप्पा करीत एक ब्रेक घेतला आणि पुन्हा नैनो पाशी येवून पोचलो.. साधारण ३.३० वाजले असावेत.. सह्याद्रीचे एक शिखर आज सर झाल्याचा आनंद मन भारावून गेला..याची देही याची डोळा.. बाळूबाई शिखराची चढाई अनुभवता आली याचा आनंद विशेष होता.. इथे उद्याच्या शिखराची निश्चिती केली.. शिरपुंजे.. भैरवगड.. मग ट्राव्हर्स मारून घनचक्कर.. आणि वेळ मिळाल्यास गवळदेव.. असा मार्ग ठरला


मु. पो. शिरपुंजे :- बाळूबाई आणि भैरोबाचा डोंगर यातील घाटरस्त्याने कोतूळ कडे निघालो.. १०-१२ किमीचा घाट हा नैनोची सत्वपरीक्षा पाहणारा होता.. पण नैनो एव्हाना डोंगर वाटांना सरावली होती.. तासाभरात कोतूळ गाठल.. आणि इथे साईनाथ हॉटेलात.. नाश्त्याची सोय लावली.. वडा-उसळपाव.. पोहे..आणि घनदाट दही.. आणि मिनी-बालुशाही.. असा बेत होता.. तृप्ततेची लकेर कानी पडताच राजूरकडे प्रयाण केले.. राजूर – मग डावीकडे घाटरस्ता आणि मग सगळे उजवीकडे जाणारे रस्ते पकडत.. शिरपुंजे गावात येवून पोचलो.. इथे भैरोबागड वाडीच्या अलीकडे चार-दोन घरांच्या वस्तीत मुक्कामाची आणि वाटाड्याची सोय लावली.. धोंडीबा बहिरू हिंदळे भाऊ वाटाड्या म्हणून तयार झाले.. रात्री पिठल भाकरी खावून.. पोटाची भूक शमवली.. आणि ताबडतोब वेळ न दवडता निद्रिस्त झालो..


बाळूबाई मंदिराच्या मागे उभा ठाकलेला कोंबड किल्ला


घनचक्कर वर चक्कर :- सकाळी साडेसहाला उठून घनचक्कर वर चक्कर मारण्यासाठी तासाभरात सज्ज झालो..  यंदा या ट्रेक ला दोन वाघ (एक कन्नड तर एक मराठी).. एक सिंह.. एक कोकरू आणि एक शिंगरू अशी टीम होती.. नाश्त्यासाठी फोडणी भात आणि पिठलं खावून.. सगळ्यांच्या पोटाला आधार मिळाला.. एका वाघाने तब्बल तिन गडवे दूध पिवून शेवटी न्याहारीला ब्रेक लावला.. वाडीतून.. अर्ध्या तासात कच्च्या गाडीरस्त्याने भैरवगड च्या कमानीपाशी येवून पोचलो.. इथे धापा टाकणाऱ्या एका वाघाला खिजवलं आणि वाघ भैरवगडाकडे धावू लागला.. आम्हीही मग भैरवगडाची साठ अंशाच्या चढाईची अंगावर येणारी वाट छाताडावर घेत पावले टाकू लागलो.. दम काढणारी वाट चढताना.. श्वासांचा निचरा झाला होता.. अधून मधून उबळ येवू लागली.. पण पावलांना पावले वाढवत.. भैरवगडाची तीव्र चढाई १ तास ११ मिनिटात पूर्ण केली.. भैरवगड आणि घनचक्करच्या खालच्या अंगाचा डोंगर यांना जोडणाऱ्या खिंडीत पोचलो.. इथून वाडीकडे पाठ करून  पाहताना.. हरीश्चंद्रगड.. न्हाप्ता.. तर मागे कळसुबाई शिखराचे एक विहंगम दृश्य दर्शन आहे.. भैरवनाथाचे आशीर्वाद घेवून मग घनचक्कर कडे जावे म्हणून अंगावर येणाऱ्या पायरया चढून .. भैरवगडाच्या माथ्यावर पाय ठेवला.. इथे वाटेवर डावीकडे पाण्याचे कोरीव खांब टाके आहे.. इथले गारेगार पाणी पिवून.. धन्य झालो.. आणि कपारीतल्या भैरवाचे दर्शन घेण्यासाठी पायवाटेवरील कातळावरून उतरू लागलो.. इकडे माकडांचा भरपूर उपद्रव आहे.. म्हणून पादत्राणे सेफ करूनच मग भैरुबाच्या गुहेत प्रवेश केला.. इथे सलग कातळात कोरलेली भैरवनाथांची घोड्यावर आरूढ अशी एक विलक्षण सुंदर मूर्ती आहे..  आणि गुहेत एक शांत गारवा.. थेट काळजाला हात घालणारी गूढ शांतता.. आणि अंतर्मुख करणारे वातावरण.. गुहेत.. पाच दहा मिनिटे.. शांत बसून राहिलो.. वाटाडे धोंडूमामांनी.. मग काही कथा ऐकवल्या.. कुठल्यातरी गावकरी दादाच्या अंगात आलेला गवळदेव.. मिरगुंडा आणि त्याने उचलून मांडीवर ठेवलेला भैरुबाच्या समोरचा भला मोठ्ठा दगुड.. आणि वारं निघून गेल्यानंतर.. न हलणारा दगड मग तो उचलून पुहा खाली ठेवताना झालेली बाकीच्यांची तारांबळ.. आणि शेवटाला पुन्हा गवळदेवाचे वारे अनागत संचारल्यावर पुन्हा जागी ठेवलेला दगड आम्ही आश्चर्य कारक नजरेने डोळे विस्फारून पाहून लागलो..


 v


भैरोबाच्या अंगावर असलेला शेंदराचा थर काढण्यासाठी आलेले एक्स्पर्ट आणि शेंदराचा थर कोसळून पुढ्यात ठेवलेला दुभंगलेला दगड सारेच विलक्षण.. देवाची महती अधोरेखित करणारे.. वादातीत सत्य.. तर अशा एक न अनेक कथा ऐकून.. घनचक्कर कडे मोर्चा वळविला.. जाताना देवाला साकडे घातले.. आणि वन-पीस मोहीम पार पडू दे अशी याचना केली..
 
मागल्या भैरवगड वारीतील अन्ना नामक वाघाने केलेली ‘मेथी नि ढोकळी’ ची रेसिपी आठवली आणि पोटात गोळा आला.. पुन्हा खांब टाक्यापाशी आलो.. एव्हाना तिन गडवे दूध पिणारा वाघ डरकाळ्या फोडित डबा टाकण्यास दूर कड्यावर निघून गेला होता.. तो परतला तसे पुन्हा खिंडीकडे निघालो.. वाघ परतेपर्यंत दूध पिवून तर्र झालेले शिंगरू उर्फ बाळकृष्ण घायकुतीला येवून ओकारया करू लागले.. ते पाहून कोकरूला पण उबळ आली.. पण ती कशीबशी त्याने थोपवली.. शिंगरूचा ओक्साबोक्सी ओकाण्याचा कार्यक्रम सुरु असताना.. गुहेत गप्पागोष्टी सुरु झाल्या.. यंदा अन्नावर डायलॉगबाजी सुरु झाली.. सगळ्यांना आधार देण्याचा अन्नाचा पिंड असल्याने.. त्याला बादलीभर दूध पिणारा सांताक्लॉज.. असे नाव देण्यात आले.. तर हा आमचा शांताक्लॉज डोक्यावर दिड लाखांचे भुरभुरणारे रेशमी केस उडवीत आणि पायवाटा तुडवीत.. या अगम्य गुहेत पोचला होता.. दिनेश च्या म्हणण्याप्रमाणे हा जगातल्या कुठल्याही चारचाकी गाडीची स्लेजगाडी करू शकतो.. आणि याने जर बैलांकडे नजर फेकली तरी त्यांचे रेनडियर होतात.. असा हा महाबली शांताक्लॉज ..


