ब्रम्हगिरी किल्ला / त्रिंबकगड (Trimbak / Bramhagiri Fort) – दुर्ग भंडार (durg bhandar fort)

वाटाड्या मार्ग :  त्र्यंबकेश्वर – जव्हार रोड –  खिंड – तिठ्याच्या अलिकडे डावीकडे – मग मुख्य रस्ता सोडून पुन्हा डावीकडे कच्च्या रस्त्याने मेटघरकडे – मेटघर – मेटघर किल्ल्याला खेटून असलेल्या वाडीच्या अलिकडे डावीकडे पायवाटेने वर चढायचं.. ब्रम्हगिरीचा डोंगर उजवीकडे ठेवत.. पायऱ्यांच्या वाटेकडे.. बांधीव पायऱ्यांनी त्र्यंबक दरवाजाने ब्रम्हगिरी चा गडमाथा गाठायचा.. त्रिंबक / मुख्य दरवाजा : त्र्यंबकेश्वर पासून…

छापोरा किल्ला (Chapora Fort)

वाटाड्या मार्ग :  हा किल्ला अंजुना गावाच्या पुढे वागेटर समुद्र किनाऱ्याजवळच्या ( vagotar beach) एका पुळणीवरच्या टेकडावर बांधला आहे.. हा किल्ला तिन बाजूनी पाण्याने वेढला आहे.. इथे येण्यासाठी कलंगुट वरून येता येते.. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्ला जवळचे गाव : अंजुना (Anjuna) २ किमी – कलंगुट – ६ किमी…

तेरेखोलचा किल्ला (Terekhol/Tiracol Fort)

वाटाड्या मार्ग : तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर हा किल्ला बांधला आहे.. इथे पोहोचण्यासाठी सावंतवाडीवरून येता येते किंवा गोव्यातील क्वेरीम गावातून फेरी बोटीने जाता येते (Querim Village). पणजी पासून हा किल्ला साधारण ४२ किमी अंतरावर आहे.. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्ला जवळचे गाव : क्वेरीम गाव…

रीस मागोस किल्ला (Ries Magos Fort)

वाटाड्या मार्ग :  हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा टेकडीवरचा दुर्ग आहे. कंडोलीम गावातून आग्वाद किंवा सिंक्वेरीम किनाऱ्याकडे जाताना अलीकडे डावीकडे रीस मागोस गावाकडे (पणजी कडे) जाण्याचा रस्ता आहे.. नेरूळ नदीच्या पुलावरून या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे.. या गावाजवळच मांडोवी नदी समुद्राला जिथे मिळते तिथे किनाऱ्यावरील एका टेकडीवर हा किल्ला बांधला आहे …..

अग्वाद किल्ला (Aguada Fort – Upper and Lower)

वाटाड्या मार्ग :  गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यात आणि बार्देझ किंवा बारदेश तालुक्यात हा किल्ला असून कलंगुट किनाऱ्याच्या अलीकडील कॅन्डोलीम (Candolim) गावापासून साधारण ३-४ किमी अंतरावर हा ठाण मांडून बसला आहे.. कॅन्डोलीम गावाच्या दक्षिणेकडे हा किल्ला आहे.. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्ला जवळचे गाव : कॅन्डोलीम (Candolim) ४ किमी किल्ल्याची…

काबो-द-राम किल्ला (Cabo the Ram fort)

वाटाड्या मार्ग :  बेतूल तिठ्यावरून डावीकडे १०-११ किमी अंतरावर काबो द राम चा किल्ला समुद्रतटावर बांधला आहे.. हा किल्ला काणकोण (Canaconna) या तालुक्यात येतो.. बेतूल गाव पार करताच आपण एक घाट चढून पठारावर येवून पोहोचतो.. इथे पठारावरील निर्मनुष्य रस्त्याने पाच-सहा किमी नंतर एक वस्ती (Nuem Village)आणि पुढे जंगल सुरु होते.. या जंगलातून एक रस्ता उजवीकडे…

बेतुल चा किल्ला (Betul Fort)

वाटाड्या मार्ग :  गोव्यातील कितोल (Quitol) भागात हा किल्ला असून मडगाव पासून दक्षिणेकडे गेल्यास तो साधारण २२ किमी अंतरावर आहे.. बेतुल गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास फारसं कुणी सांगत नाही.. त्यामुळे गूगल नकाशाची मदत घेवून या किल्ल्यापर्यंत जाता येते.. बेतुल गावात पोहोचल्यावर एक तिठा लागतो.. इथे डावीकडे काबो-द-राम किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.. तर.. उजवीकडे एक चिंचोळा रस्ता…

