ग्यास्पर डायझ किल्ला (Gasper Diaz Fort)

वाटाड्या मार्ग : FORTE DA PONTE DE GASPAR DIAS .. पणजी शहर दर्शन मधील .. एक दुजे के लिये.. सिंघम फेम डोना पौला या ठिकाणी जाताना हमरस्त्यावर.. मीरामार किनाऱ्यावर (Beach) एक सर्कल आहे.. त्यावर एक तोफ मध्यभागी ठेवली आहे.. हीच या किल्ल्याची एकमेव उरलेली ओळख.. सध्याच्या ग्यास्पर डायझ टेनिस क्लब भागात हा किल्ला अस्तित्वात होता.

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्लाजवळचे गाव : मिरामार किनारा (Miramar beach) १/२ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा

पणजी शहर दर्शन मधील .. एक दुजे के लिये.. सिंघम फेम डोना पौला या ठिकाणी जाताना हमरस्त्यावर.. मीरामार किनाऱ्यावर (Beach) एक सर्कल आहे.. त्यावर एक तोफ मध्यभागी ठेवली आहे.. हीच या किल्ल्याची एकमेव उरलेली ओळख.. सध्याच्या ग्यास्पर डायझ टेनिस क्लब भागात हा किल्ला अस्तित्वात होता.. सन १५९८ साली हा किल्ला फ्रान्सिस्को द गामा.. याने हा किल्ला बांधला.. तो अगदी १८ व्या शतकापर्यंत सहीसलामत होता १८३५ च्या स्थानिक युध्दात तो उध्वस्त करण्यात आले आणि तो पुन्हा ७-८ वर्षानंतर बांधण्यात आला.. पुढे वाढत्या पर्यटनाच्या गरजा म्हणून हा किल्ला नामशेष झाला असे इतिहासकार सांगतात..

१६ शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी राजांनी पोर्तुगीजांवर आक्रमण केले आणि त्या आक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून गोवा वसाहतीला ठिकठिकाणी किल्ले बांधून ते थोपविण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला.. त्यामुळे पणजी शहराच्या आजूबाजूस.. आग्वाद, रीस मागोस, कोर्जुवे, साखळी, जुवे बेटावर मुरगाव इथे किल्ले बांधण्यात आले.. संभाजी महाराजांच्या आक्रमणाला घाबरलेल्या पोर्तुगीजांनी राजधानी पणजी पासून खाली मुरगाव इथे हलविण्याचा निर्णय हि घेतला होता असे काही इतिहासकार सांगतात.. पुढे इथे मीरामार नावाचे एक हॉटेल पर्यटकांमध्ये प्रसिद्ध झाले आणि ग्यास्पर डायझ किनाऱ्याचे नाव मीरामार असे पडले.