सातमाळा – एक कविता

सातमाळा – एक कविता सह्य पर्वताची माळ.. उभी साता डोंगराची होड लागली नभाशी.. तिथं डोंगरमाथ्यांची  उंच माथ्यावरी उभा.. एक अचल संन्यासी बुध्याच्या शेजारी.. असे अहिवंत आभासी काटा कन्हेरी बेलाग.. उभ्या कातळाला घोर सात डोंगरी वसली.. सप्तश्रुंग माता थोर शिवे रक्षिला मार्किंड्या.. राहे उंच माथ्यावरी रवळ्या-जावळ्याची जोडी.. उभी डोंगर-पठारी शेंबी धोड्प्याची नाचे.. सातमाळेच्या डोईला वीट सोन्याची…

अग्निपथ..! अग्निपथ..! अग्निपथ..!

अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! (मूळ कविता) वृक्ष हों भले खड़े हों घने, हों बड़े एक पत्र छाँह भी मांग मत! मांग मत! मांग मत! अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! तू न थकेगा कभी तू न थमेगा कभी तू न मुड़ेगा कभी कर शपथ! कर शपथ! कर शपथ! अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! यह महान दृश्य है चल रहा मनुष्य है…

Summit – मराठी कविता

SUMMIT पानातून डोकावणारा सूर्य..  अन रानातून जाणारी वाट दोघेही चालतात समांतर.. मध्ये आसमंताचे अंतर  ठेवून दिवसभराची पायपीट करून .. जेंव्हा मी गाठतो .. दुर्गमाथा  तेंव्हा सूर्य निघालेला असतो.. आज पुन्हा दुस-या  डोंगराआड पुन्हा एकदा समांतराकडे.. मुकाट खाली मुंडी घालून खरं तर अशा कातर क्षणी.. मग नेमकं सुचत नाही  मनाला नेमकं काय हवं असतं? तो सूर्य.. ते क्षितीज कि.. माझी जिवाभावाची सावली? दिवसभर… पायाखाली चालणारी… मावळतीला मुजोरपणे उंचावत.. जावून तिथे अदृश्य होणारी जेंव्हा दिवसाला साथ देणारी.. माझी जिवाभावाची सावली…..