राचोल किल्ला (Rachol Fort Gate)

वाटाड्या मार्ग : मडगाव रेल्वे स्थानकापासून साधारण ७ किमी अंतरावर राचोल नावाचे गाव आहे.. या गावात आदिलशाही काळात बांधलेला राचोल नावाचा किल्ला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ णे पणजी ते मडगाव ला येवून पूर्वेकडे हा किल्ला आहे.. या दरवाजाने पुढे गेल्यास पत्रिअर्चल सेमिनरी ऑफ़ रासयैाल (Patriarchal Seminary of Rachol) नावाची भव्य चर्च आहे.. कसे जाल आणि काय…

मुरगाव किल्ला (Marmagao Fort) 

वाटाड्या मार्ग :  वास्को द गामा शहराच्या पुढे मुरगाव पोर्ट/बंदर चे कस्टम ऑफिस आहे.. या पोर्ट च्या उजवीकडे झाडोरयामध्ये आणि समुद्रकिनाऱ्याला खेटून मुरगाव चा किल्ला आहे. कस्टम ऑफिस कडून किल्ल्य्यापर्यंत जाण्यासाठी सिमेंटची पायवाट बांधली आहे.. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : टेकडीवरचा किल्ला जवळचे गाव : वास्को द गामा – ३ किमी…

फोंडा किल्ला (Ponda Fort)

वाटाड्या मार्ग : फोंडा गावातून फोंडा ST स्थानकातून.. फोंडा-पणजी राज्य महामार्गावर साधारण ३ किमी पुढे फार्मागुडी नावाचे गाव आहे.. गोपाळ गणेश मंदिरासमोर सध्या एक प्रतिकात्मक किल्ल्याची वास्तू उभारली आहे आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आवेशपूर्ण अश्वारूढ पुतळा बसविला आहे.. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्ला जवळचे गाव : फार्मागुडी –…

 ग्यास्पर डायझ किल्ला (Gasper Diaz Fort)

वाटाड्या मार्ग : FORTE DA PONTE DE GASPAR DIAS .. पणजी शहर दर्शन मधील .. एक दुजे के लिये.. सिंघम फेम डोना पौला या ठिकाणी जाताना हमरस्त्यावर.. मीरामार किनाऱ्यावर (Beach) एक सर्कल आहे.. त्यावर एक तोफ मध्यभागी ठेवली आहे.. हीच या किल्ल्याची एकमेव उरलेली ओळख.. सध्याच्या ग्यास्पर डायझ टेनिस क्लब भागात हा किल्ला अस्तित्वात होता. कसे…

सेंट इस्तेंव / जुवे बेटावरचा किल्ला (St. Estevam / Juve Fort) 

वाटाड्या मार्ग : पणजी – ओल्ड गोवा रस्त्याने पुढे बेन्स्तरी गाव आहे.. तिथून डावीकडे जुवे गावात जाण्याचा रस्ता आहे.. इथे जुवे गावात एका टेकडावर.. हा सेंट इस्तेव / जुवे चा किल्ला आहे.. जुवे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने एक बोर्ड हि लावला आहे.. या बोर्डापासून वर टेकडावर जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता आहे.. गाडी थेट वर पर्यंत…

साखळी चा किल्ला (Sanquelim Fort)

वाटाड्या मार्ग : हा किल्ला म्हापसा बिचोली रस्त्याने बिचोली आणि पुढे साखळी (Sanquelim) गाव आहे.. वाळवंटी नदीच्या काठावर एकेकाळी हा किल्ला अस्तित्वात होता.. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : टेकडी वरचा किल्ला जवळचे गाव : साखळी (Sanquelim) 0 किमी किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकात राज्य : गोवा म्हापसा बिचोली रस्त्याने बिचोली आणि…

तिवीम / कोळावले किल्ला (Thivim / Colavale Fort) 

वाटाड्या मार्ग : तिवीम ला कोकण रेल्वे चे स्थानक आहे.. म्हापसा- बिचोली रस्त्याने म्हपस्याकडेकडे जाताना कोपरे (Coprem) गावातून उजवीकडे फुटलेल्या रस्त्यावर कोलावले चा किल्ला आहे. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्ला जवळचे गाव : तिवीम (Thivim) १ किमी किल्ल्याची निर्मिती : १६ व्या शतकात राज्य : गोवा तिवीम मध्ये एकूण तिन…

