मुरगाव किल्ला (Marmagao Fort) 

वाटाड्या मार्ग :  वास्को द गामा शहराच्या पुढे मुरगाव पोर्ट/बंदर चे कस्टम ऑफिस आहे.. या पोर्ट च्या उजवीकडे झाडोरयामध्ये आणि समुद्रकिनाऱ्याला खेटून मुरगाव चा किल्ला आहे. कस्टम ऑफिस कडून किल्ल्य्यापर्यंत जाण्यासाठी सिमेंटची पायवाट बांधली आहे..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्लाजवळचे गाव : वास्को द गामा – ३ किमी
किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकातराज्य : गोवा

वास्को द गामा शहराच्या पुढे मुरगाव पोर्ट/बंदर चे कस्टम ऑफिस आहे.. या पोर्ट च्या उजवीकडे मुरगाव चा किल्ला आहे.. हा किल्ला फ्रान्सिस्को-द-गामा या व्हाईसरॉय ने बांधला असे इतोहास्कर सांगतात.. पोर्तुगीज राजा.. डोम फिलीप याच्या कारकिर्दीत हा किल्ला उभारल्याचे इथल्या काही कोरीव कामावरून समजते.. किल्ल्याची बांधणी हि समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या एका बऱ्यापैकी उंच टेकडावर करण्यात आली आहे.. पणजी आणि वास्को शहरांच्या मध्ये असलेल्या खाडीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याची बांधणी करण्यात आली.. १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांच्या आक्रमणामुळे धास्तावलेल्या पोर्तुगीजांनी .. त्यांची राजधानी मडगावकडे नेण्याचे ठरवले होते.. आणि त्याच दरम्यान इथे काही नवीन तर काही जुन्या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली..

मुरगाव किल्ल्याचे ठिकाण हे वास्को बंदरावर पाळत ठेवता यावी यादृष्टीने मोक्याचे आहे.. सध्या .. किल्ल्याचे काही अवशेष.. मुरगाव कस्टम ऑफिसच्या उजव्या भागात पाहायला मिळतात.. त्यात.. किल्ल्याचे दोन तट एकमेकांना खेटून दिमाखात उभे ठाकल्याचे दिसते.. पोर्ट ऑफिस कडून इकडे येताना.. उजव्या अंगाला बर्यापैकी दाट झाडी आहे.. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी कस्टम वाल्यांनी .. चांगली कॉंक्रीटची वाट तयार केली आहे.. झाडी संपताच.. एक पुरातत्व खात्याचा बोर्ड लागतो आणि एक मोठे झाड.. त्यामागे.. तटबंदी दिसते.. डावीकडचा आणि मधला बुरुज मात्र बऱ्यापैकी भक्कम असाच वाटतो.. किल्ल्याचा मुख्य दरवाजा.. मधल्या बुरुजाच्या मागे दडविला आहे.. मधल्या बुरुजाच्या बाजूने थोडे पुढे गेल्यास.. एक दरवाजाची चौकट दिसते.. त्यातून प्रवेश करताच.. समोर अरबी समुद्र आणि उजवीकडे आणखी एक काटकोनात बांधलेली तटबंदी दिसते.. या तटबंदीवर चढून जाण्यासाठी.. ५०-६० पायऱ्यांचा जिना बांधला आहे.. जिन्याच्या पुढे तटबंदीमध्ये काही खोल्या बांधल्या आहेत.. या खोलीत एक झरोका आहे.. जो इथल्या बंदरावर लक्ष ठेवून आहे.. जिन्याच्या खाली एक लहानसे प्रार्थनास्थळ / चर्च बांधले आहे.. यात मदर मेरी चा पुतळा आणि एक लाकडी क्रूस आहे.. या चर्च कडे पाठ केल्यास.. समोरच्या प्रांगणात आणखी एक क्रूस एका अष्टकोनी लहानग्या मनोऱ्यावर उभारला आहे.. इथे खाली पोर्तुगीज भाषेत काही मजकूर कोरला आहे..