
वाटाड्या मार्ग : हा किल्ला म्हापसा – बिचोली रस्त्यावरील अल्डोना गावाजवळ आहे.. अल्डोना वरून घाट रस्ता पार करताच एक पूल लागतो.. या पुलावरून अर्धा .मी. वर टेकडावर जाताच आपण एका वस्तीपाशी पोहोचतो.. इकडे.. उजवीकडे एका पटांगणात मध्यभागी खोर्जुवे किल्ला ठाण मांडून बसल्याचे आपल्याला दिसते.
कसे जाल आणि काय पाहाल ?
किल्ल्याचा प्रकार : टेकडी वरचा किल्ला | जवळचे गाव : अल्डोना – खोर्जुवे (Aldona) ४ किमी |
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकात | राज्य : गोवा |
किल्ल्यासमोर चहुबाजूस बऱ्यापैकी मोकळी जागा आहे.. या शेताडातून किल्ल्याच्या जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे.. हा किल्ला देखिल चौबुर्जी म्हणजे चार भक्कम बुरुजांनी बांधला आहे साधारण चौरस आकाराच्या या किल्ल्याला मध्यभागी दरवाजा आहे.. आणि चारही बुरुजांवर क्याप्सूल आहेत.. प्रत्येक बुरुजाचा आकार हा पाकळीसारखा असून आकाशातून पाहताना हा किल्ला एखाद्या रांगोळीसारख दिसतो..
किल्ल्याच्या आत प्रवेश करताच.. किल्ल्याच्या भिंती मध्ये बांधलेले कोनाडेकमानी असलेल्या खोल्या.. आणि समोरच्या तटबंदीच्या अल्याड एक विहीर दिसते.. शिवाय किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी.. तिरपा बिन पायऱ्यांचा दगडी जिना बांधला आहे .. किल्ल्याच्या दरवाजाच्या उजवीकडील एका कोनाड्यात कमानीत मदर मेरी चा पुतळा आणि प्रार्थना करण्याची जागा आहे.दरवाजाच्या समांतर तटबंदी मधील कोनाड्यात.. एक क्रूस कोरल्याचे दिसून येते.. दरवाजापाशी बसलेल्या एका काकांना.. माहिती विचारताच असे चार किल्ले असल्याचे कळले.. एक आग्वाद, एक कायसुवचा किल्ला शापोऱ्याला.. एक तेरेखोलला आणि एक खोर्जुवेला.



