तिवीम / कोळावले किल्ला (Thivim / Colavale Fort) 

वाटाड्या मार्ग : तिवीम ला कोकण रेल्वे चे स्थानक आहे.. म्हापसा- बिचोली रस्त्याने म्हपस्याकडेकडे जाताना कोपरे (Coprem) गावातून उजवीकडे फुटलेल्या रस्त्यावर कोलावले चा किल्ला आहे.

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्लाजवळचे गाव : तिवीम (Thivim) १ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा

तिवीम मध्ये एकूण तिन किल्ले असून त्यातील इतर काळाच्या ओघात गडप झाले आहेत.. त्यातील काही अवशेष विखुरलेल्या स्वरुपात शिल्लक आहे.. गावात कुणालाही विचारल्यास इथे किल्ला नाही असे सांगतात.. इतकी उदासीनता आणि ऐतिहासिक ठेव्याबद्दलची अशी प्रचंड आस्था स्थानिकांमध्ये पाहायला मिळते.. कोलावले किल्ल्याशेजारी एक चर्च आहे.. आणि इथून पुढे थोडे जंगलात गेल्यास आणखी दोन किल्ले भग्नावस्थेत असल्याचे दिसतात.. पण ते शोधणे अवघड आहे.. हे तिनही किल्ले एकेकाळी एका खंदकाने जोडले होते.. पण सध्या त्याचा कुठलाही पुरावा सापडत नाही..

फोर्ट नोवो डे तिवीम (The Forte Novo de Tivim) असे ह्या किल्ल्याचे मूळ नाव आणि तो लिन्हारेस नावाच्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने बांधल्याचे इतिहासकर सांगतात.. अल्वोर नावाच्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने इथे आणखी दोन किल्ले १६८१ च्या सुमारास बांधले आहेत.. आणि त्यांची नावे फोर्ट डे असुम्काव डे तिवीम आणि मेयो दो तिवीम (Forte de Assumcao de Tivim and Fortede Meio do Tivim.) अशी ठेवली आहेत..

यातील मुख्य किल्ला हा रेल्वेच्या पुलाशेजारी कोलावले गावात आहे तर एक धनवा गावाजवळ आहे.. या किल्ल्यात एक भुयार असून ते तिवीम च्या मैदानापर्यंत आहे असे म्हणतात.. हे तिनही किल्ले रेवोरा गाव आणि कोलावले या गावामधील पट्ट्यात आहेत.. कोलावले किल्ल्यातील भग्न इमारती मध्ये एक छुपी खोली.. वरच्या भागात तिन दालने आणि उजव्या अंगाला.. तटबंदी आणि एक लहानसा दरवाजा दिसतो.. किल्ल्यात एक विहीर असून ती भग्नावस्थेत आहे..