राचोल किल्ला (Rachol Fort Gate)

वाटाड्या मार्ग : मडगाव रेल्वे स्थानकापासून साधारण ७ किमी अंतरावर राचोल नावाचे गाव आहे.. या गावात आदिलशाही काळात बांधलेला राचोल नावाचा किल्ला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ णे पणजी ते मडगाव ला येवून पूर्वेकडे हा किल्ला आहे.. या दरवाजाने पुढे गेल्यास पत्रिअर्चल सेमिनरी ऑफ़ रासयैाल (Patriarchal Seminary of Rachol) नावाची भव्य चर्च आहे..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्लाजवळचे गाव : मडगाव (Margaon) ७ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा

राचोल चा किल्ला हा विजापूर च्या आदिलशाही साम्राज्याचा एक साक्षीदार आहे.. हा किल्ला इस्माईल आदिलशाह याच्या अखत्यारीत होता.. काही काल या किल्ल्यावर विजयनगर साम्राज्यातील एक राजा कृष्णराय याने तो जिंकून घेतला आणि आदिलशाही यावनांपासून संरक्षण मदतीच्या मोबदल्यात तो पोर्तुगीजांना बहाल केला.. १६८४ च्या दरम्यान पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तो पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी तहनामा स्वीकारल्यानंतर परत देवून टाकला.. पुढे इंग्रजांनी हा किल्ला जिंकला आणि पोर्तुगीजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.. तद्नंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या अखत्यारीत राहिला..

ह्या किल्ल्याबद्दलचा एक शिलालेख आहे त्याचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे तो असा: “THE EARL (Nobleman) OF ALVOR, VICEROY OF INDIA, ORDERED THIS FORTRESS’S RENOVATION AFTER DEFENDING THE SEIGE OF SHAMBAJI, ON 22 1684. APRIL”

राचोल किल्ल्याचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत यातील.. मुख्य दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे.. या दरवाजाच्या कमानीवर.. पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह आणि मुगुट कोरलेला आहे.. दरवाजाच्या अलीकडे खंडाकाचे काही अवशेष दिसतात.. या दरवाजातून पुढे अर्धा एक किमी अंतर चालून गेल्यास एक प्रशस्त रोमन क्याथोलिक चर्च दिसते.. हि पूर्वीच्या किल्ल्यात बांधली आहे.. सध्या खंदक आणि मुख्य दरवाजा सोडल्यास किल्ल्याची तटबंदी आणि इतर इमारती नामशेष झालेल्या आहेत.. यात भर म्हणून .. सरकारने मुख्य दरवाजा लगतची तटबंदी पडून रस्ता बांधला आहे.. तर मडगाव आणि जवळपासच्या भटकंती मध्ये ह्या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी