बेतुल चा किल्ला (Betul Fort)

वाटाड्या मार्ग :  गोव्यातील कितोल (Quitol) भागात हा किल्ला असून मडगाव पासून दक्षिणेकडे गेल्यास तो साधारण २२ किमी अंतरावर आहे.. बेतुल गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास फारसं कुणी सांगत नाही.. त्यामुळे गूगल नकाशाची मदत घेवून या किल्ल्यापर्यंत जाता येते.. बेतुल गावात पोहोचल्यावर एक तिठा लागतो.. इथे डावीकडे काबो-द-राम किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.. तर.. उजवीकडे एक चिंचोळा रस्ता बेतुल च्या किल्ल्याकडे जातो.. मच्छीमार वस्तीतून अरुंद रस्त्याने.. आपण साधारण १० मिनिटात समुद्रकिनारा उजवीकडे ठेवत एका टेकाडापाशी येवून पोचतो.. हाच बेतुलचा किल्ला..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्लाजवळचे गाव : मडगाव – बेतुल गाव (Betul village) २२ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा

दक्षिण गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून बेतुलचा किल्ला गोव्यातील बल्ली प्रांतातील हवालदाराने सौदेकर याच्या मदतीने इ.स. १६७९ साली बांधला असे इतिहासकार सांगतात.. गोव्यातील कितोल (Quitol) भागात हा किल्ला असून मडगाव पासून तो २२ किमी अंतरावर आहे.. बेतुल गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास फारसं कुणी सांगत नाही.. त्यामुळे गूगल नकाशाची मदत घेवून या किल्ल्यापर्यंत जाता येते.. बेतुल गावात पोहोचल्यावर एक तिठा लागतो.. इथे डावीकडे काबो-द-राम किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.. तर.. उजवीकडे एक चिंचोळा रस्ता बेतुल च्या किल्ल्याकडे जातो.. मच्छीमार वस्तीतून अरुंद रस्त्याने.. आपण साधारण १० मिनिटात एका टेकाडापाशी येवून पोचतो.. इथे किनाऱ्यावर नारळीची बाग आहे.. तिथेचं गाडी उभी करून डावीकडे दिसणाऱ्या एका क्रूसाकडे निघायचं.. इथे कस्टम ऑफिस ची बंद इमारत आहे.. थोडं पुढे गेल्यास एक बुरुज आणि बुरुजाच्या तटामध्ये पुरलेली एक तोफ दिसते.. हिच या किल्ल्याची मुख्य ओळख.. बेतूल किल्ल्याच्या बुरुजावरून खाडी परिसर अतिशय सुंदर दिसतो.. किनाऱ्यावर असलेली दुतर्फा नारळी च्या झाडांची झालर या परिसराची शोभा वाढविते.. एक हवीहवीशी शांतता या परिसरात अगदी ठासून भरलेली आहे.. 

तोफेचे तोंड ज्या बाजूला आहे.. तिथे खाडीपलीकडे बेतूल चा आरस्पानी समुद्रकिनारा आहे.. मच्छीमारकाकांना विनंती करून.. तिकडे तरीने जाता येते.. बुरुजाच्या डाव्या बाजूने खाली उतरण्यासाठी जागा आहे.. इथून आपण बुरुजाच्या पुढ्यात येवून पोहोचतो.. किनाऱ्यावर.. टेकडावर भिंत घालून.. त्यावर हा बुरुज उभारला आहे.. पण हा एकमेव बुरुज वगळता किल्ल्यावर आणखी काही अवशेष नाहीत.. खाली नारळीचे बन आणि किल्ल्याची सुरुवात यामध्ये उजव्या अंगाला कातळातून पाझरणाऱ्या झऱ्यावर.. पोर्तुगीजांनी बांधलेले एक पाण्याचे टाके आहे.. यातील पाणी आजही पिण्यायोग्य आणि थंडगार आहे.. थंडगार पाण्याची चव अनुभवून बेतूल किल्ल्याचा निरोप घ्यायचा आणि काबो-द-राम कडे निघायचं ..