एका ब्रेकनंतर ट्रेक सुरु झाला..खिंडीकडे उतरताना पायरयावरून घनचक्कर माथ्याचे दूरदर्शन घडले.. इवल्या पण लंब्याचौड्या आडव्या धुळीने माखलेल्या पायरया.. बेताने उतरून खिंडीत दाखल झालो.. आता.. घळ उतरून एक इथून तिथून ग्रील मारलेला लहानसा ट्राव्हर्स आहे.. तिथवर पोहचायचं मग.. इथे भैरोबाचा डोंगर आणि शेजारचा घनचक्कर खालच्या अंगाचा डोंगर साधारण ७० अंशामध्ये जोडला आहे.. इथेच ग्रील मधून एक वाट डावीकडे डोंगराच्या खालच्या अंगाने.. वळसे घेत जाते.. उजवीकडे दृष्टीभय देणारी दरी आणि डावीकडे डोंगरकडा २०-२५ फुट ठेवत.. ट्राव्हर्स सुरु झाला.. तसे कोकरू ला उबळ येवून लागली.. डोंगराला वळसे मारीत तसाच ट्राव्हर्स पार केला आणि पहिल्या गुहेत पोचलो.. हि — मामंची वडिलोपार्जीत गुहा.. आमच्या आज्याने हि गुहा खोदली असे सांगताना.. मामांचा उर अभिमानाने भरून आला होता.. इथे कोकरू आणि शिंगरू परत मागे जातो अशी विनवणी करू लागले पण.. इथे वाटाड्या, दोन वाघ आणि एक सिंह याची एक लहानगी गोलमेज परिषद भरवण्यात आली त्यात असे ठरले कि.. पुढे एक अलिशान गुहा आहे.. तिथे कोकरू आणि शिंगरू ला सोडून उरलेले मावळे.. घनचक्कर पाहण्यास जातील.. घसरड्या वाटेने ओकार्या करीत रपेट  सुरु ठेवली.. आणि आलिशान गुहेच्या पुढ्यात येवून पोचलो.. इथे गुहेच्या खालच्या अंगाने जाणारी पाण्याची वाट आहे.. सुकलेला धबधबा.. त्याला आडवे जाणार्या वाटेवर शेणाचा ४-५ टन ठार पडला होता.. या शेणाच्या थरावरून शेनारोहण करीत वर पोचलो आणि गुहेचे पलीकडचे टोक जवळ आले.. इथे एक ब्रेक घेण्यात आला..


कोकरू आणि शिंगरू ला शिदोरी आणि पाणी देवून पुढे निघालो.. ४ वाजेपर्यंत वाट पहा आणि मग खाली जा असा आदेश मामा वाटाडे यांनी पोरांना दिला.. खाली जाण्याची वाट दाखवली आणि मग.. दोन वाघ.. एक सिंह.. आणि मामा वाटाडे.. घनचक्कर कडे निघाले.. गुहा मागे सोडत पुन्हा दोन डोंगरांना ६०-७० अंशाने जोडणाऱ्या घळईतून वर जाणारी एक ऐसपैस वाट आहे.. तिकडे निघालो.. झाडीझुडुपातून जाणारी हि वाट बरीच रुंद आणि मळलेली आहे.. ठिकठिकाणी गुरांनी सोडलेल्या शेणाची निशाणी या वाटेवर पाहायला मिळते.. झाडीतून वाट चढून वर येताच एक लहानगे झाड आहे.. समोर दूर पाण्याची वाट दिसते.. उजवीकडे एक डोंगराची छाती.. पाणी भरण्यासाठी निघालो.. इथे वाटेवर गारुबाईचे दगडी मंदिर आहे.. मूर्ती भग्नावस्थेत आहे.. आजूबाजूला.. अर्धवर्तुलाकृती गारगोटीचे थर रचले आहेत..


रानातले गार पाणी पिवून भर उन्हात घनचक्कर ची चढाई सुरु केली.. झाडापाशी आलो.. इकडे एक वाट.. उजव्या डोंगराच्या .. उजव्या अंगाने वर जाते.. इथे बर्यापैकी जंगल आहे.. हे पार करताच आपण घनचक्कर च्या वरच्या बाजूला येतो.. इथे डावीकडे तिरपी चाल आहे.. डोंगर माथा डावीकडे ठेवत मळलेल्या पायवाटेने पुढे चालत राहायचे.. या वाटेवर २-३ गुहा लागतात.. आणि सुकलेले धबधबे.. ह्या गुहा उजवीकडे आणि डोंगर माथा डावीकडे ठेवत चालत राहायचं आणि हा ३-४ किमीचा हा मार्ग पार करताच आपण.. घनचक्करच्या आडव्या पसरलेल्या शेवटच्या टेकडापाशी पोचतो.. समोर.. उजवीकडे घनचक्करचा सर्वोच्च माथा.. डावीकडे एक डोंगराचे टोक आणि मध्ये सांधणारी डोंगर भिंत.. असा नजारा आहे.. इथे एक झाडाखाली वनभोजनाचा आनद घेतला.. मध्यान्ही च्या भर उन्हात घनचक्करच्या सर्वोच्च माथ्याकडे नजर टाकली

