छापोरा किल्ला (Chapora Fort)

वाटाड्या मार्ग :  हा किल्ला अंजुना गावाच्या पुढे वागेटर समुद्र किनाऱ्याजवळच्या ( vagotar beach) एका पुळणीवरच्या टेकडावर बांधला आहे.. हा किल्ला तिन बाजूनी पाण्याने वेढला आहे.. इथे येण्यासाठी कलंगुट वरून येता येते..

कसे जाल आणि काय पाहाल ?

किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्लाजवळचे गाव : अंजुना (Anjuna) २ किमी – कलंगुट – ६ किमी
किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकातराज्य : गोवा तालुका – बार्देझ

छापोरा किल्ला हा १६व्या शतकात आदिलशहा ने बांधला असं म्हणतात.. ह्या भागाचे मुल नाव शाहपुरा.. पोर्तुगीजांनी त्या नावाचा अपभ्रंश शापोरा करून टाकलं.. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी १६८३ दरम्यान हा किल्ला जिंकून घेतला आणि कालांतराने तो पोर्तुगीजांनी १७१७ साली जिंकला.. आणि या किल्ल्याची पुनर्बांधणी केली.. एके या किल्ल्यात सेंट अंथोनी चर्च होती असे म्हणतात.. सध्या किल्ल्याचा प्रवेश दरवाजा अजून सुस्थितीत आहे.. या शिवाय कॅप्सूल बुरुज, सुस्थितीतला  दरवाजा, भव्य तटबंदी आणि मावळतीचा एक भव्य  नजारा असं या किल्ल्याचे वर्णन करावे लागेल.. किल्ल्याचा पसारा मोठा आहे.. किल्ला भ्रमंतीसाठी साधारण २ तास पुरे ..

हा किल्ला अंजुना गावाच्या पुढे वागेटर समुद्र किनाऱ्याजवळच्या ( vagotar beach) एका पुळणीवरच्या टेकडावर बांधला आहे.. हा किल्ला तिन बाजूनी समुद आणि छापोरा खाडीच्या पाण्याने वेढला आहे.. एका बाजूला छापोरयाची नदी-खाडी आणि एका बाजूला अरबी समुद्र असा २७० अंश मेगा नजारा या किल्ल्यावरून पाहायला मिळतो.. इथे येण्यासाठी कलंगुट वरून येता येते.. मित्रांनो ‘दिल चाहता है’ चित्रपटात दाखवलेला नजारा याच किल्ल्यावरचा.. तांबूस पिवळ्या रंगाची सांजवात क्षितिजापार मालवेपर्यंत इथल्या तटबंदीवरून पाहणे म्हणजे एक विलक्षण योग आहे..