||..इश्क-ए-दिल्ली..|| – २०१४

||..इश्क-ए-दिल्ली..|| दिल्ली.. शहरांचे शहर.. एक महानगर.. या दिल्लीला महानगर म्हणायचं कारण इथे अनेक छोट्या नगरांची मिळून हि महानगरी तयार झाली आहे.. ख्रिस्तपूर्व काळात सुमारे ५००० वर्षांपूर्वी पांडवानी वसवलेले इंद्रप्रस्थ नगर, जहापनाह प्राचीर, सिरी, तुघलकाबाद, आदिलाबाद, फिरोजाबाद, दिनापनाह, शहाजनाबाद आणि इंग्रजांनी वसवलेले नवी दिल्ली.. इथल्या या उपनगरांना मात्र एक राजेशाही इतिहास आहे.. दिल्लीत किल्ले किती आहेत…

भटकंती २०१६: अजस्त्र सुधागड – आणि नितांतसुंदर ठाणाळे लेणी

भटकंती २०१६: अजस्त्र सुधागड – आणि नितांतसुंदर ठाणाळे लेणी वाटाड्या मार्ग: पुणे ते खोपोली.. पाली.. गणपती मंदिर – पाली ते भिरा रस्ता – पाच्छापूर – उजवीकडे – ठाकूरवाडी – सुधागड किल्ला – डोंगरवाडी – पाली – ठाणाळे गाव – ठाणाळे लेणी – ठाणाळे गाव – —– – खोपोली – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग – पुणे.. चिंब भिजलेले.. थेट दरीत झेपावणारे एक झाड.. पळसाच्या पानावरून ठिबकणारे पावसाचे थेंब.. डोंगर चढून जाताच एका दरी-खोऱ्याचा पाहिलेला विराट नजारा.. दरीत डोकावणाऱ्या साल नसलेल्या झाडाच्या उनाड फांद्या.. टकमक टोकाशी झालेली डोळ्यांची चकमक.. कातळाला खोदून काढलेली ती कातळकोरीव पायवाट.. बुरुजाच्या कोथळा काढून काढलेला एक पोटजिना आणि चोर दरवाजा…..

सह्याद्रीतील सात आश्चर्ये .. (Sahyadri 7 Wonders)

बाळूबाई-कोंबड किल्ला – भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा – महाकाळ-बितंगा किल्ला – कळसुबाई -साकुरी-किर्डा/किरवा – पंधारा/पांढरा Balubai – Kunjargad/Kombada Fort, Bhairavgad-Ghanchakkar-Gawaldev-Muda, Mahakaal/Mahankaal-Bitangad, Kalsubai-Sakuri-Kirdi/Kirda/Kirva – Pandhara/Pandhaara सह्याद्री सेव्हन वंडर्स :- पुणे – राजगुरूनगर – आळेफाटा – ओतूर – उदापूर-मुठाळणे घाटरस्ता – मुठाळणे –  कोपरे – फोफसंडी – दर्याबाई मंदिर – मांडवी नदीचा उगम – बाळूबाई घाट रस्ता – बाळूबाई-xxxx खिंड…

अंबोली परिसरातील किल्ले भ्रमंती

अंबोली परिसरातील किल्ले भ्रमंती Rangana, Bhudargad, Vallabhgad/Hargapurgad, Narayangad, Mahadevgad, Manohar-Mansantoshgad वाटाड्या मार्ग:- पुणे – कोल्हापूर – कागल – गारगोटी – भुदरगड – आजरा – गेळे गाव (अंबोली) – नारायणगड – गेळे गाव – कावळेसाद – अंबोली ग्रामपंचायत – महादेवगड – अंबोली घाट – माणगाव  (सिंधुदुर्ग)- शिवापूर – मनोहर-मनसंतोषगड – गोठवे – शिरशिंगे – अंबोली –…