क्षणभर विश्रांती घेवून.. घनचक्कर चा माथा उजवीकडे ठेवत.. शिखराला गवसणी घातली.. वेळ दुपारी ३.३० .. घनचक्कर..  महाराष्ट्रातले तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आज सर झाले.. इथला माहौल काही औरच होता.. शिखरावरून उजवीकडे.. पाबरगड.. समोर.. भंडारदरा जलाशय.. पलीकडे.. अलंग.. मदन कुलंग.. कळसुबाई डोंगररांग.. आजोबा मात्र.. गवळदेवाच्या मागे दडलेला असतो.. पुढे कात्राबाई चा सुळका.. जिकडे नजर फेकावी तिकडे दऱ्या-खोऱ्या.. उत्तुंग डोंगर.. सह्याद्रीच्या डोंगरांचे पिवळ्या हिरव्या रंगाने नटलेले पदर.. दृष्टीभय देणाऱ्या कातळधारा.. आणि तळपत्या उन्हात रुंजी घालणारा वारा.. सह्याद्रीच्या या खांद्यावरून त्या खांद्यावर वाहणारा.. मुक्त वारा.. शिखरावर दहा-एक मिनिटे रेंगाळलो.. आणि घनचक्कर ला जोडून असणाऱ्या टेकाडावरून पलीकडच्या डोंगरटोकाला जोडणारा.. मध्ये एक दांड आहे त्यावरून निघालो.. पंधरा वीस मिनिटात घनचक्कर चे पलीकडचे टोक गाठले.. इथून पाहताना.. घनचक्कर ची एक सोंड.. एखाद्या भिंतीसारखी खाली आडवी काटकोनात टेक ऑफ करताना दिसते.. उजवीकडे समोर.. गवळदेवाचा डोंगर.. स्थानिक याला गवळीदेव असे म्हणतात.. घनचक्कर आणि गवळीदेवाचा डोंगर यामध्ये एक खिंड आहे.. ती उतरून थोडं वर चढायचं आणि मग डावीकडे.. गवळीदेवाच्या डोंगर पायथ्याने चालत.. डावीकडचे नाक गाठायचं.. इथून.. नाकाडावरून चाल करीत गवळीदेवाच्या डोंगरमाथ्यावर पोहोचायचं.. सकाळी २-३ तास उशीर झाल्याने.. गवळीदेव दर्शन कार्यक्रम रद्द केला.. पुन्हा परत येवू असे म्हणून.. अलीकडच्या बाजूने घनचक्कर उतरण्यास सुरुवात केली.. टेकाड उतरून मागे फिरलो आणि मग.. उजवीकडून खाली उतरलो.. आता.. पुन्हा घनचक्करचा वरचा डोंगर डावीकडे ठेवत तिरपे चालत राहिलो.. साधारण एक-दिड तासाच्या घनचक्कर माथ्याला उजव्या अंगाने प्रदक्षिणा मारीत.. पुन्हा गारुबाई मंदिरापाशी येवून पोचलो तोवर संध्याकाळचे ५ वाजले होते.. गारुबाई मंदिरापासून पुन्हा शिरपुंजे गावाच्या दिशेने असलेली घळइ उतरून आलिशान गुहेपाशी आलो.. एव्हाना.. कोकरू आणि शिंगरू खाली निघून गेलं होतं.. मग गुहेच्या अलीकडून डावीकडे खाली एक मळलेलली पायवाट उतरते.. त्या पायवाटेने निघालो.. वळसे मारीत उतरणारी पायवाट आपल्याला एक घळईपाशी घेवून येते.. घळ उतरली की एक कातळात कोरलेला ट्राव्हर्स सुरु होतो.. इथून उजवीकडे पाहताना.. भैरवगड, दोन गुहा आणि घनचक्कर कडे जाणारी वरची घळ दिसते.. ट्राव्हर्स पार करून सोंडेवरून उतरणारी वाट दिसते.. मग पुढे दोन वाटा फुटतात.. यातली उजवीकडची वाट आपल्याला भैरवगड वाडीकडे घेवून जाते.. वाडीच्या अलीकडे.. घनदाट जंगल आहे.. गावातून मामांच्या घराकडे जाताना.. गावकरी आणि मामा यांच्या संवाद रंगला.. “काय गडावर गेल्ता जणू.. तिकडं.. घनचक्कर ला गेलो होतो.. चढली व्ह्य पोरं हि.. व्ह्य.. चढली.. पण .. एक वकतय.. एक खोकतय.. कसलं’ काय..!! या वाक्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला आणि इतका वेळ धीरगंभीर असलेला मुका वाघ मनापासून बेंबीच्या देठापासून हसला..!!


संध्याकाळी सहाच्या सुमारास भैरवगडवाडीत पोहोचलो आणि घनचक्कर पे तिन घनचक्कर ट्रेक ची सांगता झाली.. आता लक्ष्य खीरविरे गावाजवळचा महाकाळ शिखर.. शिरपुंजे गावातून धोंडू मामांचा निरोप घेतला.. आणि राजूर गाठलं.. जवळच मातोश्री हॉटेल वर जेवणाची सोय लावली.. जेवण उरकून पट्टावाडीकडे जाण्यास निघालो.. नीळवंडी धरण.. मग पिंपळगाव रस्ता आणि समशेरपूर.. मग ठाणगाव. असा मार्ग ठरला.. महाकाळ डोंगर पट्टावाडी जवळ असल्याने हि वाट निवडली.. रस्ता अगदीच खराब असल्याने नैनो च्या पायात अधून मधून फेफडे भरत होते.. पण ती नेटाने दौडत होती.. समशेरपूर जवळ.. मोठा वाघ आणि सिंघम गुगल नकाशाच्या नदी लागल्याने.. समशेरपूर गावात चकवा लागला.. आणि पुन्हा ७-८ किमी चा कच्चा रस्ता परत फिरून.. समशेरपूर ला आलो.. इकडे रीतसर लोकल वाटाड्या कडे चौकशी करून ठाणगाव गाठलं.. आणि पेट्रोल पंप बंद असल्याने जवळच एका शिवमंदिरात तंबू टाकले.. थकलेले मंडळ पाठ टेकताच आडवे झाले..


सकाळी मंदिराच्या घंटारवाने जाग आली आणि सहा वाजल्याचे कळले.. ताबडतोब पेट्रोल पंप गाठला.. आणि टाकी फुल्ल करून टाकली.. ठाणगाव चौकात हेमाडपंती मंदिरासमोर गाडी लावून.. ठाणगावचे दिलदार पप्पूशेठ भोर दुकानदार आणि ठाणगावातील इतिहासप्रेमी अंकुर काळे यांची भेट घेतली.. महाकाळ ला कसे जायचे यावर लघुसत्र घेवून.. इथे उसळपाव आणि चहा अशी नाष्ट्याची सोय लावली.. अंकुर आणि पप्पुशेठ यांचा निरोप घेवून पट्टावाडी गाठलं.. तिथे निवृत्ती गोडे मामांना भेटून मार्ग निश्चिती केली.. खिरविरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जायचं.. आधी टाकेद चा खाली उतरणारा रस्ता सोडायचा आणि पुढे एक आंब्याचे झाड आहे.. तिथून उजवीकडे कच्च्या रस्त्याने वळायचं.. हा रस्ता.. आपल्याला बितनवाडी आणि महाकाळ डोंगरावर घेवून जातो.. पुढे दोन रस्ते फुटतात यातला डावीकडचा रस्ता महाकाळ डोंगरावरील पवनचक्की कडे तर उजवा बितनवाडीकडे नेतो..गूढरम्य महाकाय महाकाळ :-


भैरवनाथाच्या भीतीने पळालेला महाकाळ राक्षस.. या डोंगरात एका गुफेत लपून बसल्याचे भैरवनाथाला समजले आणि मग नाथांनी त्याला शोधून या गुफेत बंद करून टाकले आणि गुहेचे दार एका मोठ्या शिळेने बंद करून टाकले अशी एक आख्यायिका आहे.. पवनचक्की मार्गाने.. म्हैसमाळ गाव आणि पुढे टाकेद फाटा.. तिथून खाली न जाता सरळ जाऊन एक रस्ता उजवीकडे मागे फिरून वर डोंगर सोंडेवर जातो.. त्या रस्त्याने ऑफरोडींगचा थरार अनुभवत वर निघालो.. नैनो एखाद्या निष्णात ट्रेकर सारखी चाल करीत होती.. वन पीस महाकाळ डोंगराच्या वर आलो.. आणि रस्ता संपला आणि इथून पुढे दोन डोंगर चढून गेलं की महाकाळ डोंगरमाथा.. भर उन्हात.. महाकाळ वर चढाई सुरु केली.. पहिले टेपाड डावीकडे ठेवत एक लहान ट्राव्हर्स मारला आणि वर डावीकडे तिरपे  चढलो आता एक वाट उजवीकडे वळसे मारीत वर जाताना दिसत होती पण.. डावीकडे.. वरच्या टेपाडाच्या पोटात असलेली एक कमनीय गुहा खुणावत होती.. म्हणून पायवाट सोडून गुहेकडे मोर्चा वळविला.. रस्ता अगदीच गवताळला असल्याने.. इथे गुहेकडे जाताना एक इवले फुरसे आणि पुढे दहा पावलांवरच एक करड्या रंगाचं सापाचे पिल्लू पायाखालून लुंगी डान्स करीत सळसळत गेलं.. आणि महाकाळाच्या गूढतेची प्रचिती आली.. गुहेच्या खाली पोचलो.. आणि गुहेत आणखी काही सर्पकुमार नसल्याची खात्री करूनच खोबणीत पाय रोवला.. गुहेत प्रवेश केला. इथला गारवा आणि समोर दिसणारी पट्टा डोंगर रांग.. अशी दृशपर्वणी या महाकाळाच्या गुहेतून पाहायला मिळते.. इथे गुहाभोजनाचा आस्वाद घेण्यात आला.. गूळ-शेंगदाणे, छोटा सिंघम तन्मयचे राजगिरा बॉम्बस आणि सिंघमने आणलेला मेवा खावून.. गुहाभोजनाची सांगता झाली.. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या आणि महाकाळ शिखरावर जाणायची मानसिक तयारी झाली..


 
गुहेच्या डावीकडून एक वाट कातळातून वर जाते हे मोठ्या वाघाने हेरले आणि किरकोळ प्रस्तरारोहण तंत्राने हा कातळ चढून महाकाळ माथ्याच्या पुढ्यात येवून पोचलो.. इथे डावीकडून एक वाट शिखरावर जाताना दिसते.. टेकडाच्या डाव्या अंगाने चालत.. शिखरावर चढाई केली.. मिशन फत्ते.. इथे शिखरावर.. नजर फेकताना.. मागे पट्टा रांग आणि उजवीकडे नाशिकातील डोंगररंग दिसते.. महाकाळ डोंगराचा पसारा फार मोठा आहे.. त्याला ३ पदर आहेत.. आणि खाली झेपावणाऱ्या बर्याच सोंडा.. दोन डोंगराच्या पदारातील खोरे.. सारच विलक्षण.. इकडे उजवीकडे पाहताना.. कातळकोरीव गुहा ठिकठिकाणी दिसतात.. यातील अलीकडच्या शिखराजवळच्या गुहेत.. मोठ्ठा वाघ जाऊन आला.. तिथे त्याला प्राण्यांची विविध प्रकारची हाडे सापडल्याने हि गुहा म्हणजे वाघ (बिबट्या)बीळ असल्याचे नक्की झाले.. महाकाळ मोहीम फत्ते करून जाता जाता बितनगड सर करावा म्हणून बितनवाडी कडे निघालो.. महाकाळ पवनचक्की मार्ग.. परत उतरून.. पुन्हा कच्चा तिन रस्ता.. आता डावीकडे.. बितनवाडी.. सरळ.. आपण ज्या रस्त्याने आत आलो तो रस्ता..


बितनगड किल्ला :- बितनगड किल्ला हा ग्याझेटीअर्सच्या नोंदीमध्ये नव्हता असे म्हणतात.. इंग्रजांच्या दफ्तरी या किल्ल्याची नोंद नव्हती.. म्हणूनच हा किल्ला त्यांनी उध्वस्त केला नाही आणि अजूनही त्याच्या पायऱ्या अगदी सहीसलामत आहे.. बितनगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी.. पट्टावाडी – कोकणवाडी – टाकेद फाटा – बितनवाडी असा रस्ता आहे.. शिवाय मायदरा गावातून एक वाट गडावर येते.. किल्ल्यावरून.. शेणीत सुळक्याचे जोरदार दिव्यदर्शन घडते.. महाकाळ डोंगराचा एक पदर बितनगड डोंगराला खेटून उभा आहे.. आणि एक पदर बितन वाडीच्या अलीकडे खाली उतरतो..  बितनवाडी तून एक खराब गाडीरस्ता गड पायथ्याशी जातो.. गाडीरस्ता संपतो आणि मळलेली पायवाट सुरु होते.. हि वाट थोडं चढून.. बितनगडच्या कातळ्याभिंतीला समोर पाहून उजव्या अंगाला वळायचं.. ही वाट झाडीझुडुपातून जाते.. वाटेत एक आंब्याचे.. भले मोठे झाड आहे.. इथून पुढे जाताच एक वाट बितनगडाच्या उजव्या अंगाच्या नाकाकडे वर जाते.. ती वाट चढायची.. आणि आपण सपाटीवर येतो.. इथून थोडं पुढे जाऊन.. मग डावीकडे सरळ डोंगराच्या तीव्र उतारावर चढाई करीत आपण.. बितनगडाच्या उजव्या नाकाखाली येवून पोचतो.. इथे थेट पायऱ्या चालू होतात.. आणि त्या थेट वरपर्यंत आहेत..सुरुवातीच्या काही पायऱ्या सोडल्यास .. इतर पायऱ्यांच्या दुबाजूस.. खोबणी आहेत.. ह्या डोंगराच्या नाकावरून पुढची सोपी चढाई आहे.. अधून मधून थोडा घसारा आहे.. पायऱ्या संपताच एक पाण्याचे टाके.. आणि थोडं वर जाताच.. एक खांब असलेली गुहा आहे.. इथून डावीकडे.. एक वाट झेंडा बुरुजाकडे जाते..


महाकाळ-बितनगड भटकंती पूर्ण करून.. टाकेद कडे निघालो.. टाकेद कडे उतरणाऱ्या घाटवाटेवर विश्रांती घेतली.. इथे बितनगडावर झालेल्या दोन वाघांच्या झडपीवर कोकरू ला भाषण करण्यास सांगितले.. कोकरू म्हणाला..  “मिनी..बितनगडावर गेल्तो.. तिकडं दोन वाघ गड चढून गेल्ते.. मिनी पानी पिनार.. तेव्हढ्यात मोठ्ठा वाघ छोट्या वाघाला म्हणाला.. चला खाली चला खाली.. मिनी पटापट पानी पिलतं.. दोन वाघांनी एकमेकांना बोचकारले.. ते मिनी पाहिलं.. आणि मग मोठ्ठा वाघ चिडला.. आणि जोरशात.. खाली निघून गेल्ता.. ते पन मिनी पाहिलं”


सूर्यदेव.. दिवसभर तळपून आता क्षितिजावर रेंगाळले होते.. आम्हाला निरोप देवून सह्याद्रीच्या मेगा रंगमंचावरून सूर्यदेवाने तात्पुरती एक्झिट घेतली.. आणि इथे फळ-फळावळ ब्रेक घेवून टाकेद गाठलं.. टाकेद चौकात लसूण-चटणी युक्त वडा-पाव खावून.. मुक्कामाची सोय लावण्यासाठी हायवे गाठला.. भंडारदरा हायवे गाठून नाशिक रस्त्यावर आलो.. इथे.. फाट्या पासून उजवीकडे.. बऱ्यापैकी स्वस्त लॉज पाहून.. १००० रुपयाची रूम ६५० ला डन करून टाकली.. आणि कुकुचकू डिनर खावून मस्तपैकी ताणून दिली.. सकाळी कळसुबाई-किर्वा/किर्डा-पांढरा यापैकी कुठला डोंगर करावा.. याबद्दल काथ्याकूट करून.. शेवटी बघू उद्या असे म्हणून.. आडवे झालो..


  


कळसूबाई शिखर :- सकाळी सहाला जाग आली आणि मंडळ.. बिगीबिगी तयार झाले.. नाशिक फाट्यावरून भंडारदरा शेंडी रस्त्याने निघालो.. जाताना वाटेत.. घाटनदेवी फाट्यावर.. एके ठिकाणी म्यागी.. पोहे आणि उसळपाव असा नाष्टा.. खावून आजच्या भटकंती साठी तयार झालो.. बारी गावात पोचलो आणि तिकडून मग वारांघुशी फाट्यावर.. पांढरा डोंगर कुठाय असं एका काकांना विचारलं.. तर असा कुठला डोंगर नाही.. मग वारांघुशी फाट्यावरून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवून विचारलं.. हा कोणता डोंगर.. हा तर पंधारा.. बर.. मग इकडे कसं जायचं.. तिकडे.. मान्हेरे गावातून.. पवनचक्की रस्त्याने जाता येतं.. पण कुणीही नक्की सांगत नव्हतं की नेमकं जायचं कसं.. शेवटी.. पवनचक्की मार्गावरून ट्राय करू असे म्हणून तिकडे निघालो.. ऑफरोडींग चा थरार अनुभवत पवनचक्की माथा गाठला.. पण इथून पंधारा करणे म्हणजे एक दिव्यच.. म्हणून .. पवनचक्कीच्या वाटेवरून पंधारा सर करण्याचा प्लान बासनात गुंडाळून.. बारी कडे निघालो.. बारी गावातून दुपारी २.३० ला.. कळसुबाई शिखराकडे चाल सुरु केली.. अन्ना आणि सिंघम येणार नाही असे म्हटल्यावर.. मी, कोकरू आणि शिंगरू निघालो.. बारी गावातून मोठ्या मळलेल्या वाटेने चढाई सुरु झाली.. आधी किरकोळ जंगल… आणि अधेमध्ये.. कळसुबाई च्या पायवाटेवर थाटलेली विवधरंगी दुकाने दिसतात.. छोटे मॉलच म्हणा हवं तर.. तर असे तिन टप्पे चढून गेल्यावर एका भल्या मोठ्या शेणाने सारवलेल्या मॉल पाशी येवून पोचतो.. इथून पुढे गेल्यास.. तीव्र चढण सुरु होते आणि मातीच्या वाटेने आपण वर येताच.. काही पायऱ्या सुरु होतात.. हि पहिली शिडी.. हि पार करताच पुन्हा.. पायऱ्या आणि थोड्या चढणीनंतर आणखी एक शिडी.. हि बर्यापैकी मोठी आहे.. हि शिडी पार करताच आणखी एका घळईमध्ये रोवलेली दिड-दोनशे पायऱ्यांची शिडी आहे.. हि पार केली की आपण कळसूबाई डोंगराच्या  वर येवून पोचतो.. शिडी चढताना पर्यटकानी फेकलेल्या दिड-दोन टन पाण्याच्या बाटल्यांचा खच घळई मध्ये पाहायला मिळतो.. इथे थोड्या पायऱ्या पार करताच.. बर्यापैकी सपाटी आहे.. इथे काही पर्यटक आराम करीत असल्याचे दिसले.. तर काही पाण्याच्या बाटल्या सर्रास इकडे-तिकडे टाकताना.. तिथून पुढची वाट हि दगड-धोंड्यांची आणि तीव्र चढाईची.. ती पार करताच.. आपण कळसुबाई डोंगरमाथ्यावर येवून पोचतो.. इथे समोर एक टेकाड आडवे येते.. आणि उजवीकडे..दूर  या टेकडाच्या माथ्यावर.. एक आणखी उंच टेकाड दिसते.. हेच कळसुबाई शिखर..तीव्र चढाईची वाट पार पडताच आपण सपाटीवर येतो.. इथून उजवीकडे वळायचं आणि टेकाडाला.. डाव्या हाताला ठेवत.. तिरपे वर जायचं.. हा चढाव पार करताच आणखी एक ताक-भजी वाला मॉल लागतो.. इथे एक विहीर आहे.. मॉल संपताच कळसुबाई शिखर समोर दिसू लागते.. शिखरावर जाण्यासाठी एक शिडी बसवलेली आहे.. श्वासांची गोळाबेरीज करून मनाचा हिय्या करायचा आणि कळसुबाईचं नाव घेवून हि शिडी चढायला लागायचं.. शिडी संपताच कळसूबाईचे मंदिर दिसू लागते.. आणि आपण शिखराच्या माथ्यावर येवून पोचतो.. ४.४५ वा शिखर गाठले.. साधारण १५ मिनिटे.. इथे थांबून आजूबाजूचा परिसर नजरेखालून घातला.. मंदिराच्या मागे.. कुलंग.. मदन अलंग.. अलीकडे साकुरी आणि किरवा अशी शिखरे दिसतात.. डावीकडे.. दूर हरिश्चंद्रगडाची रांग तर उजवीकडे.. पट्टा डोंगर रांग.. आणि पंधारा शिखर दिसते..


साकुरी किंवा किरवा शिखरावर जाण्याची वाट मात्र खालच्या टेकडावरून आहे.. सूर्य मावळण्याच्या आधी खाली उतरावे म्हणून कळसूबाईचे आशिर्वाद घेतले आणि तडक खाली निघालो.. अर्ध्या तासात.. खालचे टेकाड उतरून.. पुन्हा अर्ध्या तासात सगळ्या शिड्या उतरून खाली आलो.. आणि एक-दोन-तिन मिनी मॉल पार करून बारी गाठलं.. तोवर ६.४५ वाजले होते.. कळसूबाई शिखराची धावती भेट घेवून.. मोहिमेच्या शेवटच्या शिखराकडे निघालो.. पंधारा..


