फोंडा किल्ला (Ponda Fort)

वाटाड्या मार्ग : फोंडा गावातून फोंडा ST स्थानकातून.. फोंडा-पणजी राज्य महामार्गावर साधारण ३ किमी पुढे फार्मागुडी नावाचे गाव आहे.. गोपाळ गणेश मंदिरासमोर सध्या एक प्रतिकात्मक किल्ल्याची वास्तू उभारली आहे आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आवेशपूर्ण अश्वारूढ पुतळा बसविला आहे..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्लाजवळचे गाव : फार्मागुडी – फोंडा (Farmagudi) ३ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा

फोंड्याचा कोट.. सध्या फोंड्याच्या किल्ल्यातील पंडितवाडा/कोटवाडा हे पूर्वीच्या कोटात बांधले होते. या किल्ल्याची तटबंदी.. खंदक असे काही अवशेष आजमितीला शिल्लक नाही.. फोंड्याच्या कोटातील अब्दुल्लाखान नावाच्या पिराची कबर आजही पंडित वाड्याच्या जवळ पाहायला मिळते.. पोर्तुगीजांवर आक्रमण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिकून इथे भगवा फडकविला.. संभाजी महाराजांचे सेनापती कवी कलश यांनी ह्या कबरीच्या देखभालीसाठी सालाना तरतूद केल्याचे इतिहासकार पांडुरंग पर्सुलेकर सांगतात..

फोंडा किल्ला हा विजापूरच्या आदिलशाहने १६व्या शतकात बांधला.. पुढे १६६४ साली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करताना फोंड्याच्या कोटावर हल्ला चढविला पण पोर्तुगीज आदिलशाह च्या मदतीला धावून आल्याने त्यांनी तात्पुरती माघार घेतली.. पुन्हा १६७५ साली एका जोरदार आक्रमणानंतर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.. छत्रपती शिवाजी राजांच्या निधनानंतर.. पोर्तुगीजांनी फितुरीने हा किल्ला परत मिळवला.. १६ व्या शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्या सह हल्ला करून हा किल्ला पुन्हा जिकून घेतला.. पण या दरम्यानच्या युध्दात ह्या किल्ल्याची अपरिमित हानी झाली.. म्हणून हा पुन्हा डागडुजी करून त्याला संरक्षित करण्यात आले.. याच दरम्यान जवळच्या एका टेकडावर.. महाराजांनी एक किल्ला बांधला.. त्याला नाव दिले मर्दनगड.. याच दरम्यान संभाजी महाराजांनी जुवे बेटावरचा सेंट एस्तेंव किल्ला जिकून गोव्याच्या डिचोली-फोंडा-सतारी-संगेम-केपेम-कानकोना पर्यंत चा मुलुख स्वराज्यात सामील करून घेतला.. पुढे साधारण ६०-७० वर्षे हा किल्ला स्वराज्यात राहिला..

सन १७५५ साली पोर्तुगीजांनी जनरल कोंडे डी अल्वा याच्या नेतृत्वाखाली फोंडा आणि मर्दनगडावर चाल केली.. सुमारे २०० शिबंदी असलेला गड.. त्यावेळचे किल्लेदार येसाजी हुपरीकर यांनी लढविला.. आणि पोर्तुगीजाचा दारूण पराभव केला.. या युध्दात पोर्तुगीज जनरल अल्वा मारला गेला.. आणि मर्दनगड हिंदवी स्वराज्याचे एक स्मारक बनले.. पुढे काळाच्या ओघात मर्दन गड आणि फोंड्याचा कोट नामशेष झाले तरी.. फोंड्याच्या किल्ल्यातील मशीद आणि मर्दनगडावरील विरगळ आणि मंदिर अशा काही खुणा आजमितीला शिल्लक आहे.. मर्दनगड किल्ला हा फोंड्याच्या दक्षिणेकडे आहे.. फोंड्यातील सगळ्यात उंच टेकडावर हा किल्ला बाधण्यात आला आहे.. सध्या काही अवशेष या किल्ल्यावर पाहायला मिळतात..

सफा मशिद : फोंडा ST स्थानकाच्या अलीकडे.. आदिलशाह च्या काळात बांधलेली १५ व्या शतकातील बांधलेली सफा मशीद आहे.. सफा या उर्दू शब्दाचा अर्थ म्हणजे पवित्र.. तर असे हे पवित्र प्रार्थना स्थळ.. इथे मशिदीच्या आलीकडे आणि पलीकडे प्रशस्त जांभ्या चिऱ्याने बांधलेले तलाव असून इथे सुमारे ४० हमाम आहेत.. हमाम म्हणजे आंघोळ करण्याची जागा.. इथे दरवर्षी ईद दरम्यान मोठ्या संख्येने नमाज अदा केली जाते.. १५६० च्या बांधलेली हि मशिद आदिलशाही स्थापत्यशैलीचे एक उत्कृष्ठ उदाहरण आहे.. इथे बरेच पक्षी आपली तहान भागवायला येतात.. त्यामुळे पक्षी निरीक्षण करण्यासाठी इथे एक पर्वणी आहे.. सफा मशिदीचे बांधकाम हे पोर्तुगीजांनी काही प्रमाणात उध्वस्त केले तरी आजमितीला जे काही शिल्लक आहे यावरून या वास्तूच्या भव्यतेची कल्पना येते..

मंगेशी मंदिर: फार्मागुडी पासून पणजी कडे जाताना ३-४ किमी अंतरावर एक लहानसा घाट उतरताना डावीकडे .. मंगेशी मंदिर आहे.. मंदिरासमोर एक भव्य बांधीव तलाव असून.. इथली दीपमाळ उंच आणि एखाद्या मनोऱ्यासारखी आहे.. भगवान मंगेश हे शंकराचे रूप आहे.. इथे मंगरीश मठ असून या मठात छतावर काष्ठशिल्पे कोरली आहेत.. अशी काही कलाकारी आपल्याला कोकणातील आडिवरे गावातील महाकाली मंदिरात देखिल पाहायला मिळते.. शिवभक्तांसाठी हे मंदिर म्हणजे एक श्रद्धास्थान आहे..