रीस मागोस किल्ला (Ries Magos Fort)

https://www.reismagosfort.com/architecture/

वाटाड्या मार्ग :  हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा टेकडीवरचा दुर्ग आहे. कंडोलीम गावातून आग्वाद किंवा सिंक्वेरीम किनाऱ्याकडे जाताना अलीकडे डावीकडे रीस मागोस गावाकडे (पणजी कडे) जाण्याचा रस्ता आहे.. नेरूळ नदीच्या पुलावरून या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे.. या गावाजवळच मांडोवी नदी समुद्राला जिथे मिळते तिथे किनाऱ्यावरील एका टेकडीवर हा किल्ला बांधला आहे ..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्लाजवळचे गाव : कॅन्डोलीम (Candolim) ३ किमी
किल्ल्याची निर्मिती : १५ व्या शतकातराज्य : गोवा

या किल्ल्याची निर्मिती आदिलशहाने १४९५ मध्ये केली असे म्हणतात.. हा किल्ला आग्वाद किल्ल्याच्या आधी बांधला आहे.. कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा टेकडीवरचा दुर्ग आहे. कंडोलीम गावातून आग्वाद किंवा सिंक्वेरीम किनाऱ्याकडे जाताना अलीकडे डावीकडे रीस मागोस गावाकडे (पणजी कडे) जाण्याचा रस्ता आहे.. कॅन्डोलीम-नेरूळ-रीस मागोस गाव असा ३-४ किमी चा रस्ता आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी घेवून येतो.. या गावाजवळच किनाऱ्याच्या अलीकडे एका टेकडावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.. किल्ल्याच्या अलीकडे रीस मागोस चे मोठे चर्च आहे.. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे.. मांडोवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास साधारण एक ते दिड तास पुरे.. इथे बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा, डागडुजी केलेले बूरुज आणि गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोवयाचा नजारा तर अफलातूनच.. या शिवाय गडाच्या मुख्य द्वाराच्या आत कमानीत दडलेले ‘डेथ होल’ म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच..

गडाच्या मध्यभागी एक म्युझियम उभारले असून यात या किल्ल्याच्या पुनर्बांधणीची काही छायाचित्रे गडाचे पूर्वीचे आणि आत्ताचे रूप यातला बदल दाखवतात.. गडावरच्या तोफांना लाकडाचे गाडे बसविल्याने ते रुबाबदार वाटतात.. गडावरून पणजी शहराचा एक सुंदर नजरा आहे.. आणि पणजी शहराच्या दिशेने उतरत जाणारा दोन दगडी पायऱ्यांचा जिना आहे.. तो पाहायचा असल्यास किल्ल्याला पायथ्याने गाडीरस्त्याने डावीकडे वळसा मारून जावे लागते.. किल्ल्यावर तुरुंग, समुद्राकडे उतरणारे दोन समांतर जिने, प्रवेश दरवाजा, भक्कम बुरुज, त्यावर उभारलेले कॅप्सूल बुरुज, अधिकारी आणि सैनिकांच्या पहाऱ्यासाठी बांधलेल्या खोल्या आणि भक्कम तटबंदी असे अवशेष आहे.. पोर्तुगीज दुर्गबांधणी कौशल्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या किल्ल्याचा आलेख करायला हवा..

गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक वटवृक्ष आहे.. हा महाकाय वटवृक्ष एका नारळाच्या झाडावर परावलंबी (Parasite) होवून वाढला.. पुढे हे मूळ नारळाचे झाड कोसळले आणि हा वृक्ष उन्मळण्याच्या बेतात होता, पण याची २००८ सालामध्ये दुरुस्त करण्यात आली.. झाडाच्या खोडात सिमेंट कॉन्क्रीट (Concrete) चा कॉलम भरून त्याला स्थैर्य देण्यात आले.. झाडाच्या फांद्या स्टीलच्या तारांनी ओढून धरल्या आणि अखेर हा वृक्ष तगला.. इकडे गोव्यात एका झाडाला वाचवण्यासाठीही ही वणवण तर तिकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘कॉन्क्रीट (Concrete) जोडो टेकडी फोडो’ अभियान केवढा हा विरोधाभास. म्हणूनच म्हटलं आमचो गोव्यात बघण्यासारखं बरंच काही आहे चंगळवादाशिवाय.. चंगळवाद हा बोनस आहे, ‘इथला आरस्पानी निसर्ग आणि संस्कृती हेच काय ते खरं’..