पंधारा शिखर :- वारंघुशी फाट्यावर पोचलो.. बारी ते वारंघुशी हे ७-८ किमी चे अंतर.. इथे जेवणाची सोय करावी म्हणून फाट्यावर एका दुकानवजा घरात — मावशीना विचारले.. पिठलं-भाकरी आणि भात-भाजी अर्ध्या तासात तयार करते.. काय द्यायचं ते द्या असं म्हणून मावशी कामाला लागल्या आणि रात्रीचा स्वयंपाक.. चूलीवर ढणढनू लागला..अर्ध्या पाऊन तासात जेवण तयार झाले.. कळसूबाई शिखर पुर्तीची मेजवानी मावशींच्या घरी आयोजित केली होती.. उसळपाव खावून कंटाळलेला वाघ.. पिठलं-भाकरीच्या बेताने सुखावला होता.. मुक्कामाला कुठे जायच असे मावशींना विचारताच.. इथे दुकानासमोर टाका पथारया.. अशी आज्ञा त्यांनी दिली ती शिरसावंद्य मानून दुकानासमोर तंबू उभारला आणि इथेच मुक्काम केला.. सकाळी ३१ डिसेंबर.. वर्षाची अखेर परतीच्या प्रवासाने करण्यापूर्वी पंधारा शिखर सर करण्यासाठी निघालो.. अन्ना, दिनेश आणि कोकरू यांनी माघार घेतली तरी.. शिंगरू तयार होता.. मग एखादा वाटाड्या मिळतो का ते दुकानवाल्या काकांना विचारलं तर.. काकानी एक वारंघुशी गावातून आलेला पोरगा गाठून दिला.. जा यांना वर घेऊन .. अशी आज्ञा मिळताच वाटाड्या मी आणि बाळकृष्ण निघालो.. पंधारा शिखराच्या वाटेवर.. वारंघुशी फाटा मग दोन तिन वाड्या पार करून .. भैरोबावाडी पाशी पोचलो.. इथे भात मळणीची कामे असल्याने.. कुणी सहज यायला तयार होईना.. एक जण तयार झाला पण ५०० रु. लागतील म्हटल्यावर शेवटी.. वाटाड्या — ला म्हटलं चल तूच.. मग त्याने घरी फोन करून कळविले.. पंधार्यावर जावून येतो.. २-३ तासात.. आणि पंधारा मोहीम औपचारिकरित्या सुरु झाली.. भैरोबावाडीतून .. उजव्या अंगाने वळायचं.. आणि मग घळई कडे तिरपे जायचे.. इथे वर पंधार्याच्या पायथ्याच्या डोंगरावर एक वस्ती दिसते.. गुरांच्या वाटेने वस्तीवर आलो.. इथे पाणी पिवून.. पंधारा डोंगराच्या मधल्या नाकाडाकडे निघालो.. नाकाडाकडे जाणारी पायवाट चांगलीच मळलेली आहे.. नाकाडाच्या पायथ्याला एक लिंबू-पाणी एनर्जी ब्रेक घेतला आणि निघालो.. नाकाडाच्या उजव्या बाजूला कोरफड झाडांची उभी रेघ आहे.. सुरुवातीला टी डावीकडे ठेवत.. आणि मग थोड्या चढाईनंतर उजवीकडे ठेवत.. नाकाडाच्या उजव्या बाजूने.. दोन छोटे टेपाड चढून गेलो की आपण.. पंधाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या डोंगरपायथ्याशी पोहोचतो.. इथे वाट उजवीकडे वळते.. आणि एक चांगल्या पायवाटेचा ट्राव्हर्स मारून आपण उजवीकडच्या नाकावर पोहचतो.. याला वळसा मारून.. अर्ध्या तासात आपण.. दुसऱ्या टप्प्यातील डोंगर माथ्यावर पोचतो.. डावीकडे थोडे पठार आणि ..समोर पंधारा शिखराचा शेवटचा डोंगर.. इथे दिसते.. पंधाराच्या सर्वोच्च शिखराचे नाक.. आणि उजवीकडे एक वाट.. या शेवटाच्या डोंगराला पूर्ण वळसा मारीत जाणारी.. दत्ता भाऊ..म्हटले.. चांगल्या वाटेने जाऊ.. मग उजव्या वाटेने निघालो.. ही वाट पंधारा डोंगराला २७० अंश वळसा (ट्राव्हर्स) मारीत जाते.. मध्ये अर्ध्या वाटेवर..  उजवीकडे.. पवनचक्की चा डोंगर आणि अलीकडचे दोन डोंगर अशी रांग दिसते..


यापुढे जाताच.. उजवीकडच्या डोंगररांगेचे टोक.. पंधारा डोंगराला जोडले जाते. आणि मागे.. शेणीत चा सुळका.. त्यामागे.. डावीकडे.. बितनगड चा डोंगर दिसू लागतो.. सह्याद्रीच्या वाटेवर अशी दृश्यपर्वणी पाहून.. पुढे कुठली वाट शिखराकडे जाते का याची चाचपणी केली.. पण.. गुरांच्या वाटेने जाण्यापेक्षा.. हमरस्त्याने म्हणजेच मळलेल्या पायवाटेने जायचे नक्की केले.. पुढे वाट समांतराचे अस्तित्व सोडून.. चढणीस लागते.. आणि आपण शिखराकडे वर सरकू लागतो.. इथे एक मेंढपाळ शेळ्या चारताना दिसला.. आणि पंधारा शिखर चढाई च्या तब्बल अडीच-तिन तासानंतर चौथा भिडू दिसला.. मिस्टर जंगले.. तिथे सावलीत धापा टाकीत एक ब्रेक घेतला.. किती राहिलं आणखी भाऊ.. मिस्टर जंगले भाऊ म्हणले.. हे .. काय आलंच.. वाट पुढे मागं फिरती.. तिकडे वर जावा.. मिस्टर जंगले यांनी मार्गदर्शन केले.. वर पाणी आहे.. आहे तिकडं खालच्या अंगाला.. दाखवता का पाणी.. आता शेळ्या सोडून कसं येणार.. तुमी जावा वर मि आलोच शेळ्यांना वाटेला लावून.. म्हणजे जंगले येणार नाही याची खात्री झाली.. मग निघालो.. शिखराच्या अंतिम टप्प्यावर.. तिरपी पायवाट डावीकडे .. वळते.. इथे एक मातीची लहानशी खिंड आहे.. ती चढून जाताच मग उजवीकडे नागमोड्या वाटेने.. पंधाराशिखराच्या गवताने अच्छादलेल्या कुरणावर प्रवेश मिळविला.. मागे कळसूबाईचा डोंगरमाथा.. अंमळ.. वरून डोकावून पाहत होता.. कोण आलंय बरं.. या पलीकडच्या माथ्यावर.. इथून.. डावीकडे वळालो आणि टेकाड डावीकडे ठेवत उजव्या अंगाने कडेकडेने.. पंधारा डोंगराच्या सर्वोच्च माथ्या च्या पायथ्याला पोचलो.. इथे एका पाण्याच्या वाटेने वर चढलो आणि शिखराला गवसणी घातली.. १:३० वाजले असावेत.. इथे एका खडकावर बसून.. लिंबूपाणी आणि सुका मेवा झोडून.. एक शेवटची पाण्याची बाटली रिकामी केली.. आणि क्षणभर विश्रांती घेतली.. इथून पाहताना.. मध्ये काही.. तुरळक झाडांची गर्दी दिसते.. इतकच बाकी सगळं माळरान अथपासून इतिपर्यंत.. पण.. सह्याद्रीचा दिव्य नजरा या डोंगरावर नक्कीच पाहायला मिळतो..