सुमार-महीपत-रसाळगड: एक भन्नाट भटकंती – २०१६

सुमार–महीपत-रसाळगड: एक भन्नाट भटकंती रसाळगड, सुमारगड, महीपतगड, पालगड, मंडणगड Rasalgad, Sumargad, Mahipatgad, Paalgad, Mandangad सह्याद्रीच्या डोंगरवाटा.. इथल्या दऱ्याखोऱ्यातून..पानापांतून..रानोवानातून यत्र-तत्र-सर्वत्र वाहणारा.. खट्याळ मस्तवाल वारा.. अंगावर येणारे कातळकडे.. भटक्या मंडळींचं पार घामटं काढणारी चढण.. अंगाचं सालटं सोलवटणारी एखादी काटेरी झुडूपातील चाल.. मनात धडकी भरवणाऱ्या दऱ्या खोऱ्यांचा एक भव्य नजारा.. कुठे डोंगर माथ्यावर बांधलेलं एक छानसं दगडी राउळ.. काळाच्या पटावर धडधडून शांत झालेल्या एका तोफेशी झालेली काही क्षणांची कश्मकश.. कधी अंतर्मुख करून टाकणारी इथली निरव शांतता.. पार वैराग्याची अनुभूती देणारी.. सब मिथ्या है..  हि प्रचीती देणारी.. माणसाच्या तोंडावरचा दुनियादारी चा मुखवटा…

दिवस ११वा – संभाजीनगर जिल्ह्यातील भटकंती – ४

भांगशीमाता गड, खुल्ताबाद किल्ला, वेरूळ-घृष्णेश्वर मंदीर, भोसले गढी, लहुगड किल्ला’ भांगशीमातागड – मोहिमेचा शेवटचा दिवस आज निश्चित करण्यात आला.. भांगशीमातागडपाहून पुढे जाण्याचे ठरले.. भांगसाई गड असे हि या गडाचे नाव.. गडाची उंची हि समुद्रसपाटीपासून साधारण २७०० फुट आहे.. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात.. औरंगाबादपासून १४ मि.मी. अंतरावर.. देवगिरी रस्त्याने जाताच…

दिवस १० वा – संभाजीनगर जिल्ह्यातील भटकंती – ३

rest day.. किल्ले देवगिरी, पाणचक्की मराठवाडा भटकंती मधील आजचा दहावा दिवस.. आज रेस्ट डे घोषित करण्या आला होता.. त्यामुळे थेट दुपारी उठलो आणि जेवणास निघालो. एस. टी. स्थानकाजवळ साई लॉज वर यंदाचा मुक्काम पडला होता.. दुपारी ३ च्या दरम्यान देवगिरी किल्ला पाहण्यास निघालो.. औरंगाबाद–वेरूळ रस्त्यावर देवगिरी/ दौलताबाद किल्ला आहे.. हिंदवी स्वराज्यावर जुलमी यवन राज्यकर्त्यांची वक्रदृष्टी…

दिवस ९ वा – संभाजीनगर जिल्ह्यातील भटकंती – २

नायगावचा सुतोंडा किल्ला, उमरखेड किल्ला, अंतुरचा किल्ला जंजाळा ते नायगाव हा प्रवास अगदी निर्मनुष्य असा होता.. अंधारल्या वाटांच्या सोबतीने घाटनांद्रा मार्गे.. बनोटी गावी पोहोचलो आणी इथे शंकराच्या मंदिरात तंबू उभारला.. घर दूर सोडून आता आठ दिवस झाले होते.. त्यामुळे मंदिरातला मुक्काम आता अंगवळणी पडला होता.. इथे एक भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली पथाऱ्या पसरल्या.. रात्रीचे साधारण…

दिवस ८ वा – संभाजीनगर जिल्ह्यातील भटकंती – १

फर्दापूर सराई, अजिंठा सराई, अजिंठ्याचा भुईकोट, वाडीचा किल्ला, जंजाळे किल्ला.. नरनाळा किल्ले भ्रमंती नंतर थेट संभाजीनगर गाठण्याचे ठरले होते.. मराठवाडा भटकंतीमधील हा शेवटचा टप्पा.. जमेल तेवढे किल्ले पाहून हि भटकंती सार्थ करण्याचे एकमुखी मान्य करण्यात आले.. लाजवंती आता न लाजता धावत होती.. या किल्ल्यांच्या ओढीने.. फॉर्म्युला १ चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दिनेश राव अविरत गाडी…

