साखळी चा किल्ला (Sanquelim Fort)

वाटाड्या मार्ग : हा किल्ला म्हापसा बिचोली रस्त्याने बिचोली आणि पुढे साखळी (Sanquelim) गाव आहे.. वाळवंटी नदीच्या काठावर एकेकाळी हा किल्ला अस्तित्वात होता..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडी वरचा किल्लाजवळचे गाव : साखळी (Sanquelim) 0 किमी
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकातराज्य : गोवा

म्हापसा बिचोली रस्त्याने बिचोली आणि पुढे साखळी () गाव आहे.. या गावात साखळी च्या किल्ल्याचे काही अवशेष तग धरून आहे.. साखळी चा किल्ला सावंतवाडीच्या खेम सावंतांनी बांधला असे इतिहासकार सांगतात.. छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करताना.. छापोरा, फोंडा, साखळी चा किल्ला जिंकून घेतला.. नंतर १७४६ साली तो पोर्तुगीजांनी जिंकला आणि त्यानंतर चा इतिहास हा अज्ञात आहे.. सध्या या किल्ल्याचे काही अवशेष muncipalty / नगरपालिकेच्या इमारतीसमोर आहेत.. काही अर्धवट तुटलेल्या भिंती.. किल्ल्याच्या बहूतांश भागात अतिक्रमण झाले असून.. दक्षिणेकडे काही सैनिकांच्या खोल्या नजरेस पडतात.. या शिवाय साखळी गावात विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस भवानी माता मंदिर हे संभाजी महाराजांच्या काळात बांधले असावे.. या मंदिरासमोर रेडेबळीची शिळा आहे.. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या ह्या दगडी चिरे वापरून बांधल्या आहेत.. या मंदिराकडून थोडे मागे गेल्यास काही भग्न इमारती नजरेस पडतात.. विठ्ठल मंदिरच्या पलीकडच्या बाजूस खाली वाळवंटी नदीकडे जाणार्या पायऱ्या आहेत.. इथे खाली पुरातन घाट पाहण्यास मिळतो.. साखळी गावातील भग्न मंदिरे आणि काही इमारती इथे किल्ला असल्याची साक्ष देतात..

फोर्ट डे साव टीयागो डे बेन्स्तरी / Forte de São Tiago de Benastarim

वाळवंटी नदीच्या काठावर एकेकाळी हा किल्ला अस्तित्वात होता.. त्याला नदीच्या बाजूने दरवाजा होता.. सध्या या किल्ल्याचे काही अवशेष बेन्स्तरी गावातील बाजारात पाहायला मिळतात.. इथे दर गुरुवारी बाजार भरतो.. या शिवाय इथे काही तटबंदी आणि जिना असे अवशेष इतिहासाच्या पटलावर आजही तग धरून आहेत.. या किल्ल्याला सेंट जेम्स बेन्स्तरी किल्ला असेही म्हणतात.. तो पोर्तुगीज व्हाईसरॉय अफोन्सो याने १५१२ साली जिंकला.. पुढे विजापूर च्या सुलतानाने आपला सरदार फुलाद/फौलाद खान यास गोवा मोहिमेवर पथवे असता त्याने हा किल्ला विजापूर च्या अधिपत्याखाली आणला.. तो पुढे अल्बुकेरको नावाच्या अधिकाऱ्याने जिंकून पोर्तुगीजांच्या पदरी दाखल केला.. इथे पोर्तुगीजांनी चार मजली मनोरा उभारल्याचे काही इतिहासकार सांगतात..