तेरेखोलचा किल्ला (Terekhol/Tiracol Fort)

वाटाड्या मार्ग : तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर हा किल्ला बांधला आहे.. इथे पोहोचण्यासाठी सावंतवाडीवरून येता येते किंवा गोव्यातील क्वेरीम गावातून फेरी बोटीने जाता येते (Querim Village). पणजी पासून हा किल्ला साधारण ४२ किमी अंतरावर आहे..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्लाजवळचे गाव : क्वेरीम गाव (Querim Village) २ किमी
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकातराज्य : गोवा

तेरेखोल किल्ला हा एक आटोपशीर किल्ला आहे. सावंतवाडीचे खेम सावंत भोसले यांनी हा किल्ला १७व्या शतकात बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. पोर्तुगीजांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.

सन १७४६ च्या दरम्यान पोर्तुगीज व्हाईसरॉय पेड्रो मिग्वेल डे अल्मेडा ( 44th Viceroy of Goa, Pedro Miguel de Almeida Portugal e Vasconcelos, conde de Assumar, marquis de Alorna) याने खेम सावंतांच्या नौदलावर हल्ला करून हा किल्ला जिंकून घेतला.. पुढे १० वर्षांनी या किल्ल्याची डागडुजी करून किल्ला भक्कम करून घेतला.. किल्ल्यावरील सेंट अन्थोनी चर्च या व्हाईसरॉय अल्मेडा याने बांधल्याचे इतिहासकार सांगतात.

एक भरभक्कम दरवाजा. इथे दरवाजातच एक मोठी पेटारा ठेवला आहे.. जणू काही जादूचा पेटारा, भिंतीना दोन्ही बाजूंनी भाले अडकवले आहेत.. किल्ल्यावरील सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या खोल्यांचं आता हॉटेल मध्ये रुपांतर केले आहे.. किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक St. Andrew यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो.. इथे डावीकडे काही खोल्या आहे आणि समोर एक सेंट अन्थोनी चर्च / चापेल (Church of Holy Trinity) आहे.. पोर्तुगीज धाटणीचे बांधकाम आणि प्रशस्त जागा.. खोल्यांच्या गवाक्षातून आतासैरावैरा धावणारा  तेरेखोल खाडीचा वारा.. सारंच अद्भूत. अरबी समुद्राचे एक मनमोहक दर्शन आल्या इथल्या गवाक्षातून पाहायला मिळते..

हा किल्ला १९व्या शतकातील गोवा मुक्ती संग्रामाचे वारसा स्थान आहे.. इथे गोवा सरकारने गोवा मुक्ती स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक उभारले आहे..