दिवस ७ वा – मेळघाट अभयारण्य आणि नरनाळा

मेळघाटातील दुर्गत्रिकुट किल्ले ‘नरनाळा’ – ‘तेलियागड’ (राजगड) – ‘जाफरागड’, मूळ नरनाळा किल्ला आठव्या शतकात हस्तिनापुर येथील पांडवकुळातील राजा नरेंद्रपुरी याने बांधला, त्यानंतर दहाव्या शतकात राजा नरनाळा स्वामी या राजाचे इथे शासन होते. नरनाळा स्वामी हा ‘राजा वैराट’ आणि ‘राजा इल’ यांच्या काळातील समकालीन राजा होता. इ स १४३५ मध्ये बहामनी राजा अहमदशाह याने नरनाळा जिंकला…

दिवस ६ वा – अकोला जिल्ह्यातील भटकंती

मिर्झा राजे जयसिंग छत्री, बाळापुर किल्ला, अकोल्याचा ‘असदगड’ किल्ला.. अकोला जिल्ह्यातील पूर्व–पश्चिम वाहणारी पूर्णा नदी हि मुख्य जीवनदायिनी, पुढे या नदीला विद्रुपा, काटेपुर्णा, मोर्णा या नद्या येवून मिळतात. अकोला जिल्ह्यात सातपुडा रांगेतील डोंगराळ भाग, अजंठा रांगेतील तसेच गाविलगड डोंगराळ प्रदेशातील काही भाग येतो. अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मेळघाट अभयारण्य सुरु होते, तसेच काटेपुर्णा अभयारण्य देखिल साग,…

दिवस ५ वा – नांदेड जिल्ह्यातील भटकंती

उदगीर चा किल्ला, कंधार किल्ला, नांदेड चा भुईकोट किल्ला’ उदगीरचा बलशाली दुर्ग – सकाळी सातला आवाराआवर सुरु झाली.. उन्हं डोक्यावर नाचाण्याआधी उदगीर करून मावळतीला नांदेड गाठायचा प्लान ठरला.. त्यामुळे कार्यकर्ते फटाफट तयार झाले.. अन्ना ने मात्र पाठ दुखत आहे आणि जास्त दुखल्यास मी ST पकडून पुण्याला जातो असा वागबाण सोडला.. आणि सकाळीच एका हाडाच्या डॉक्टर…

दिवस ४ था – लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती

औसा किल्ला आणि नळदुर्ग किल्ला भुकेला अन्ना जेवण करून तृप्त झाल्याचे पाहून धर्मापुरीचा निरोप घेतला आणि अंबेजोगाई बायपास करून लातूर कडे निघालो.. उद्याचे पहिले लक्ष्य औसा किल्ला मग महाकाय नळदुर्ग पाहून उदगीरचा किल्ला करण्याचे एकमुखाने मान्य करण्यात आले. घाट–नांदूर मार्गे निघालो आणि डावीकडे अन्ना स्पेशल जी.पी.एस. वाटाड्या सांगेल तसे – गावातून डावीकडे निघालो.. कुरकुर न करता…..

दिवस ३ रा – बीड जिल्ह्यातील भटकंती

धारूर चा किल्ला, आडस ची गढी, धर्मापुरी किल्ला आणी केदारेश्वर मंदीर भल्या पहाटे सहाला आवाराआवर सुरु झाली, तंबूचा भेंडोळा करून कपिलधाराच्या जलधारांमध्ये शुचिर्भूत होण्यास निघालो. कपिलधारातील कातळकड्याच्या आडव्या रेषेवर सूर्यदेवाची एन्ट्री अजून व्हायची होती. अन्नाने रुद्र अभिषेकाचं बुकिंग केल्याने कार्यकर्त्यांना बिगीबिगी अभ्यंगस्नान उरकण्याची तंबी देण्यात आली. इथे पाण्यात उतरलो आणि समोरून येणाऱ्या थोड्या वयस्क काकांनी…

