सेंट इस्तेंव / जुवे बेटावरचा किल्ला (St. Estevam / Juve Fort) 

वाटाड्या मार्ग : पणजी – ओल्ड गोवा रस्त्याने पुढे बेन्स्तरी गाव आहे.. तिथून डावीकडे जुवे गावात जाण्याचा रस्ता आहे.. इथे जुवे गावात एका टेकडावर.. हा सेंट इस्तेव / जुवे चा किल्ला आहे.. जुवे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने एक बोर्ड हि लावला आहे.. या बोर्डापासून वर टेकडावर जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता आहे.. गाडी थेट वर पर्यंत जाते.

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडी वरचा किल्लाजवळचे गाव : जुवे (Juve) – तिसवाडी तालुका / १/२ किमी
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकातराज्य : गोवा

पणजी – ओल्ड गोवा रस्त्याने पुढे बेन्स्तरी गाव आहे.. तिथून डावीकडे जुवे गावात जाण्याचा रस्ता आहे.. इथे जुवे गावात एका टेकडावर.. हा सेंट इस्तेव किल्ला आहे.. जुवे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने एक बोर्ड हि लावला आहे.. या बोर्डापासून वर टेकडावर जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता आहे.. गाडी थेट वर पर्यंत जाते.. इथे अलीकडे एक पाण्याची टाकी आहे.. हि ऐतिहासिक पुरातन विहीर असून त्यातूनच आजकाल या गावाला पाणीपुरवठा होतो.. किल्ला हा सुस्थितीत असून त्याचा मुख्य दरवाजा डावीकडे आहे.. किल्ल्याची तटबंदी साधारण १२-१५ फुट उंच आहे आणि ती जांभ्या चिरे वापरून बांधली आहे.. कच्च्या सत्याने आपण टेकाडाच्या माथ्यावर येताच समोर एक निळ्या पांढऱ्या रंगात रंगवलेले चर्च दिसते.. अलीकडे पाण्याची टाकी आणि त्याच्या डावीकडे किल्ल्याची तटबंदी.. इथून तटबंदीला डावीकडून वळसा मारताच.. किल्ल्याकडे जाणारा चढाव आहे.. आणि एक दरवाजा.. आत एकमजली खोली असून टी कदाचित तुरुंग म्हणून वापरली जात असावी.. किल्ल्याची अवस्था आजही भक्कम अशी आहे.. जुवे बेटावरचा हा किल्ला.. आटोपशीर पण देखणा असा आहे.. किल्ल्याचे बुरुज.. तटबंदी अगदी भक्कम असून गोवा सरकारने याची चांगलीच देखभाल केली आहे..