सह्याद्रीचे पाचवे उत्तुंग शिखर आज सर झाले होते.. इथले माळरान पाहता.. सप्टेंबर मध्ये इथे कासचे पठार अवतरत असणार हे नक्की.. पंधारा शिखराचा पसारा.. हा विशाल आहे.. कळसूबाई च्या इतका.. महाकाळ.. बाळूबाई आणि घनचक्कर चा पसारादेखिल.. वक्रसोंड.. महाकाय ते काय म्हणतात अगदी तसाच आहे.. भव्य-दिव्य.. श्वासांची किमत मोजून शिखर सर केल्याची पोच पावती मिळवली.. आणि शिखर सर केल्याचा आनंद उरात ठासून भरून.. उतरणीस सुरवात केली.. जंगले भाऊंनी सांगितल्या प्रमाणे.. पंधारा शिकाराच्या कळसूबाईच्या दिशेने असलेल्या सुळक्या पासून एक वाट खाली उतरते.. पण राजमार्ग सोडू नये असे ठरल्याने.. पुन्हा आल्या वाटेने जावे असे ठरू लागले.. दत्ता भाऊ म्हणाले.. मघाशी जे नाकाड दिसलं तिथे जाऊन बघूया.. वाट गावली तर ठीक नाहीतर येवू परत आंनी आल्या वाटेने जाऊ.. पाण्याची जेमतेम अर्धी बाटली शिल्लक होती आणि तिन नग.. अर्ध्या बाटलीवर खाली न्यायचे म्हणजे.. काम जरा अवघड होतं.. डोंगरमाथ्या च्या कडेकडेने.. नाकाडापाशी पोचलो.. इथे नाकाडावरून एक घसाऱ्याची वाट खाली उतरताना दिसते.. वाट जरा अवघड आहे.. मुरमाड पणाने ती भितीदायक वाटते इतकेच.. बाकी ठिक वाट आहे.. अनवाणी पायाने घसारा उतरताच कातळ सुरु झाला आणि मग तापलेल्या खडकावरून अनवाणी पायाने.. किरकोळ प्रस्तर उतरुन मुरमाड उतारावर आलो.. आणि तो उतरताच गवताळ कुरण आणि सपाटी लागली.. हीच ती मघाशी हरवलेली वाट.. हीच न सापडल्याने.. पंधारा डोंगराला २७० अंशांचा वळसा मारावा लागला.. तीच हि अदृश्य झालेली वाट.. वरून उतरताना नाकाडाच्या उजव्या अंग्ला पाण्याचे एक डबके दिसले होते..तिथे पाणी मिळते क आते पाहण्यासाठी निघालो.. दैवकृपेने.. इथे एक पाझर.. अजून आतला नव्हता.. तिथे दोन इंच खोल डबक्यातून बुचाबुचाने पाण्याची बाटली भरून घेतली.. आणि परतीची वाट धरली.. नाकाडाकडे पाठ करून डावीकडे.. मग दहा-वीस पावलांवर वाट खाली उतरते.. डोंगराचा दुसरा टप्पा उजवीकडे ठेवत.. इथे एक अर्धवट खोदलेली गुहा आहे.. डोंगराच्या सावलीतून मुरुमाची वाट उतरून पुन्हा नाकाडाच्या मध्यावर आलो.. इथे डोंगराला वळसा मारला आणि मग एक.. ट्राव्हर्स मारून कोरफडीच्या रेषेच्या शेजारच्या टेपाडावर.. अर्ध्या तासात मुरामावरून कधी खडकावरून तोल सावरत हि बारकी सोंड उतरलो आणि .. आता मागे वळून पंधारा डोंगराकडे एक कटाक्ष मारून.. पायवाटेने पत्र्याच्या वाडीकडे निघालो.. पांढरा डोंगर चार टप्प्यात वर्णन करता येईल.. वरचा.. मधला.. आणि डोंगर पायथा.. खाली पठाराचे दांड.. एक भैरोबावाडीकडून जोडलेला तर एक.. वारंघुशी कडे जाणारा दांड.. मध्ये.. खोरे.. आणि शेत..  मधल्या दंडाने उजव्या अंगाने निघालो.. इथे पत्र्याच्या वस्तीत पाणीब्रेक घेतला.. दोन-दोन टमाटे फस्त करून.. ओंजळभर शेंगा खिशात घालून पुढे निघालो.. दांडाच्या उजव्या कडेकडेने.. पलीकडच्या दांडाला समांतर.. भैरोबावाडी पार मागे अडली आणि तिन-चार किमी पायपीट करून मग गुर्नाच्या वाटेने हा दांड उतरण्यास सुरवात केली.. झिग-झ्याग वाट शोधीत.. खालच्या अंगाला एका झापावर उतरलो. आणि मग.. बांधाबांधाने.. आडवे जात.. वारंघुशी वस्तीवर पोचलो.. मध्ये दत्ता भाऊंच्या आजोबाचे घर लागले.. तिथे आजोबांच्या घरचे थंडगार पाणी पिवून .. विसावा घेतला..

आजोबांनी आपुलकीने हितगुज सुरु केले.. “पंधारावर गेल्ता व्हय.. मस उंच हाय.. आमी जायचो गुर घेवून.. पावसाळ्यात.. मस उंच हाये.. दमला असाल तुमी.. आजोबांचा निरोप घेतला..दत्ताभाउंचे घर गाठले.. जेवण तयार होते.. जेवण करून दत्ताभाऊंच्या परीवाराचा निरोप घेतला.. आणि ४ च्या दरम्यान फाट्यावर पोचलो.. सिंघमच्या आधुनिक घड्याळात १५.६ किमी इतके अंतर पायी कापल्याचे दिसते होते.. दोन डोंगरांची चढाई अपूर्ण राहिली पण.. पुन्हा परत येवू असा निर्धार केला आणि सरत्या वर्षअखेरीस पंधारा डोंगराला अलीविदा केला आणि स्वगृही निघालो.. सह्याद्रीच्या पाच उत्तुंग शिखराला गवसणी घालता आली याबद्दल विधात्याचे आभार मानले..

परतताना शिखरांच्या समिट वर अनुभवलेल्या त्या पाच सुवर्ण क्षणांचा एक स्लाईड शो डोळ्यासमोरून झपकन सामोरी आला.. बाळूबाईची प्रदक्षिणा.. गारुबाई, राणूबाई दर्शन..गारुबाई मंदिरामागे दिसणारा कोंबड किल्ला.. घुबडी नावाचा अगम्य डोंगर.. त्यामागे दूर डोंगरावर घर करून राहिलेला भैरोबा.. कपारीतल्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या शेळ्या मेंढ्या.. बाळूबाई शिखर वाटेवर .. भर माळरानात.. कातळाच्या पोटातले पाणी दाखवणारे.. गुराखी दादा.. दगडधोंड्यांच्या मंदिरात नांदणारी बाळूबाई.. समोर .. कोंबड किल्ला.. सह्याद्रीच्या घाटवाटा.. शिरपुंजाचा भैरवनाथ.. गुहेत विसावलेला शांताक्लॉज.. घनचक्कर ची अद्भूत सफर आणि तिथून ३६० अंशातून दिसणारे सह्याद्रीचे विश्वरूप.. पाबरगड.. गवळीदेव.. कात्रूबाई.. रतनगडचा खुट्टा.. आणि अगम्य दऱ्या.. त्यात नटलेली हिरवाई.. गारगोटीच्या मंदिरात विसावलेली.. देवी गारुबाई.. घनचक्कर च्या पोटातील विशाल गुहा.. आणि हे सगळं दृश्य दाखवणारा वाटाड्या.. महाकाळचा अतिविशाल डोंगर.. पवनचक्कीच्या शेवटच्या खांबापासून दिसणारी एक गुहा.. मागे दिसणारी पट्टा डोंगराची रांग.. त्यावर बांधलेले पट्टागड आणि आवंढा.. मागे आडाचा किल्ला.. सुरक्षित आणि उत्तम अवस्थेतील बितनगड.. त्य वाटेवर रंगलेला ऑफरोडींग चा थरार.. आणि जीव वाचवून सुसाट धावणारी इवली-बवली नैनो..