दिवस २ रा – उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील भटकंती

सोनारीचे भैरवनाथ मंदीर, खर्डा/शिवपट्टण किल्ला, बीडचा नगरदुर्ग, कंकाळेश्वर मंदीर,कपिलधारा तीर्थक्षेत्र सोनारीचा कालभैरवनाथ – सकाळी जाग आली. डोळे चोळत बाहेर ओसरीवर येवून पहिले तर यत्र–तत्र–सर्वत्र.. जळी–स्थळी–काष्ठी–पाषाणी माकडेच माकड. घर म्हणू नका, खिडक्या म्हणू नका, मंदिर म्हणून नका.. जिकडे बघावी तिकडे माकडेच माकडे. नुसता उच्छाद मांडला होता मर्कटांनी. सोनारीचा कालभैरव हा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कालभैरव मंदिराभोवती…

दिवस १ला – सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भटकंती

अकलूज किल्ला आणि शिवसृष्टी, टेंभूर्णी ची गढी, माढा किल्ला, परंडा किल्ला अकलूज किल्ला – अकलूज किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण. तटबंदी बांधताना वापरलेल्या विशाल विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेल्या टेहळणी बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहताना मन भूतकाळात जाऊन पोहचतं. नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे उत्तुंग बुरुज, घाटावरील पिळदार…

मराठवाड्यातील दुर्लक्षित किल्ले

मराठवाडा.. बहामनी (मुघलशाही, बेदरशाही, आदिलशाही, निजामशाही) सत्तेच्या वरवंट्याखाली रगडलेला मराठवाडा. यवनी पाशवी अत्याचाराचा मूक साक्षीदार म्हणजे मराठवाडा. सत्तांतराची साक्ष देणारा मराठवाडा.. तसेच नामांतराची चळवळ छातीवर झेलणारा मराठवाडा. या मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो, उस्मानाबाद–बीड–लातूर–परभणी–नांदेड–हिंगोली–जालना–औरंगाबाद. साधारणतः उजाड माळरान भूभाग म्हणजेच पठारी प्रदेश, निसर्गाने आखडून घेतलेला हात आणि राजकारण्यांनी दिलेलं आश्वासनांचे डोईजड गाठोडे. साठ वर्षांच्या स्वतंत्र भारतातील…

‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग ३

राजधेर – कोलधेर – इंद्राई – चांदवड वाटाड्या मार्ग क्र. ९: खेळदरी गाव – मंगरूळ गाव – टोलनाका – नाशिक-आग्रा महामार्ग – चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे गाव – राजधेरवाडी.. (२५-२७ कि.मी.) वाटाड्या मार्ग क्र. १०: चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे…

‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग २

सप्तशृंग-गड, मार्किंड्या किल्ला, रवळ्या-जावळ्या, किल्ले धोडप, कांचन-मंचन किल्ला सप्तशृंगगड – बाबाजी का दिव्य आदेश वाटाड्या मार्ग क्र. ४: अहिवंतगड – नांदुरी रोड – सप्तशृंगी फाटा – सप्तश्रुंगगड (१४ कि.मी.) सकाळी सहाचा गजर लावून आठला सगळे रेडी झाले.. गडावर जायचं असल्याने.. कडक गारेगार पाण्यातच अभ्यंगस्नान उरकून घेतले.. आणि मंदिराकडे निघालो.. दुकानाच्या अडथळे पार करीत.. गडावर जाणाऱ्या…

‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग १

हातगड, अंचला, अहिवंत किल्ला, कण्हेरा किल्ला                               (६ ते १२ डिसेंबर २०१३)   सह्याद्रीच्या दिव्य डोंगररांगा भटक्यांना कायम आव्हान देत असतात.. सातारा जिल्ह्यातील शंभू महादेव, नगर जिल्ह्यातील कळसुबाई-पट्टा रांगा, बागलाण मधील सेलबारी-डोलबारी रांग, नाशिकच्या देवभूमीतील त्र्यंबक रांग, नाशिक-चांदवड-ते-औरंगाबाद पर्यंत पसरलेल्या सातमाळा-अजंठा,…