वल्लभगड / हरगापूरचा किल्ला (Vallabhgad Fort) 

वल्लभगड / हरगापूर किल्ला तटबंदी
Jpeg

वाटाड्या मार्ग : पुणे ते अंबोली रस्त्यावर निपाणीच्या पुढे आणि संकेश्वर च्या अलीकडे ५ किमी अंतरावर वल्लभगड हा बऱ्यापैकी भरभक्कम असा किल्ला आहे.. संकेश्वरच्या अलीकडे असणाऱ्या दोन टेकडापैकी एका टेकडावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.. गडाच्या पायथ्याशी हरगापूर नावाचे गाव आहे.. या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता किल्ल्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने प्रदक्षिणा मारीत आपल्याला – मंदिरापाशी घेवून येतो.. इथून आणखी १0 मिनिटात आपण किल्ल्याच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचतो.

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडी वरचा किल्लाजवळचे गाव : संकेश्वर ४ किमी
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकातराज्य : कर्नाटक

संकेश्वरच्या अलीकडे असणाऱ्या दोन टेकडापैकी एका टेकडावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.. गडाच्या पायथ्याशी हरगापूर नावाचे गाव आहे.. या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता किल्ल्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने प्रदक्षिणा मारीत आपल्याला – मंदिरापाशी घेवून येतो.. इथून आणखी १0 मिनिटात आपण किल्ल्याच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचतो.. किल्ल्याचा दरवाजा गोमुखी आहे.. एका बुरुजाच्या मागे तो दडविला आहे.. ह्या भल्या मोठ्या बुरुजावर एक भाला फेकणाऱ्या लढवय्या सैनिकाचे चित्र रंगवले आहे.. दरवाजाया कमानीतून आत येताच उजवीकडे समोर हनुमान मंदिर आहे.. आणि तटबंदीच्या कडेला एक पाण्याचे टाके.. हनुमान मंदिराच्या डावीकडे एक भुयारी रस्ता असून यात उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत.. हनुमान मंदिराच्या मागे.. आणखी एक १०० फुटी खोल आयताकृती खंदक आहे.. आणि उजवीकडे आणखी एक तळे.. हे तळे १००-१५० फुट खोल असून ते जांभ्या खडकात कोरले आहे.. या तळ्याची लांबी आणि रुंदी ५० x४० फुट असावी.. या तळ्यात उतरण्यासाठी एक जिना असून तो माती ढासळल्याने बंद झाला आहे.. तळ्याच्या भिंतीतून आतल्या बाजूस असलेल्या झाडांवर.. मधमाशांचे ३-४ मोहोळ आहेत.. तेंव्हा इथे जपून गोंगाट न करता चालावे.. हनुमान मंदिराच्या डावीकडचे भुयार.. मागचा खोल झरोका आणि उजवीकडचे हे ताशीव तळे.. एकमेकांना जोडले असावेत..

हनुमान मंदिराच्या अलीकडून तटबंदीला उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा मारीत गेल्यास.. पूर्वेकडे.. एक शिवमंदिर आहे.. आणि त्यामागे दूर एकांडा बुरुज आहे.. त्यावर जाण्यासाठी ७-८ पायऱ्या आहेत.. तिथून पुन्हा डावीकडे गेल्यास आणखी एक बुरुज अर्धवट पडलेल्या अवस्थेत उभा असल्याचे दिसते.. इथवर येताना गडावरच्या अलीकडील च्या काळात बांधलेली काही घरांचे जोते आणि भग्न भिंती दिसतात.. गड प्रदक्षीणा मारण्यास अर्धा तास पुरे ठरतो..