बारी गावातून सुरु झालेली कळसुबाई शिखराची वारी.. सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्याला घातलेली गवसणी.. कळसुबाई शिखर अनवाणी उतरणारा एक वाटाड्या.. आणि फाट्यावर झोडलेली पिठलं भाकरीची मेजवानी.. पंधाराची म्यारेथोन भटकंती.. असे एक न अनेक प्रसंग डोळ्यासमोरून झपकन निघून गेले आणि एका अविस्मरणीय भटकंती ची सांगता.. आणि मनाची अवस्था.. आज मुझे अपने होनेपे यकीन आया..!!


धन्यवाद .. जय हिंद.. जय महाराष्ट्र.. जय सह्याद्री.. जय भवानी.. जय शिवराय..


माधव प्रकाश कुलकर्णी


वाटाड्या टीम :- दिनेश रावल, चंद्रकांत माशाळकर, माधव कुलकर्णी, रितेश पवार आणि बाळकृष्ण ताम्हणकर


gazetteers reference:-

Mountains and hills: Sahyadri: The Sahyadri forms for a distance of about 60 km. a continuous natural boundary between Ahmadnagar and Thana districts. When viewed from the west, from the lower levels of the Murbad lowland, the appearance of the range is that of high wall of rocks, about 1,000 m. high, of dark hue relieved by narrow horizontal belts of grass and ever-green forest surmounted by isolated peaks and rocky bluffs rising in many places to a further 1,000 m. running with a north-west to south-easterly trend. The crestline here seems to have migrated eastwards by recession due to active headward erosion in the western slopes by the active tributaries of the Ulhas.
The three hill-forts of Kulang, Ratangad and Harishchandragad and the peak of Ajuba Dongar are the most striking of the high peaks of Sahyadri within the district (Harishchandragad: 1,424 m., Ratangad 1,297 m., Ajuba Dongar 1,375 m. and Kulang 1,470 m.) These mark the points of convergence of the transverse spurs with the main range of Sahyadri. Its three eastward offshoots, the Kalsubai, Baleshwar and Harishchandragad ranges, stretch far across the district gradually decreasing in height as they run eastward. The average elevation of the crestline of the Sahyadri within the limits of the district is about 1,300 m.
Kalsubai range: The Kalsubai range, branching off at Kulang, is the northernmost of the 3 spurs which for some 40 km. forms the boundary between the Ahmadnagar and Nasik districts. Viewed from the Nasik district it presents the appearance of a continuous and in many places a precipitous cliff of rocks. Almost every hill in this range had been a fort and many still have water cisterns and granaries. East of Kulang is the twin fort of Alang, both being spots of great natural strength. Then comes a series of rocky and precipitous peakswith a general pyramidal form averaging 1,500 m. in height followed by the Kalsubai 1,646 m., a conical summit of which is the highest point within the limits of Maharashtra State. East of Kalsubai is the natural depression in the range over which winds the Bari ghat road leading from Igatpuri and Ghoti on the Bombay-Agra highway to Bhandardara. The truncated hill of Pandara commands this road on the east. The next noteworthy peaks are Palan, Bitangad (1,427 m.) and Mahakali. The range here sweeps northward to the once-celebrated hill-forts of Patta and Avandhe which were scenes of many fierce contests between the Maralhas and the Moghals. The magnificent amphitheatre between these two forts is a striking feature of the range.
Two smaller spurs which run in a south-easterly direction enclosing the valley of Adula river branch off near Bitangad and Patta. Further north, the Kalsubai range takes a south-easterly direction running parallel with the first-mentioned spur and enclosing the valley of Mahalungi. This range, after running through the southern parts of Sinnar taluka of Nasik district, enters the Sangamner taluka of this district about 13 km. north of Sangamner and after a further course of 25 km. ends somewhat abruptly with the hill of Dudeshwar (837 m. above the mean sea-level) 300 m. above the bed of the Pravara river in the valley below.
Adula hills: The Adula hills branch off from the main Kalsubai range near the peak of Patta and run southwards at an average elevation of 900 m. carrying on their top extensive flat-topped plateau levels and open jungles on the steep hill-slopes. This range abruptly ends about 2 km. northwards of Sangamner. The other spur branching off from the Kalsubai range in Bitangad peak also running similarly with an easterly trend, parallel to the Adula range and south of it has a wider flat top forming a structural level at a height of 1,000 m. Between the two spurs, the Adula river has carved its valley. This range also ends abruptly a few km. west of Sangamner.
Baleshwar range: The Baleshwar range, the second great spur of the Sahyadri, branches off at Ratangad, 11 km. south-east of Kulang and completely traverses the Akola and Sangamner talukas forming the water-shed between the Pravara in the north and the Mula in the south. On this range, east of Ratangad, are a series of lofty, craggy peaks such as Katra dongar, Mura, Wakarai, Shirpunj, Ghanchakar (1,532 m.), Bahiroba and Sindola. The range culminates with Baleshwar as a central mass whose summit has been crowned by a temple in Hemadpanthi style now in ruins and surrounded by spurs radiating from the centre in all directions. On an isolated hill at the end of one of these spurs extending to the north-west is the fort of Pemgad. Between Baleshwar and Hevargaon which is the last notable peak in the range is the Chandanapuri valley crossed by the Pune-Nasik road. East of Hevargaon, the hills decrease in height and finally subside in the open plains just west of Rahuri. This range is about 100 km. long.
Harishchandragad range : The third range which leaves the Sahyadri at Harishchandragad is the longest in the district and forms the main water-shed between the Godavari and Bhima tributaries. Its direction for the first 25 km. is easterly; the Mula river flows between it and the Baleshwar range. This range forms the boundary between Ahmadnagar and Pune districts. East of Harishchandragad fort on this range lies the Bala Killa. Near Brahmanwada, the range gradually decreasing in height takes a turn to the south-east and enters Parner taluka which it completely traverses. The summits of the hills here widen into the plateau of Kanhore, 850 m. above the mean sea-level and 200 m. above the bed of the Ghod river; on the west the range presents a wall-like front towards the river. Near the village of Jamgaon in Parner taluka, the flat-topped ridge shoots to the north-east to form a water-shed between the tributaries of the Godavari and the Bhima. The main ridge continues further south-east with widening summits and gradually widens into a flat-level country known as Balaghat that extends far into the districts of Marathwada. The length of the hills from the main line of Sahyadri to the Balaghat is about 200 km. The branch of this range leaving Kanhore plateau crosses the north-eastern corner of Shrigonda taluka and enters Karjat taluka. A distinguishing feature of this branch is the succession of “Pathars” of flat-topped hills that are so uniformly horizontal as to present almost an artificial appearance.
Besides these leading ranges, there are many hills isolated and forming backbone of the ridges between the streams. Though they do not rise to any great heights than the general level of the plateau, locally they form prominent features.


 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s