वल्लभगड / हरगापूरचा किल्ला (Vallabhgad Fort) 

वाटाड्या मार्ग : पुणे ते अंबोली रस्त्यावर निपाणीच्या पुढे आणि संकेश्वर च्या अलीकडे ५ किमी अंतरावर वल्लभगड हा बऱ्यापैकी भरभक्कम असा किल्ला आहे.. संकेश्वरच्या अलीकडे असणाऱ्या दोन टेकडापैकी एका टेकडावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.. गडाच्या पायथ्याशी हरगापूर नावाचे गाव आहे.. या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता किल्ल्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने प्रदक्षिणा…

खोर्जुवे किल्ला (Corjeum Fort) 

वाटाड्या मार्ग : हा किल्ला म्हापसा – बिचोली रस्त्यावरील अल्डोना गावाजवळ आहे.. अल्डोना वरून घाट रस्ता पार करताच एक पूल लागतो.. या पुलावरून अर्धा .मी. वर टेकडावर जाताच आपण एका वस्तीपाशी पोहोचतो.. इकडे.. उजवीकडे एका पटांगणात मध्यभागी खोर्जुवे किल्ला ठाण मांडून बसल्याचे आपल्याला दिसते. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : टेकडी वरचा किल्ला…

हळर्णे किल्ला (Alorna Fort)

वाटाड्या मार्ग : सावंतवाडी – बांदा – कळणे गाव – हसापूर गाव मार्गे आपल्याला हळर्णे गावी जाता येते.. या गावातून उजवीकडे कालवल खाडीकडे जाणारा डांबरी रस्ता आहे.. तिथे हा भुईकोट किल्ला आहे .. कसे जाल आणि काय पाहाल ? किल्ल्याचा प्रकार : भुईकोट जवळचे गाव : म्हापसा ३० किमी किल्ल्याची निर्मिती : १७ व्या शतकात…

गडकोटांवरची शक्तिपीठे – २०१३

गडकोटांवरची शक्तिपीठे अश्विन शुक्ल पक्षात सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाचा जल्लोष हा भक्तांनी देवीच्या शक्तिला दिलेली एक मानवंदना आहे. नऊ दिवस देवीच्या विविध शक्तिरुपाची पूजा करून देवीला साकडं घातलं जातं आणि देवीची यथासांग पूजा केली जाते. दैत्य निर्मूलनाचा देवीचा महिमा मार्कण्डेय पुराणात यथासांग वर्णन केला आहे. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत कोल्हासुराचा वध करणारी कोल्हापूर ची अंबाबाई,…

“ढाक ते भिवगड” – एक वाट अनगड – 2017

“ढाक ते भिवगड” – एक वाट अनगड वाटाड्या मार्ग: कामशेत – जांभवली – कोंडेश्वर – ढाक पायथा – उजवीकडे – ढाक च्या डोंगराला उलटी प्रदक्षिणा – ढाक गाव – गारुबाई/खेतोबा मंदिर – गाळदेवी घाट – खिंड –  भिवगड – वदप (कर्जत) .. एकदिवसीय भटकंती शहरी मरगळ काखोटीला मारून रोज मर्रा कि जिंदगी जगताना.. शहरी सुखाला चटावलेल्या या मनाला सतत वाटत होतं.. एक ब्रेक पाहिजे यार.. ऑफ-बीट ट्रेक किंवा एखादा किल्ला.. उप्या कोल्हापूरात बिझी.. तर चंद्रकांत अन्ना तिकडे हैद्राबादला लुंगी डान्स करायला गेलेला.. एक महिना नो ट्रेक.. झिरो मूव्हमेंट.. मनावर मळभ दाटू लागले.. आणि अशाच एका विकेंड संध्याकाळी सरदार चा दूरध्वनी आला.. अरे क्रॉस-कंट्री ट्रेक आहे येतोस का..! असं ऐतवारच्या…

बामणोली ते रसाळगड – १९९६

बामणोली ते रसाळगड – १९९६ टीप: या ट्रेक मधील काही फोटो हे इन्टरनेट वरून डाउनलोड करून वापरले आहेत..यामागील हेतू फक्त आणि फक्त लेखनातील संदर्भ  अधोरेखित करण्याचा आहे.. कुणाचा आक्षेप असल्यास.. ते वगळण्यात येतील.. त्यासाठी.. वाटाड्या ब्लॉग वर निरोप धाडावा.. धन्यवाद.. माधव कुलकर्णी