अग्वाद किल्ला (Aguada Fort – Upper and Lower)

वाटाड्या मार्ग :  गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यात आणि बार्देझ किंवा बारदेश तालुक्यात हा किल्ला असून कलंगुट किनाऱ्याच्या अलीकडील कॅन्डोलीम (Candolim) गावापासून साधारण ३-४ किमी अंतरावर हा ठाण मांडून बसला आहे.. कॅन्डोलीम गावाच्या दक्षिणेकडे हा किल्ला आहे..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्लाजवळचे गाव : कॅन्डोलीम (Candolim) ४ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा – उत्तर गोवा जिल्हा तालुका : बार्देझ

गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यात आणि बार्देझ किंवा बारदेश तालुक्यात हा किल्ला असून कलंगुट किनाऱ्याच्या अलीकडील कॅन्डोलीम (Candolim) गावापासून ३-४ किमी अंतरावर हा ठाण मांडून बसला आहे.. कलंगुट किनाऱ्याच्या अलीकडून दक्षिणेकडे हा किल्ला आहे.. आग्वाद किल्ल्याचा घेरा प्रचंड मोठा असून बारदेश तालुक्याचे दक्षिण-पश्चिम लक्षद्वीपचे टोक या किल्ल्याच्या तटबंदीने वेधले आहे.. हा किल्ला पोर्तुगीजांनी १६व्या शतकाच्या पूर्वार्धात उभारला. डच आणि मराठी फौजांपासून रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.. मांडोवी नदी जिथे समुद्राला मिळते तिथे या किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे.

आग्वाद म्हणजे पोर्तुगीज भाषेत ‘पाणी’. या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा प्रचंड साठा आहे, यावरूनच या किल्ल्याला आग्वाद किल्ला असे नाव पडले.. आग्वाद किल्ल्यावर तब्बल २४ लाख ग्यालन (Gallon) पाण्याचा साठा आहे. दीपस्तंभापच्या अलीकडे पाण्याची भव्य बंदिस्त टाकी आहे. आत उतरण्यासाठी जांभ्या चीऱ्यांचा जिना आहे. सुरक्षेच्या कारणाने हा सध्या बंद केला आहे. या शिवाय दिपस्तंभ, खंदक, भरभक्कम तटबंदी, वैशिष्ट्यपूर्ण जीने आणि समुद्राच्या लाटांवरुन तरळत थेट श्वासातून आरपार जाणारा आल्हादायक वारा. ‘आग्वाद किल्ला’ हा एक पुळणीवरच्या टेकाडावर बांधलेला एक भव्य किल्ला आहे. एके काळी गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज कारभाऱ्यांचं सत्ताकेंद्र. पोर्तुगीजांच्या किल्ल्यांची राजधानी असं या किल्ल्याला म्हणता येईल.

आग्वाद किल्ला पहायचा तर ताज हॉटेल जवळील लोअर आग्वाद पाहायलाच हवा. समुद्रावर धडाकणाऱ्या लाटांना छेदत उभां ठाकलेला विशाल बुरुज, इथे कुण्या एके काळी जहाज उभी करत असं म्हणतात. आग्वाद किल्ल्याचा काही भाग टाटांच्या हॉटेल साठी देवून टाकला आहे तर दक्षिण तटावरील काही भाग सेंट्रल जेल साठी. अप्पर अग्वाद साठी जाणऱ्या रस्ता सोडून डावीकडे सेंट्रल जेल कडे गेल्यास, जेलच्या दरवाजासमोर डावीकडील पायवाटेने खाली उतरताच आग्वाद किल्ल्याचा विस्तीर्ण असा दक्षिण तट पहायला मिळतो. सिंक्वेरीम किनाऱ्यालगत जो तटबंदी आणि बुरुज आहेत तो भाग लोअर आग्वाद किंवा सिंक्वेरीम किल्ला म्हणून ओळखला जातो..