हळर्णे किल्ला (Alorna Fort)

Alorna Fort – Main Entrance

वाटाड्या मार्ग : सावंतवाडी – बांदा – कळणे गाव – हसापूर गाव मार्गे आपल्याला हळर्णे गावी जाता येते.. या गावातून उजवीकडे कालवल खाडीकडे जाणारा डांबरी रस्ता आहे.. तिथे हा भुईकोट किल्ला आहे ..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : भुईकोटजवळचे गाव : म्हापसा ३० किमी
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकातराज्य : गोवा

पोर्तुगीज बांधणीच्या या किल्ल्याला चार भक्कम बुरुज आहेत.. यातील दर्शनी भागातील उजव्या बुरुजावर एक क्याप्सूल सारखी टोपी आहे.. तटबंदीवर तोफा चढविण्यासाठी.. दगडी रस्ता थेट बुरुजाच्या वरपर्यंत बांधला आहे.. चारही बुरुजांवर हि रचना दिसून येते.. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या नसून तिरपा रेखीव दगडी चढाव आहे.. किल्ल्याला तटबंदीच्या कडेकडेने प्रदक्षिणा मारताना.. मागच्या बाजूस एक आयताकृतीआकाराची विहीर बांधल्याचे दिसते.. मध्यभागी एक तिन खोल्यांची एक वास्तू असून ती अलीकडच्या काळात बांधल्याचे दिसते.. किल्ला हा खाडीच्या सपाटीपासून थोड्या वरच्या भागात आहे.. पण हा अभेद्य असा नाही.. तो या कालवल खाडी वर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा.. कालवल खाडीतील पाण्यात उतरण्यासाठी इथे एक घाट आहे.. तिथून कालवल खाडीचे आणि नारळी-पोफळीच्या बागांचे एक अप्रतिम दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळते.. तेंव्हा.. वाकडी वाट करून पेडणे तालुक्यातील या भुईकोट किल्ल्याला भेट द्यायला काहीच हरकत नाही..